Entertainment News Live Updates 3 September : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 03 Sep 2022 07:07 PM
Amitabh Bachchan : कोरोनावर मात केल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी केली 'कौन बनेगा करोडपती'च्या शूटिंगला सुरुवात

Amitabh Bachchan KBC 14 : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली असून आता त्यांची प्रकृती सुधारली आहे. प्रकृती सुधारणा झाल्याने त्यांनी 'कौन बनेगा करोडपती 14' (KBC 14) या कार्यक्रमाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. नुकतचं अमिताभ यांनी सोशल मीडियावर या कार्यक्रमासंदर्भात नवा प्रोमो शेअर केला आहे.





Irsal : 'इर्सल'चा होणार वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर

Irsal Movie : 'इर्सल' (Irsal) हा मराठी सिनेमा गेल्या काही दिवसांपूर्वी सिनेमागृहात प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. आता या सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर (World Television Premiere) होणार आहे. हा सिनेमा प्रेक्षकांना उद्या (रविवारी) दुपारी 12 आणि संध्याकाळी 6 वाजता पाहायला मिळणार आहे. 





Jammu Film Festival : 'जम्मू फिल्म फेस्टिव्हल'ला आजपासून सुरुवात

Jammu Film Festival : 'जम्मू फिल्म फेस्टिव्हल'ला (Jammu Film Festival) आजपासून (3 सप्टेंबर) सुरुवात झाली आहे. दोन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात 15 देशांतील 54 सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. 





Brahmastra Advance Booking : 'ब्रह्मास्त्र'ने रिलीजआधीच केला रेकॉर्ड

Brahmastra Advance Booking : 'ब्रम्हास्त्र' हा सिनेमा सिनेमागृहात चांगलाच धुमाकूळ घालणार आहे. रिलीजआधीच या सिनेमाने 10 हजार कोटींची कमाई केली आहे. 'ब्रम्हास्त्र' सिनेमाचे पहिल्या दिवशी 11,558 तिकिटं विकली गेली आहेत. 'केजीएफ 2' या सिनेमाचादेखील 'ब्रम्हास्त्र' सिनेमा रेकॉर्ड मोडू शकतो असेही म्हटले जात आहे. 





Har Har Mahadev : हर हर महादेव! छत्रपती शिवरायांच्या भूमिकेत दिसणार सुबोध भावे

Har Har Mahadev : 'हर हर महादेव' (Har Har Mahadev) हा सिनेमा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. या सिनेमाची घोषणा झाल्यापासून या सिनेमात कोणते कलाकार असतील याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. नुकतचं या सिनेमाचं एक पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. 'हर हर महादेव' या सिनेमात बहुआयामी अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) छत्रपती शिवरायांच्या भूमिकेत दिसणार आहे.





‘त्या’ दिवशी सोनाली फोगाट यांच्यासोबत नेमकं काय घडलं? गोवा पोलिसांची केस डायरी एबीपीच्या हाती

भाजप नेत्या आणि टिकटॉक स्टार सोनाली फोगाट (Sonali Phogat) हत्या प्रकरणात आता अनेक खुलासे होत आहेत. आता ‘त्या’ घटनेदिवशी सोनाली फोगाट यांच्यासोबत नेमकं काय घडलं? हे सांगणारी गोवा पोलिसांची केस डायरी एबीपीच्या हाती लागली आहे. त्या दिवशी काय घडले, हे या डायरीत सांगितले गेले आहे. 


वाचा संपूर्ण बातमी

गणपती बाप्पाही विसावला ‘दगडी चाळी’त, दगडीचाळ थिमवर साकारलेला गणपती देखावा चर्चेत!

'दगडी चाळ 2' या चित्रपटातून प्रेरणा घेत अनुष्काने यंदा चक्क दगडी चाळीचा देखावा बनवला आहे.



रश्मिका आणि बिग बींच्या ‘गुडबाय’चे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला! चित्रपटाची रिलीज डेटही जाहीर

अमिताभ बच्चन यांना रुपेरी पडद्यावर पाहणे नेहमीच रोमांचक असते. नुकतीच ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटातील त्यांची झलक प्रेक्षकांनी पाहिली होती. आता बिग बींनी चाहत्यांना आणखी एक खास भेट दिली आहे. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर आगामी चित्रपट ‘गुडबाय’चे पोस्टर शेअर केले आहे.  


 





गणपती बाप्पाच्या चरणी लीन झाली 'बिग बॉस'ची 'लव्हबर्ड' जोडी! पाहा तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्राचा फोटो..

विराट कोहली-अनुष्का शर्मा झाले अलिबागकर, 8 एकर जमीन घेतली 19 कोटी रुपयांत

भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली आणि पत्नी अनुष्का शर्मा यांनी गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर अलिबागमध्ये जमीन खरेदी केली आहे. विराट कोहलीनं अलिबागजवळ झिराड येथे 8 एकर जागा खरेदी केली आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, विराट कोहली या आठ एकर जागेवर फार्महाऊस बांधणार आहे. विराट कोहलीचा भाऊ विकास कोहलीनं याने 30 ऑगस्ट रोजी या जागेचे सर्व व्यवहार पूर्ण केले आहेत. 

'मलाही लग्नाच्या नात्यात धोका मिळालाय!', महीप कपूरचा धक्कादायक खुलासा

महीप आणि संजय कपूरच्या लग्नाला आता 25 वर्षांहून अधिक वर्षे पूर्ण झाली आहेत. दोघेही एक मुलगी आणि एका मुलाचे आई-वडील आहेत. ‘फॅब्युलस लाईफ ऑफ बॉलिवूड वाईफ्स’ या शोच्या प्रमोशन दरम्यान महीपने आपल्या वैवाहिक जीवनाबद्दल अनेक खुलासे केले आहेत. लग्नाच्या सुरुवातीच्या काळात आपलीही फसवणूक झाल्याचे तिने सांगितले. संजय कपूरने आपल्याला धोका दिला होता, असे महीपने म्हटले आहे.

'मॉम टू बी' आलिया भट्टकडून 'ब्रह्मास्त्र'चं हटके प्रमोशन! सुपर क्युट ड्रेसने जिंकलं चाहत्यांचं मन!

‘सोनालीला गोव्यात आणणं आमच्या प्लॅनचाच भाग’, आरोपी सुधीर सांगवानने दिली गुन्ह्याची कबुली!

भाजप नेत्या आणि टिकटॉक स्टार सोनाली फोगाट (Sonali Phogat) हत्येप्रकरणी पोलिसांनी त्यांचा पीए सुधीर सांगवान याला ताब्यात घेतले आहे. पोलीस कोठडीत चौकशीदरम्यान, सोनाली फोगाट यांना गुडगावहून गोव्यात आणण्याचा कट आपणच रचल्याची कबुली सुधीर सांगवानने दिल्याची माहिती गोवा पोलिसांच्या सूत्रांनी दिली आहे. गोव्यात शूटिंगचा कोणताही प्लॅन नव्हता, त्यांना गोव्यात आणण्याचा हा कट होता, असे त्याने पोलिसांनी सांगितले आहे. तसेच, सोनालीच्या हत्येचा कट फार पूर्वीपासून रचला गेला होता.

200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात नोरा फतेहीची चौकशी!

सुकेश चंद्रशेखर आणि 200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात आता अभिनेत्री नोरा फतेहीची देखील पुन्हा एकदा चौकशी करण्यात आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी सुकेश चंद्रशेखरने भेटवस्तू दिल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने शुक्रवारी (2 सप्टेंबर) नोराची चौकशी केली. तब्बल 8 तास हे चौकशी सत्र सुरु होते.


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या:



 

केदार शिंदेंच्या लेकीचं अभिनय विश्वात पदार्पण, ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटात साकारणार महत्त्वाची भूमिका!

अभिनेत्री हेमांगी कवीचं ताज हॉटेलमध्ये झक्कास फोटोशूट!

अभिनेत्री हेमांगी कवी नेहमीच तिच्या वेगवेगळ्या पोस्टमुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर बिनधास्त बोल बोलणारी ही अभिनेत्री सर्वांचीच लाडकी आहे.  नुकतीच हेमांगी कवी ताज हॉटेलमध्ये गेली होती. यावेळी तिने आपल्या आयुष्यातले हे खास क्षण चाहत्यांसोबत शेअर केले.





‘अंतरा’चा चंद्रा लूक सोशल मीडियावर चर्चेत!

मराठी मालिकांमध्ये देखील सध्या मंगळागौरचा माहोल पाहायला मिळत आहे. ‘जीव माझा गुंतला’ या मालिकेत यंदा अंतराची पहिली मंगळागौर साजरी केली गेली आहे. याच निमित्ताने अंतरा म्हणजेच अभिनेत्री योगिता चव्हाण हिने सुंदर निळ्या रंगाची नऊवारी साडी परिधान केली होती.


 





बिपाशा बसूचं नवं फोटोशूट चर्चेत!

बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय याचा आज वाढदिवस!

अभिनेता विवेक ओबेरॉय आज आपला 46वा वाढदिवस साजरा करत आहे.


 





बॉलिवूड अभिनेते शक्ती कपूर यांचा आज वाढदिवस!

अभिनेते शक्ती कपूर (Shakti Kapoor) यांनी बॉलिवूडमध्ये अनेक नकारात्मक भूमिका करून स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यांनी केवळ नकारात्मक भूमिकांनीच नाही, तर आपल्या कॉमेडी भूमिकांमधूनही प्रेक्षकांना खूप हसवले आहे. आज (3 सप्टेंबर) शक्ती कपूर यांचा वाढदिवस आहे.


 





'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमासाठी रणदीप हुड्डानं घेतली मेहनत; नवा लूक सोशल मीडियावर व्हायरल

बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा (Randeep Hooda) त्याच्या दर्जेदार अभिनयासाठी ओळखला जातो. प्रत्येक भूमिकेसाठी तो मेहनत घेताना दिसून येतो. आता रणदीप हुड्डा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याने आगामी 'स्वातंत्र्यवीर सावरकर' (Swatantra Veer Savarkar) या सिनेमासाठी जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन केलं आहे. त्याचा नवा लूक सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.


 





पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमासाठी रणदीप हुड्डानं घेतली मेहनत; नवा लूक सोशल मीडियावर व्हायरल


बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा (Randeep Hooda) त्याच्या दर्जेदार अभिनयासाठी ओळखला जातो. प्रत्येक भूमिकेसाठी तो मेहनत घेताना दिसून येतो. आता रणदीप हुड्डा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याने आगामी 'स्वातंत्र्यवीर सावरकर' (Swatantra Veer Savarkar) या सिनेमासाठी जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन केलं आहे. त्याचा नवा लूक सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.


'कार्तिकेय 2'ची बॉक्स ऑफिसवर गाडी सुसाट; केली कोट्यवधींची कमाई


दाक्षिणात्य सुपरस्टार निखिल सिद्धार्थचा (Nikhil Siddhartha) 'कार्तिकेय 2' (Karthikeya 2) हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. रिलीजच्या तीन आठवड्यानंतरदेखील हा सिनेमा चांगली कमाई करत आहे. 'कार्तिकेय 2' हा या वर्षातला सुपरहिट दाक्षिणात्य सिनेमा ठरला आहे.


मैत्रीच्या बंधाची अनोखी गोष्ट उलगडणार; बहुचर्चित 'रूप नगर के चीते'चा ट्रेलर रिलीज


'रूप नगर के चीते' (Roop Nagar Ke Cheetey) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. मैत्रीच्या बंधाची अनोखी गोष्ट 'रूप नगर के चीते' या सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या सिनेमाच्या ट्रेलरला हजारो व्ह्यूज मिळाले आहेत. ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.


विक्रमच्या ‘कोब्रा’चा बॉक्स ऑफिसवर मोठा विक्रम, पहिल्याच दिवशी जमवला ‘इतका’ गल्ला!


अभिनेता विक्रम 3 वर्षांच्या ब्रेकनंतर या चित्रपटातून पुन्हा मोठ्या पडद्यावर परतला आहे. 'कोब्रा'ची ओपनिंग अपेक्षेपेक्षा जास्त धमाकेदार झाली आहे. चित्रपटाने पहिल्याच दिवशी केवळ तामिळनाडूमध्ये 12 कोटी रुपयांची कमाई केली आहे. यासह हा चित्रपट विक्रमच्या करिअरमधील आतापर्यंतचा सर्वात यशस्वी चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी तेलुगू बॉक्स ऑफिसवर 4.25 कोटींचा व्यवसाय केला. या चित्रपटाने कर्नाटकात 2 कोटी आणि केरळमध्ये 1.65 कोटींचा व्यवसाय केला आहे. तर, इतर राज्यांतून या चित्रपटाने एकूण 60 लाख रुपयांचा गल्ला जमवला आहे. यासह चित्रपटाने संपूर्ण बॉक्स ऑफिस कमाईचा आकडा 19.50 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे.


सौरव गांगुली आणि रोहित शर्मा करणार अभिनय क्षेत्रात पदार्पण; 'मेगा ब्लॉकबस्टर' मधील फर्स्ट लूक रिलीज


मेगा ब्लॉकबस्टर (Mega BlockBuster) या नव्या प्रोजेक्टची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या प्रोजेक्टमधील कलाकारांचा फर्स्ट लूक रिलीज झाला आहे. यामध्ये क्रिकेटर रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि सौरव गांगुली (Sourav Ganguly) हे प्रमुख भूमिका साकारणार आहेत.  तसेच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) आणि अभिनेता कपिल शर्मा (Kapil Sharma) हे देखील मेगा ब्लॉकबस्टरमध्ये महत्त्वाची भूमिका साकारणार आहेत. या सर्व कलाकरांनी या मेगा ब्लॉकबस्टरमधील त्यांच्या लूकचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.