Entertainment News Live Updates 29 September : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 29 Sep 2022 02:01 PM
रणवीर-दीपिकाच्या नात्यात बिनसलं? चर्चांवर उत्तर देताना रणवीर सिंह म्हणतोय...

दीपिका आणि रणवीरच्या नात्यात सर्व काही ठीक नसल्याचे सांगणारे एक ट्विट चर्चेत आले होते. दोघांच्या नात्यात सध्या काही समस्या सुरु असल्याचे या ट्विटमध्ये म्हटले गेले होते. हे ट्विट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे. ज्यानंतर त्यांच्या चाहत्यांमधून नाराजीचा सूर ऐकू येऊ लागला. मात्र, रणवीर सिंहने यावर स्पष्टीकरण दिले आहे.


 





अजय देवगनच्या 'दृश्यम 2'ची प्रतीक्षा संपली; चित्रपटाचा टीझर रिलीज

बॉलिवूड अभिनेता अजय देवगनच्या (Ajay Devgan) आगामी 'दृश्यम 2' (Drishyam 2) या सिनेमाचा टीझर आऊट झाला आहे. 'दृश्यम' हा सिनेमा 2015 साली प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमात अजय देवगन (Ajay Devgan), तब्बू (Tabu), श्रिया सरन (Shriya Saran) महत्त्वाच्या भूमिकेत होते. हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. त्यामुळे प्रेक्षक 'दृश्यम 2'ची प्रतीक्षा करत होते. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


 





प्रत्येक आईवडील, प्रत्येक विद्यार्थी आणि प्रत्येक शिक्षकासाठी! ‘बालभारती’ चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित

बहुप्रतिक्षित मराठी चित्रपट ‘बालभारती’चे (Bal Bharti) पहिले पोस्टर आज प्रदर्शित झाले. स्फियरओरिजीन्स यांनी निर्मिती आणि नितीन नंदन यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. पोस्टरची पहिली झलकच चित्रपटाचे वगळेपण दाखवतो. बालभारती हा चित्रपट 11 नोव्हेंबर 2022 रोजी रिलीज होणार आहे.


 





TDM : टीडीएमच्या जबरदस्त टीझरने घातलाय सर्वत्र धुमाकूळ; ‘या’ दिवशी रिलीज होणार चित्रपट!

राष्ट्रीय पुरस्कार विजेते भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे दिग्दर्शित, एक आगळीवेगळी कहाणी असलेला ‘टीडीएम’ (TDM) हा चित्रपट येत्या 3 फेब्रुवारी 2023ला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. पोस्टरपासूनच या चित्रपटाविषयीची उत्सुकता अधिकच ताणली गेली होती आणि आता नुकताच या चित्रपटाचा संभ्रमात पाडणारा टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला असून, तोही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.


 





रिक्षा चालकाची मुलगी झळकणार चित्रपटात, ‘प्रेम म्हणजे काय असतं’मध्ये साकारणार मुख्य भूमिका!

कला असली की, व्यक्तीला आपोआपच संधी मिळू लागतात. असचं काहीसं ऋतुजा टंकसाळे (Rutuja Tanksale) हिच्यासोबत घडलंय. साताऱ्याची ऋतुजा टंकसाळे ही नवोदित अभिनेत्री ‘प्रेम म्हणजे काय असतं’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहे. नव्या दमाच्या कलाकारांनी केलेला 'प्रेम म्हणजे काय असतं' (Prem Mhanje Kay Asat)  हा चित्रपट येत्या 4 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.


 


PHOTO : क्युट मायराच्या नटखट अदा...परीच्या क्युटनेसचे चाहते करतायत कौतुक!

‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतील परीचा अर्थात बालकलाकार मायरा वायकूळचा चाहतावर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अवघ्या पाच वर्षांच्या परीने मालिका सुरू होताच प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती. मालिकेचा चाहतावर्ग दिवसेंदिवस वाढण्याचे कारण म्हणजे मालिकेतील बालकलाकार 'परी' आहे. परीचे खरे नाव मायरा वायकूळ असे आहे. मायरा सोशल मीडियावर भरपूर सक्रिय असते, तिचे फोटो आणि व्हिडीओ नेहमी सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.


 





ऐश्वर्या रायने ‘द कपिल शर्मा शो’मध्ये येणं का टाळलं? चाहते म्हणतायत याचं कारण सलमान खान!

बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन (Aishwarya RaiBachchan) सध्या तिचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'पोन्नियिन सेल्वन'च्या (Ponniyin Selvan) प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. मणिरत्नम (Mani ratnam) दिग्दर्शित हा भव्य चित्रपट 30 सप्टेंबर 2022 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. ऐश्वर्या राय दक्षिणेत या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसते आहे. मात्रे, प्रमोशनसाठी तिने 'द कपिल शर्मा शो'मध्ये (The Kapil Sharma Show) जाणे टाळले आहे.


वाचा संपूर्ण बातमी


 





Ekta Kapoor : एकता कपूरवर अटकेची टांगती तलवार, निर्माती विरोधात ‘अरेस्ट वॉरंट’ जारी!

बिहारमधील बेगुसराय कोर्टाने बॉलिवूडची प्रसिद्ध चित्रपट, टीव्ही आणि वेब सीरिजची निर्माती एकता कपूर (Ekta Kapoor) आणि तिची आई शोभा कपूर (Shobha Kapoor) यांच्याविरोधात अटक वॉरंट (Arrest Warrant) जारी केले आहे. एकता कपूरने बनवलेल्या ‘XXX’  या वेब सीरिजमध्ये सैनिकांच्या पत्नीची आक्षेपार्ह प्रतिमा सादर केल्याच्या विरोधात दाखल केलेल्या खटल्यात हे वॉरंट काढण्यात आले आहे. 


 





ओपन फ्रंट ड्रेसमध्ये तमन्ना भाटियाच्या बोल्ड अंदाज, सोशल मीडियावर फोटोंची चर्चा!

बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटिया तिच्या जबरदस्त अभिनयामुळे भारतातच नाही, तर जगभरात प्रसिद्ध आहे. तिचे चित्रपट परदेशातही लोकप्रिय आहेत. अतिशय मेहनत करून तिने इंडस्ट्रीत हे स्थान मिळवले आहे. तमन्नाने नुकतेच इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात तिने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. या फोटोंमध्ये तमन्ना खूपच सुंदर दिसत आहे.


 





Mehmood Birth Anniversary : ‘हिरो’पेक्षाही जास्त मानधन घेणारा कॉमेडियन; कधीकाळी करायचे ड्रायव्हर म्हणून काम!

आपल्या बहारदार विनोदांनी प्रेक्षकांना मनसोक्त हसवणारे ‘कॉमेडी किंग’ अभिनेते मेहमूद अली (Mehmood) यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवस साजरा करण्यासाठी ते या जगात नसले, तरी चाहत्यांच्या मनात त्यांच्या आठवणी आजही जिवंत आहेत. अभिनेते मेहमूद अली यांचा जन्म 29 सप्टेंबर 1933 रोजी मुंबईत झाला होता. 


वाचा संपूर्ण बातमी

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


'हर हर महादेव' शिवगर्जना घुमणार रुपेरी पडद्यावर


मराठमोळा अभिनेता सुबोध भावे एक अभ्यासू अभिनेता असून नेहमीच तो त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांवर छाप पाडत असतो. आज सुबोध पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सुबोधचा 'हर हर महादेव' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच या सिनेमाचे पोस्टर आऊट झाले आहे.


अजय देवगनच्या 'दृश्यम 2'ची प्रतीक्षा संपली


बॉलिवूड अभिनेता अजय देवगनच्या आगामी 'दृश्यम 2' या सिनेमाचा फर्स्ट लुक आऊट झाला आहे. 'दृश्यम' हा सिनेमा 2015 साली प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमात अजय देवगन, तब्बू, श्रिया सरन महत्त्वाच्या भूमिकेत होते. हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. त्यामुळे प्रेक्षक 'दृश्यम 2'ची प्रतीक्षा करत होते. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेत नवं वळण


'माझी तुझी रेशीमगाठ' ही छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका आहे. मालिकेत येत असणाऱ्या नव्या ट्विस्टमुळे मालिका आता लोकप्रियतेच्या शिखरावर आली आहे. मालिकेत नेहा प्रेग्नंट असल्याची घरच्यांना चाहुल लागली आहे. त्यामुळे आता नेहा खरंच आई होणार का याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.


आलियाने रणबीरला दिलं खास बर्थडे गिफ्ट


बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. आलियासाठी 2022 हे वर्ष वैयक्तिक कारणांसह व्यावसायिकरित्यादेखील खास आहे. आलिया-रणबीरचा 'ब्रह्मास्त्र' सिनेमा सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घालत असून आज रणबीरच्या वाढदिवशी आलियाने पुन्हा एकदा चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. 'टाईम 100 इम्पॅक्ट पुरस्कारा'साठी आलियाची निवड झाली आहे.


परिणीती चोप्राच्या 'कोड नेम तिरंगा' सिनेमात पाहायला मिळणार अॅक्शनचा तडका


बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा सध्या चर्चेत आहे. तिच्या आगामी 'कोड नेम तिरंगा' सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ट्रेलरमुळे चाहत्यांना आता सिनेमाची उत्सुकता लागली आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.