Entertainment News Live Updates 29 January : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 29 Jan 2023 05:18 PM
Pathan Worldwide Box office : जगभरात शाहरुखच्या 'पठाण'चा बोलबाला

Shah Rukh Khan Pathan Worldwide Collection : बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) 'पठाण'ची (Pathan) क्रेझ जगभरात आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी रेकॉर्डब्रेक कमाई करणाऱ्या या सिनेमाने चार दिवसांत अनेक रेकॉर्ड आपल्या नावे केले आहेत. रिलीजच्या चौथ्या दिवशी हा सिनेमा 400 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे.





Hemangi Kavi : 'हा' सगळ्या बाबतीत आपल्यापेक्षा डावा असून इतका यशस्वी कसा? हेमांगी कवीची शाहरुखसाठी खास पोस्ट

Hemangi Kavi On Shah Rukh Khan Pathan : बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) 'पठाण'चा (Pathan) सध्या सर्वत्र बोलबाला आहे. चाहत्यांसह सेलिब्रिटीदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून शाहरुखचं आणि 'पठाण' सिनेमाचं कौतुक करत आहेत. आता मराठमोळी अभिनेत्री आणि रोखठोक मतांमुळे चर्चेत असणाऱ्या हेमांगी कवीने (Hemangi Kavi) सोशल मीडियाच्या माध्यमातून शाहरुखवर होणाऱ्या टीकेवर भाष्य केलं आहे. 



Avatar 2 Collection : जगभरात 'अवतार 2'चा डंका

Avatar 2 Worldwide Collection : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) 'पठाण' (Pathan) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. पण तरीही 'अवतार द वे ऑफ वॉटर' (Avatar The Way Of Water) या हॉलिवूड सिनेमाची क्रेझ चाहत्यांमध्ये कायम आहे. हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित होऊन आता 40 दिवस पूर्ण झाले असून आता हा सिनेमा सर्वाधिक कमाई करणारा चौथा सिनेमा ठरला आहे. 

Salman Khan Help Rakhi Sawant : लग्नापासून ते आईच्या उपचारापर्यंत; राखी सावंतच्या मदतीला धावून आला Salman Khan

Salman Khan Helped Rakhi Sawant : बॉलिवूड अभिनेता सलमान खानला (Salman Khan) 'भाईजान' असं म्हटलं जातं. हिंदी सिनेसृष्टीतील अनेक मंडळीच्या अडीअडचणीला सलमान खान धावून जात असतो. 'ड्रामाक्वीन' राखी सावंत (Rakhi Sawant) सलमानला भाऊ मानते. त्यामुळे लाडकी बहिण जेव्हा अडचणीत येते तेव्हा भाईजान तिच्या मदतीला धावून जातो. जाणून घ्या आतापर्यंत सलमान खान राखीच्या मदतीला कधी धावून आला आहे...


Salman Khan Help Rakhi Sawant : लग्नापासून ते आईच्या उपचारापर्यंत; राखी सावंतच्या मदतीला धावून आला Salman Khan

Sonu Sood : सोनू सूदला चाहत्यांनं दिली 87 हजार स्क्वेअर फूटाच्या रांगोळीची भेट

Sonu Sood : बॉलिवूड अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) खऱ्या अर्थाने हिरो आहे. खलनायकाची भूमिका साकारणाऱ्या सोनू सूदचा मोठा चाहतावर्ग आहे. तो नेहमीच चाहत्यांच्या मदतीला धावून जात असतो. त्यामुळे त्याचे चाहतेदेखील आपल्या लाडक्या सेलिब्रिटीसाठी काही ना काही करत असतात. नुकतचं सोनू सूदला एका चाहत्यांने अनोखी भेट देत आश्चर्यचकित केलं आहे. 





Sonu Sood : सोनू सूदला चाहत्यांनं दिली 87 हजार स्क्वेअर फूटाच्या रांगोळीची भेट

Sonu Sood : बॉलिवूड अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) खऱ्या अर्थाने हिरो आहे. खलनायकाची भूमिका साकारणाऱ्या सोनू सूदचा मोठा चाहतावर्ग आहे. तो नेहमीच चाहत्यांच्या मदतीला धावून जात असतो. त्यामुळे त्याचे चाहतेदेखील आपल्या लाडक्या सेलिब्रिटीसाठी काही ना काही करत असतात. नुकतचं सोनू सूदला एका चाहत्यांने अनोखी भेट देत आश्चर्यचकित केलं आहे. 





Pathan : राष्ट्रपती भवनाच्या सांस्कृतिक केंद्रात शाहरुख खानच्या 'पठाण'चे स्पेशल स्क्रीनिंग

SRK Pathan In Rashtrapati Bhavan : बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) 'पठाण'ची (Pathan) जगभरात क्रेझ आहे. रेकॉर्डब्रेक कमाई करण्यासोबत हा सिनेमा अनेक रेकॉर्ड्स आपल्या नावावर करत आहे. भारतासह परदेशातील सिनेप्रेक्षकांकडून या सिनेमाला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. या सिनेमाच्या कमाईत दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होत आहे. आता राष्ट्रपती भवनाच्या सांस्कृतिक केंद्रात या सिनेमाचे स्पेशल स्क्रीनिंग आयोजित करण्यात आले आहे. 





Pathan Box Office Collection : बॉक्स ऑफिसवर शाहरुखच्या 'पठाण'ची जादू कायम

Shah Rukh Khan Pathan Box Office Collection : बॉलिवूडचा बादशाह अशी ओळख असलेल्या शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) 'पठाण' बहुचर्चित (Pathan) हा सिनेमा सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घालत आहे. हा सिनेमा प्रदर्शित होऊन चार दिवस पूर्ण झाले असले तरीही चाहत्यांमध्ये शाहरुखची आणि त्याच्या सिनेमाची क्रेझ कायम आहे. रिलीजच्या चौथ्या दिवशी हा सिनेमा 200 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. 





Rakhi Sawant Mother Death: राखी सावंतच्या आईचं निधन

Rakhi Sawant Mother Jaya Death: बॉलीवूड अभिनेत्री आणि प्रसिद्ध मॉडेल राखी सावंतच्या आईचं (Rakhi Sawant Mothr)  निधन झाले आहे. जुहूच्या क्रिटि केअर हॉस्पिटलमध्ये राखी सावंतच्या आईने अखेरचा श्वास घेतलाय.  राखी सावंतची आई जया भेडा या गेल्या तीन वर्षांपासून कॅन्सर आजाराशी लढा देत होत्या. मात्र अखेर त्यांचा हा लढा अपयशी ठरलाय. या महिन्याच्या सुरुवातीला राखीच्या आईला ब्रेन ट्यूमर झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं.



पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Asha Bage : ज्येष्ठ लेखिका आशा बगे यांना जनस्थान पुरस्कार जाहीर


Asha Bage : कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने 2023 चा जनस्थान पुरस्कार (Jansthan Award) ज्येष्ठ लेखिका आशा बगे यांना जाहीर करण्यात आला आहे. दर दोन वर्षांनी जनस्थान पुरस्कार जाहीर करण्यात येतो. आशा बगे यांना 10 मार्च रोजी कालिदास कला मंदिरात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. एबीपी माझाच्या टीमने आशाताई बगे यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. यावेळी आशाताई म्हणाल्या, 'कृमाग्रजांच्या नावाचा हा सन्मान मिळणे हे माझे भाग्य आहे.'


SRK Pathan : भारतातच नाही परदेशातदेखील 'पठाण'चा डंका; शाहरुखने पटकावला 'Man of The Day'चा मान


Shah Rukh Khan Pathan France : बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान (Shah Rukh Khan) 'पठाण' (Pathan) सिनेमामुळे चर्चेत आहे. जगभरात त्याची क्रेझ पाहायला मिळत आहे. फ्रान्समधील वृत्तवाहिन्यांमध्येही 'पठाण' सिनेमा आणि शाहरुख खान चर्चेत आहे. आज फ्रान्समधील वृत्तवाहिन्यांनी (France News Channel) शाहरुखला 'मॅन ऑफ द डे'चा (Man Of The Day) मान दिला आहे. 


Tejaswini Pandit : तेजस्विनी पंडितने वडापाव खाणं का सोडलं?


Tejaswini Pandit : 'वडापाव' (Vada pav) हा पदार्थ जगभरात लोकप्रिय आहे. सकाळच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत हा पदार्थ आवडीने खाल्ला जातो. सर्वसामान्य नागरिकांपासून ते मोठ-मोठ्या सेलिब्रिटींपर्यंत सर्वच मंडळी वडापाव खात असतात. पण मराठमोळी अभिनेत्री (Marathi Actress) आणि निर्माती तेजस्विनी पंडितने (Tejaswini Pandit) मात्र वडापाव खाणं सोडून दिलं आहे.  तेजस्विनी पंडित म्हणाली,"मी वडापाव खाणं खूप वर्षांपूर्वीचं सोडून दिलं आहे. एका मित्रासाठी मी वडापाव खाणं सोडलं आहे. तो मित्र आता या जगात नाही. खरतर मला आता भूक लागली आहे, पण मी वडापाव खाणार नाही". तेजस्विनीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.