International Media On Death of Ratan Tata : देशाच्या औद्योगिक समूहातील मानाचे पान असलेल्या टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा (Ratan Tata) यांचे बुधवारी (9 ऑक्टोबर) रात्री उशिरा मुंबईतील रुग्णालयात निधन झाले. ते 86 वर्षांचे होते. टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन (Natarajan Chandrasekaran) यांनी एका निवेदनात रतन टाटा यांचे निधन झाल्याचे सांगितले. 'मित्र आणि मार्गदर्शक' म्हणून त्यांचा उल्लेख चंद्रशेखरन यांनी केला. गेल्या काही दिवसांपासून ते दक्षिण मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल होते. अब्जाधीश हर्ष गोएंका यांनीही रतन टाटा यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आणि 'X' वर  त्यांना "टायटन" (एक अतिशय महत्त्वाची व्यक्ती) संबोधले. रतन टाटा यांच्या निधनानंतर केवळ भारतीय माध्यमांनीच नव्हे तर परदेशी माध्यमांनीही (International Media On Death of Ratan Tata) त्यांच्या कतृत्वाची दखल देत त्यांच्या कार्याला सलाम केला आहे. जगभरातील औद्योगिक समूहाकडून रतन टाटा यांचे आदराने नाव घेतले जाते. 


रतन टाटा यांच्या निधनावर परदेशी मीडियाने काय म्हटले?


रतन टाटा यांच्याबद्दल, न्यूयॉर्क टाइम्सने म्हटले आहे की, लिहिते की भारतातील सर्वात शक्तिशाली आणि प्रशंसनीय दिग्गजांपैकी एक असलेले रतन टाटा यांचे निधन झाले. त्यांनी टाटा समूहाला जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त ब्रँडमध्ये रूपांतरित केले. 1991 ते 2012 या काळात अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी म्हणून 21 वर्षांच्या काळात टाटा समूहाचा नफा 50 पटीने वाढला. यामध्ये सर्वात मोठा वाटा जग्वार, लँड रोव्हर आणि टेटली टी सारख्या प्रसिद्ध टाटा उत्पादनांच्या विक्रीतून आला आहे, ज्यांना परदेशात प्रचंड मागणी आहे.


ब्रिटिश उद्योगाला आकार देण्यात मोठी भूमिका बजावली


लंडनची जगप्रसिद्ध वृत्तसंस्था बीबीसीनेही रतन टाटा यांच्या निधनाची माहिती दिली, ज्यात ब्रिटनचे व्यापार सचिव जोनाथन रेनॉल्ड्स म्हणतात की रतन टाटा हे एक व्यावसायिक दिग्गज होते ज्यांनी ब्रिटिश उद्योगाला आकार देण्यात मोठी भूमिका बजावली. रतन टाटा यांच्या  संबंधित माहितीही रॉयटर्सने शेअर केली आहे. रतन टाटा यांच्या निधनाच्या माहितीशिवाय त्यांच्या आयुष्याविषयी अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. टाटांनी कॉर्नेल विद्यापीठात वास्तुविशारद पदवीसाठी शिक्षण घेतल्याचे त्यांनी लिहिले आहे. यानंतर ते भारतात परतले. त्यांनी 1962 मध्ये टाटा समूहात काम करण्यास सुरुवात केली, ज्याची स्थापना त्यांच्या आजोबांनी जवळजवळ शतकापूर्वी केली होती. टेल्को, टाटा मोटर्स लिमिटेड (TAMO.NS) सह अनेक टाटा कंपन्यांमध्ये काम केले.


अल जझीराने म्हटले आहे की, टाटा समूहात 100 पेक्षा जास्त मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे. यामध्ये भारतातील सर्वात मोठी ऑटोमोबाईल उत्पादक, एक स्टील कंपनी आणि एक मोठी आउटसोर्सिंग फर्म यांचा समावेश आहे. ही कंपनी जगभरात 350,000 पेक्षा जास्त लोकांना रोजगार देते. टाटा यांनीच 1932 मध्ये एअर इंडिया नावाची एअरलाइन सुरू केली तेव्हा भारतात व्यावसायिक उड्डाणे सुरू केली.


इतर महत्वाच्या बातम्या