Entertainment News Live Updates 26May: टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

प्रियांका कुलकर्णी Last Updated: 26 May 2022 01:10 PM
Riteish Deshmukh : विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त रितेशनं शेअर केली भावनिक पोस्ट

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) यांची आज जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त बॉलिवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेता अभिनेता रितेश देशमुखनं (Riteish Deshmukh) एक  भावनिक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्यानं काही फोटो देखील या पोस्टमध्ये शेअर केले आहेत.  


वाचा सविस्तर बातमी 

अभिनेत्री बिदिशा डेचं निधन

काही दिवसांपूर्वी बंगाली अभिनेत्री  पल्लवी डे (Pallavi Day) हिने गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्या निधनानं बंगाली चित्रपटसृष्टीमध्ये खळबळ माजली होती. आता बंगाली अभिनेत्री आणि मॉडेल असणाऱ्या बिदिशा डेनं (Bidisha De) देखील आत्महत्या केली आहे. तिच्या मृत्यूनं अनेकांना धक्का बसला आहे. कोलकाता येथील नगर  बाजारमध्ये बिदिशा ही भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहायची आणि तिथेच तिने आत्महत्या केली. बुधवारी संध्याकाळी पोलिसांना बिदिशा डेचा मृतदेह तिच्या फ्लॅमधील पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सापडला. फ्लॅटचा दरवाजा आतून बंद होता, तो तोडून पोलिसांनी घरात प्रवेश केला आणि त्यानंतर बिदिशाचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला.


वाचा सविस्तर बातमी 

बिहारच्या मुलीला सोनू सूद करणार मदत

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सोनू सूदनं (Sonu Sood) लॉकडाऊन दरम्यान अनेकांची मदत केली. तो सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतो. अनेक लोक  सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून सोनूला मदत मागतात. त्यांच्या पोस्टला रिप्लाय देऊन सोनू त्यांना मदत देखील करतो. नुकताच बिहारमधील एका चिमुकलीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ही मुलगी एक किलोमीटरच्या अंतरावर असणाऱ्या शाळेत जाण्यासाठी एका पायावर उड्यामारताना जाताना दिसत आहे. एका दुर्घटनेमध्ये या मुलीनं तिचा एक पाय गमावला आहे. पण तरी देखील ही मुलगी एका पायवर शाळेत जात आहे. आता या मुलीला सोनू मदत करणार आहे. 


वाचा सविस्तर बातमी 

Amy Jackson : कान्स 2022 फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर एमी जॅक्सनचा जलवा

Amy Jackson : अभिनेत्री एमी जॅक्सननं कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावली. पाहा तिचा रेड कार्पेटवरील लूक :





Shah Rukh Khan : शाहरुख म्हणतो, 'माझ्या घरात 12 ते 13 टिव्ही'

बॉलिवूडचा 'बादशाह' अशी ओळख असणारा अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. त्याचा चाहता वर्ग मोठा आहे. 23 मे रोजी दिल्लीमधील एका इव्हेंटमध्ये शाहरुकनं सहभाग घेतला. यावेळी उपस्थित लोकांसोबत संवाद साधताना शाहरुखनं त्याच्या घरात असलेल्या टिव्हीची किंमत सांगितली. त्याचा या इव्हेंटमधील व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओला नेचकऱ्यांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. 


व्हिडीओमध्ये दिसत आहे की शाहरुख सांगतो, 'माझ्या घराच्या लिव्हिंग एरियामध्ये एक टिव्ही आहे. तसेच बेडरुममध्ये देखील एक टिव्ही आहे. अबरामच्या रुममध्ये वेगळा टिव्ही आणि आर्यनच्या रुममध्ये देखील वेगळा टिव्ही आहे. माझ्या मुलीच्या रुममध्ये एक टिव्ही आहे. जवळपास 12 ते 13 टिव्ही माझ्या घरात आहेत. या सर्वांची किंमत 30 ते 40 लाख रुपये आहे.  '

पार्श्वभूमी

Sarkaru Vaari Paata : बॉक्स ऑफिसवर महेश बाबूचाच स्वॅग; 'सरकारू वारी पाटा' 200 कोटींच्या क्लबमध्ये सामील


 दाक्षिणात्य चित्रपसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेता महेश बाबू (Mahesh Babu) आणि किर्ती सुरेश (Keerthy Suresh) यांचा  सरकारू वारी पाटा (Sarkaru Vaari Paata) सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. हा चित्रपट आता 200 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. सध्या सोशल मीडियावर महेश बाबूच्या या चित्रपटाची चर्चा सुरु आहे. 


पुष्पा द राइजचं रेकॉर्ड तोडणार का?


पुष्पा द राइज या चित्रपटाचं वर्ल्ड वाइड कलेक्शन हे हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर 166.82 कोटी होते. त्यानंतर दुसऱ्या आठवड्यामध्ये या चित्रपटानं 4.03 कोटींची कमाई केली होती. तसेच 12 व्या दिवशी या चित्रपटानं 190.84 कोटी कमाई केली. आता सरकारू वारी पाटा हा चित्रपट लवकरच पुष्पाचं रेकॉर्ड तोडणार आहे, असं म्हटलं जात आहे. 


महेश बाबू आणि किर्ती सुरेश यांच्यासाठी हा चित्रपट खास आहे. महेश बाबूचा काही दिवसांपूर्वी सरिलेरु नीकेवरु  हा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटानं 260 कोटींचे वर्ल्ड वाइड कलेक्शन केले होते. आता महेश बाबूचा सरकारू वारी पाटा  हा चित्रपट कोणत्या चित्रपटांचे रेकॉर्ड तोडेल, याच्याकडे महेश बाबूच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे.


'तुला रॅम्प वॉक करता येत नाही?'; पलक तिवारीला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल


अभिनेत्री  श्वेता तिवारीची (Shweta Tiwari )मुलगी पलक तिवारी (palak Tiwari) तिच्या स्टाईलनं नेहमीच नेटकऱ्यांची मनं जिंकते. पलकच्या बिझली-बिझली या गाण्याला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. पलक ही नुकत्याच दिल्लीमध्ये पार पडलेल्या एका फॅशन वीकमध्ये सहभागी झाली होती. या फॅशन वीकमध्ये तिनं रॅम्प वॉक देखील केला. पलकच्या या रॅम्प वॉकचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओला कमेंट करुन काही नेटकऱ्यांनी पलकला ट्रोल केलं आहे. 


ब्लॅक कलरचा ड्रेस आणि हाय हिल्स अशा लूकमध्ये पलकनं फॅशन वीकमध्ये रॅम्प वॉक केला. यावेळी एका स्मार्ट वॉचच्या ब्रँडची ती शो- स्टोपर झाली होती. पलकच्या या रॅम्प वॉकचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी तिला ट्रोल केलं. एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'हा रॅम्प वॉक खूप भीतीदायक आहे.' तर दुसऱ्यानं कमेंटमध्ये लिहिलं, 'तुला रॅम्प वॉक करता येत नाही?' एक युझर म्हणाला, 'राहूदेत, एका व्यक्तीला प्रत्येक गोष्ट येईलच असं नाही. तू रॅम्प वॉक करु नको.'


 


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.