Entertainment News Live Updates 26 March : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 26 Mar 2023 06:05 PM
Prajakta Mali : 'पोस्ट ऑफीस उघडं आहे' या मालिकेत प्राजक्ता माळीची एन्ट्री!

Prajakta Mali On Post Office Ughade Ahe : मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत प्राजक्ता माळी (Prajakta Mali) हे नाव कायमच आघाडीवर असते. तिने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केलं आहे. आता 'पोस्ट ऑफिस उघडं आहे' (Post Office Ughde Ahe) या मालिकेत प्राजक्ताची एन्ट्री होणार आहे. 





Salman Khan : सलमान खानला धमकी देणारा आरोपी अटकेत

Salman Khan Death Threat Accused : बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) गेल्या काही दिवसांपासून धमकी प्रकरणामुळे चर्चेत आहे. आता याप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. सलमानला धमकी दिल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी जोधपूर येथून आरोपी धाकड राम विश्नोईला (Dhakad Ram Bishnoi) अटक केली आहे. मुंबई पोलिसांनी धाकडवर कारवाई केली आहे. त्याने सलमानला ई-मेलद्वारे जीवे मारण्याची धमकी दिली होती.





Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : 'तारक मेहता का उल्टा चष्मा'वर येणार सिनेमा

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Movie : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका गेल्या 15 वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. दिवसेंदिवस या मालिकेच्या लोकप्रियतेत वाढ होत आहे. गेल्या वर्षी निर्मात्यांनी या मालिकेची कार्टून सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आणली होती. ही सीरिज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. आता नुकत्याच एका मुलाखतीत निर्माते असित कुमार मोदी (Asit Kumar Modi) यांनी या लोकप्रिय मालिकेवर सिनेमा येणार असल्याची घोषणा केली आहे. 

Akanksha Dubey : भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबेने वयाच्या 25 व्या वर्षी संपवलं आयुष्य

Akanksha Dubey : भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबेने (Akanksha Dubey) वयाच्या 25 व्या वर्षी आत्महत्या करत आयुष्य संपवलं आहे. तिच्या निधनाने भोजपुरी मनोरंजनसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. आकांक्षाने बनारस येथील एका हॉटेलमध्ये गळफास घेत आत्महत्या केली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास घेत आहेत. 





Nawazuddin Siddhiqui : नवाजने भाऊ आणि पत्नीवर दाखल केला 100 कोटींचा मानहानीचा खटला

Nawazuddin Siddiqui Defamation Case On Brother Ex Wife : नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) हा हिंदी सिनेसृष्टीतील एक दिग्गज अभिनेता आहे. पण सध्या तो सिनेमांसाठी चर्चेत नसून वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. आलियाने (Aaliya Siddiqui) अभिनेत्यावर अनेक आरोप केले आहेत. आता नवाजने भाऊ शमसुद्दीन सिद्दीकी (Shamasuddin Siddhiqui) आणि आलिया सिद्दीकी विरोधात मानहानीचा खटला दाखल केला आहे. 

Salman Khan : ईदच्या मुहूर्तावर सलमानचा 'किसी का भाई किसी की जान' प्रदर्शित होणार नाही

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Release Date : बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानच्या (Salman Khan) आगामी 'किसी का भाई किसी की जान' (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) या सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या सिनेमाचा टीझर आणि गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत. ईदच्या मुहूर्तावर हा सिनेमा रिलीज होणार होता. पण आता या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. 





Rakhi Sawant Ramadan : धर्म बदलल्यानंतर राखी सावंतने पहिल्यांदाच रोजा ठेवला; बुरखा परिधान केलेला व्हिडीओ व्हायरल

Rakhi Sawant First Roza : रमजानला (Ramadan) सुरुवात झाली असून सर्वसामान्यांसह अनेक सेलिब्रिटीदेखील उपवास ठेवत आहेत. बॉलिवूडची 'ड्रामा क्वीन' अर्थात राखी सावंतनेदेखील (Rakhi Sawant) इस्लाम धर्म स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच रोजा ठेवला आहे. राखीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये राखी एका इफ्तार पार्टीत आपला उपवास सोडताना दिसत आहे. 





Bheed Movie Review : मनाला भिडणारा 'भीड'; संवदेशनशीलता हरवलेल्यांसाठी आरसा

Bheed Movie Review : तीन वर्षांपूर्वी देशात कोरोना महासाथीच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. त्यानंतर देशामध्ये सुरू असलेल्या श्रमिकांच्या स्थलांतर संपूर्ण देशाने पाहिले. होत असलेले स्थलांतर पाहून देशाने हळहळ व्यक्त केली होती. तर, काही स्वयंसेवी संस्था, संघटनांनी मदतीचा हात पुढे केला होता. या लॉकडाऊनमधील स्थलांतरात प्रत्येकाची एक गोष्ट होती. काही गोष्टी समोर आल्या, काही गोष्टी पडद्याआड राहिल्या. काही गोष्टींची फक्त लोकांनी कल्पनाच केली. या स्थलांतरात माणूस, त्याचा स्वभाव, त्याच्यावर परिणाम करणारे घटक आणि अनेक वर्षांपासून त्याच्या मनात रुजलेली एक वृत्ती यावर भीड नेमकंपणाने भाष्य करतो. 


Bheed Movie Review : मनाला भिडणारा 'भीड'; संवदेशनशीलता हरवलेल्यांसाठी आरसा

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


ऑस्कर पुरस्कार मिळाल्यानंतर गुनीत मोंगा रुग्णालयात झाली होती अॅडमिट


'द एलिफंट  विस्परर्स' (The Elephant Whisperers)  या माहितीपटाने जगात प्रतिष्ठेचा समजला जाणारा ऑस्कर पटकावला. मात्र, या माहितीपटाच्या निर्माती गुनीत मोंगा यांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते अशी माहिती संगीतकार एम. एम. किरवाणी यांनी दिली. किरवाणी याना आरआरआर चित्रपटातील नाटू नाटू गाण्यासाठी ऑस्कर पुरस्कार मिळाला. गुनीत मोंगा यांनी ऑस्कर पुरस्कार मिळाल्यानंतर आयोजकांवर नाराजी व्यक्त केली होती. पुरस्कार मिळाल्यानंतर आपल्याला व्यक्त होण्याची संधी दिली नाही, आयोजकांनी माईक बंद केला असल्याचा  आरोप मोंगा त्यांनी केला होता. 


'घर बंदूक बिरयानी' च्या टीमचा महाराष्ट्र दौरा


झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे (Nagraj Manjule) प्रस्तुत, आटपाट निर्मित, हेमंत जंगल अवताडे दिग्दर्शित 'घर बंदूक बिरयानी' ( Ghar Banduk Biryani) हा चित्रपट येत्या 7 एप्रिल रोजी प्रदर्शित होत असून, या चित्रपटाच्या निमित्ताने नागराज पोपटराव मंजुळे, सयाजी शिंदे (Sayaji Shinde), आकाश ठोसर (Akash Thosar), सायली पाटील (Sayli Patil) अशी संपूर्ण टीम महाराष्ट्र दौरा करीत आहे. 'घर बंदूक बिरयानी' या चित्रपटाची संपूर्ण टीम चंद्रपूरमध्ये दाखल झाली असून, नागराज पोपटराव मंजुळे आणि सयाजी शिंदे यांनी नक्षलवाद्यांशी स्वतः दोन हात केलेल्या चंद्रपूरमधील C16 बटालियनच्या पोलिसांशी संवाद साधून त्यांच्या सोबत वेळ घालवला.


पुष्पाच्या श्रीवल्लीची ठसकेबाज लावणी


Rashmika Mandanna: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीबरोबरच बॉलिवूडमध्ये देखील विशेष ओळख निर्माण करणारी अभिनेत्री रश्मिका मंदना (Rashmika Mandanna) ही तिच्या ग्लॅमरस अदा आणि स्टाईलनं प्रेक्षकांना घायाळ करते. पुष्पा या चित्रपटामुळे रश्मिकाला विशेष लोकप्रियता मिळाली. या चित्रपटात तिनं श्रीवल्ली ही भूमिका साकारली. 'नॅशनल क्रश' या नावानं रश्मिका ओळखली जाते. रश्मिकाचा चाहता वर्ग मोठा आहे. नुकताच रश्मिकाच्या एका डान्स परफॉर्मन्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये रश्मिका ही ठसकेबाज लावणी सादर करताना दिसत आहे. व्हिडीओमधील रश्मिकाच्या मराठमोळ्या अंदाजानं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.