Entertainment News Live Updates 26 January : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
KL Rahul Athiya Shetty Wedding: अभिनेता सुनिल शेट्टीनं लेकीच्या लग्नाचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले. सुनिलनं शेअर केलेल्या फोटोमध्ये माना शेट्टी आणि अथिया दिसत आहेत.
पाहा फोटो
Gadar 2: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सनी देओलचा (Sunny Deol) 2001 मध्ये प्रदर्शित झालेला 'गदर' हा चित्रपट लोक आजही आवडीने पाहतात. या चित्रपटातील आयकॉनिक 'हँड पंम्प' सिन, चित्रपटातील डायलॉग्स अजही प्रेक्षकांची मनं जिंकतात. या चित्रपटात सनी देओलसोबत अभिनेत्री अमिषा पटेलने (Ameesha Patel) देखील प्रमुख भूमिका साकारली होती. अमिषानं या चित्रपटात सकिना ही भूमिका साकारली. तसेच सनी देओलनं गदर चित्रपटात तारा सिंह ही भूमिका साकारली. आता या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सनी देओलनं सोशल मीडियावर गदर-2 (Gadar 2) या चित्रपटाचं पोस्टर शेअर करुन या चित्रपटाच्या रिलीज डेटची घोषणा केली आहे.
Shyamchi Aai: साने गुरुजी (Sane Guruji) या नावाने सर्वांच्या परिचयाचे असणाऱ्या पांडुरंग सदाशिव साने यांनी लिहिलेल्या 'श्यामची आई' (Shyamchi Aai) या कादंबरीवर आधारित एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचं नाव 'श्यामची आई' असं आहे. आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात जिथे कृष्णधवल चित्रपटांना रंगीन बनवण्याची अद्भूत किमया केली जाते, तिथे 'श्यामची आई' हा चित्रपट कृष्णधवल रूपात पहायला मिळणार आहे. साने गुरुजींच्या अंर्तमनातून आलेली आईच्या आकृतीचे प्रतिबिंब रुपेरी पडद्यावर सादर करण्याचं शिवधनुष्य 'श्यामची आई' या चित्रपटाच्या माध्यमातून उचलण्यात आलं आहे. या चित्रपटाचं नवं पोस्टर नुकतंच रिलीज करण्यात आलं आहे.
Urvashi Rautela: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) ही तिच्या स्टाईलनं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकत असते. उर्वशी ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. उर्वशीच्या ग्लॅमरस स्टाईलला तिच्या चाहत्यांची पसंती मिळते. उवर्शी ही काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या 'वॉलटेर वीरय्या' (Waltair Veerayya) या चित्रपटामधील बॉस पार्टी या आयटम साँगमधून प्रेक्षकांच्या भेटीस आली. या आयटम साँगला नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे. बॉस पार्टी या आयटम साँगसाठी उर्वशीनं किती मानधन घेतलं असेल? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. जाणून घेऊयात उर्वशीनं घेतलेल्या मानधनाबाबत....
Pathaan Box Office Collection Day 1: बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) पठाण (Pathaan) हा चित्रपट काल (25 जानेवारी) प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत होते. अनेकांनी पठाण चित्रपट पाहण्यासाठी अॅडव्हान्स बुकिंग केलं होतं. तर शाहरुखच्या काही चाहत्यांनी पठाण चित्रपट बघण्यासाठी अख्खं थिएटर बुक केलं होतं. आता या चित्रपटानं रिलीज झाल्यानंतर किती कमाई केली? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. जाणून घेऊयात पठाणची पहिल्या दिवसाची कमाई-
पार्श्वभूमी
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
Raveena Tandon : रवीना टंडनला 'पद्मश्री पुरस्कार'; कलाविश्वातील कामगिरीचा सन्मान
Raveena Tandon : आज प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. सिने-अभिनेत्री रवीना टंडनला (Raveena Tandon) 'पद्मश्री पुरस्कार' (Padma Award) जाहीर झाला आहे. रवीनाने 1992 साली 'पत्थर के फूल' या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. या सिनेमातील भूमिकेसाठी तिला फिल्मफेअरचा सर्वोत्तम महिला पदार्पण पुरस्कार मिळाला होता.
परंपरा, जमाना दीवाना, अंदाज अपना अपना, बडे मियां छोटे मियां अशा अनेक सिनेमांचा रवीना टंडन भाग आहे. रविना 1990 च्या दशकामधील बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री असली तरी तिच्या अभिनयासाठी ती विशेष ओळखली जात नसे. पण 2001 साली 'दमन' या सिनेमासाठी तिला सर्वोत्तम अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. तसेच 2003 साली प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या 'सत्ता' या सिनेमातील अभिनयाने समीक्षकांनी कौतुक केले आहे.
Sai Tamhankar : आज राष्ट्रीय पर्यटन दिनी सई ताम्हणकरची मोठी घोषणा! जागतिक पातळीवर करणार महाराष्ट्राचं प्रतिनिधीत्व
Sai Tamhankar : आज 'राष्ट्रीय पर्यटन दिनी' (National Tourism Day) सई ताम्हणकरने (Sai Tamhankar) मोठी घोषणा केली आहे. मराठमोळी अभिनेत्री आता जागतिक पातळीवर महाराष्ट्राचं प्रतिनिधीत्व करताना दिसणार आहे. सईची 'पोस्टकार्ड्स फ्रॉम महाराष्ट्र' (Postcards From Maharashtra) ही वेबसीरिज (Web Series) प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
'पोस्टकार्ड्स फ्रॉम महाराष्ट्र' या वेबसीरिजमध्ये महाराष्ट्रातील ऐतिहासिक प्रार्थनास्थळे, किल्ले, जुनी स्मारके यांच्यापासून ते पुणे आणि नाशिकच्या दिव्य मंदिरांपर्यंतच्या ठिकाणांवर प्रकाश टाकण्यात येणार आहे. तसेच महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरांमधील तोंडाला पाणी सुटणारे खाद्यपदार्थ आणि शॉपिंग ठिकाणांचा शोध घेताना सई दिसणार आहे.
Abdu Rozik : 'बिग बॉस 16'चा छोटा भाईजान अब्दू रोजिकचं नशीब उजळलं; लवकरच 'या' रिअॅलिटी शोमध्ये झळकणार
Abdu Rozik In Big Brother UK : हिंदी रिअॅलिटी शो बिग बॉस 16 (Bigg Boss 16) च्या माध्यमातून प्रत्येकाच्या मनात स्थान निर्माण करणारा स्पर्धक म्हणजे अब्दू रोजिक (Abdu Rozik). अब्दू रोजिक मूळचा तजाकिस्तानचा. अतिशय गरिबीत दिवस काढलेला अब्दू रोजिक आता स्टार झाला आहे. अब्दुला आज जगभरातील लोक ओळखतात. अब्दू रोजिकला भारतातही खूप प्रेम मिळालं आहे. अब्दू रोजिकने 'बिग बॉस 16' मधून स्वेच्छेने एक्झिट घेतली नसती तर कदाचित तो या शोच्या टॉप स्पर्धकांपैकी एक असता. बिग बॉसमधून बाहेर येताच अब्दुला आता एका आंतरराष्ट्रीय रिअॅलिटी शोसाठी ऑफर आली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -