Entertainment News Live Updates 26 December : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
LIVE
Background
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
Netflix Password Sharing: नवीन वर्षात नेटफ्लिक्सचा युजर्सला झटका!
Netflix Password Sharing: जर तुम्ही दुसरं कोणाचं तरी नेटफ्लिक्स (Netflix) वापरत असाल किंवा तुमचा पासवर्ड तुमच्या मित्रांसोबत शेअर करत असाल तर, तुमच्यासाठी एक वाईट बातमी आहे. नेटफ्लिक्स पासवर्ड शेअरिंगबाबत कठोर पावले उचलण्याच्या तयारीत आहे. एका रिपोर्टनुसार, पुढील वर्षापासून (New Year 2023) नेटफ्लिक्स (Netflix) आपल्या युजर्सला घराबाहेरील लोकांसोबत पासवर्ड शेअर करण्याची परवानगी देणार नाही.
Tunisha Sharma: तुनिषाच्या आत्महत्येचं खरं कारण समोर
Tunisha Sharma Latest News: हिंदी टेलिव्हिजन मालिकांमधली अभिनेत्री तुनिशा शर्मानं (Tunisha Sharma) काल आत्महत्या केली. वसईनजिकच्या नायगावमध्ये एका मालिकेचं शूटिंग सुरु असताना ही धक्कादायक घटना घडली. दरम्यान, शवविच्छेदन अहवालात तुनिषाच्या मृत्यूचं कारण गळफास हेच असल्याचं सहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रकांत जाधव यांनी स्पष्ट केलं आहे. तिच्या आईचं म्हणन होतं की, शीझानचं आणि तुनिषाचा ब्रेक अप झालं होतं. त्यामुळं ती नैराश्यात गेली होती. शवविच्छेदन अहवालात गरोदर असल्याबाबत पुष्टी करण्यात आलेली नाही. तसंच लव्ह जिहादचाही काही अँगल नसल्याचं जाधव यांनी म्हटलं आहे. तिच्या हातावर जे बॅन्डेज लावले होते. शीझान खानला 28 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस सर्व बाजूंनी तपास करत असल्याच एसीपी जाधव यांनी म्हटलं आहे.
Chalapathi Rao Death : दाक्षिनात्य ज्येष्ठ अभिनेते चलपती राव यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Chalapathi Rao Death : तेलुगु चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध दिग्गज अभिनेते चलपती राव (Chalapathi Rao) यांचे काल रात्री (शनिवारी) निधन झाले. वयाच्या 78 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज त्यांच्या कटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला असे सांगण्यात येत आहे. त्यांच्या मृत्यूच्या बातमीने चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.
Ranu Mondal : रानू मंडलला बॉयफ्रेंड भेटला?
Ranu Mondal : रातोरात स्टार झालेल्या सेलिब्रिटींच्या यादीत रानू मंडलची (Ranu Mondal) गणना केली जाते. सध्या सोशल मीडियावर रानू मंडलचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती एका मुलासोबत बाईकवर बसलेली दिसत आहे.
View this post on Instagram
Tunisha Sharma Death : ब्रेकअपनंतर 15 दिवसांत नेमकं काय घडलं?
Tunisha Sharma Death Case : अभिनेत्री तुनिषा शर्मा (Tunisha Sharma) आत्महत्या प्रकरण (Tunisha Sharma Death Case) सध्या चर्चेत आहे. गेल्या दोन दिवसांपासून या प्रकरणासंबंधित नव-नवे अपडेट समोर येत आहेत. तुनिषा गेल्या काही दिवसांपासून अभिनेता, सहकलाकार शिझान खानसोबत (Sheezan Khan) रिलेशनमध्ये होती. पण आत्महत्येच्या 15 दिवसांपूर्वीच त्यांचा ब्रेकअप झाला होता. या 15 दिवसांत नेमकं काय घडलं याचा पोलीस सध्या तपास करत आहेत.
Siddarth Jadhav : अन् 'आपला सिद्धू' भाव खाऊन गेला...
Siddarth Jadhav : मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddarth Jadhav) आणि रणवीर सिंह (Ranveer Singh) यांची मैत्री सर्वांवाच ठाऊक आहे. दोघेही नेहमी एकमेकांचे कौतुक करताना दिसतात. मराठमोळा सिद्धु आता बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहसोबत 'सर्कस' (Circus) या सिनेमात झळकत आहे. या सिनेमाच्या प्रमोशन निमित्त 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमात रणवीरने आपल्या सिद्धूचे तोंडभरून कौतुक केले.
View this post on Instagram
Tunisha Sharma Death : आत्महत्येपूर्वी तुनिषा आणि शिझानने एकत्र जेवण केलं होतं; आईची माहिती
Tunisha Sharma Death Latest News : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री तुनिषा शर्माच्या (Tunisha Sharma) आत्महत्येने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. या आत्महत्येप्रकरणी तुनिषाची आई वनिता यांनी पोलिसांना महत्त्वाची माहिती दिली आहे. आत्महत्येपूर्वी तुनिषा आणि शिझान यांनी एकत्र जेवण केलं असल्याचं आईने सांगितलं आहे.
Tunisha Sharma Death : वालीव पोलीस आज तुनिषाच्या मामाची चौकशी करणार
Tunisha Sharma Death : वालीव पोलीस आज तुनिषाच्या मामाची चौकशी करणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तुनिषाच्या ड्रायव्हरच्या मते तुनिशा आणि शिझान एकमेकांचे चांगले मित्र होते. त्यांनी एकत्र जेवणदेखील केलं होतं.