Entertainment News Live Updates 25 November : श्रद्धा वालकर प्रकरणामुळे कंगना दुखावली... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live :  मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 25 Nov 2022 01:06 PM
Maharashtra Shahir : केदार शिंदेंच्या 'महाराष्ट्र शाहीर' सिनेमाचं नवं पोस्टर आऊट; यशवंतराव चव्हाण यांच्या भूमिकेत दिसणार अतुल काळे

Kedar Shinde On Maharashtra Shahir : केदार शिंदेंच्या (Kedar Shinde) 'महाराष्ट्र शाहीर' (Maharashtra Shahir) या सिनेमाची घोषणा झाल्यापासून हा सिनेमा चर्चेत आहे. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या सिनेमाचं नवं पोस्टर आऊट झालं आहे. या सिनेमात महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chauhan) यांच्या भूमिकेत अतुल काळे (Atul kale) दिसणार आहेत. 





Marathi Serial : टीआरपीच्या शर्यतीत 'बिग बॉस मराठी' पडला मागे

Marathi Serial Trp Rating : 'बिग बॉस मराठी'चं चौथं पर्व सुरू होऊन 50 दिवस पूर्ण झाले आहेत. 'बिग बॉस'ची क्रेझ चाहत्यांमध्ये कायम असते. या कार्यक्रमाच्या सुरुवातीपासूनच चाहते हा कार्यक्रम फॉलो करत असतात. पण यंदा मात्र हा कार्यक्रम टीआरपीच्या शर्यतीत मागे पडला आहे. या कार्यक्रमाला 2.5 रेटिंग मिळाले आहे. तर वीकेंडच्या चावडीला 3.0 रेटिंग मिळाले आहे. 

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांची दिल्ली उच्च न्यायालयात धाव

Amitabh Bachchan : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी खासगी अधिकाराच्या संरक्षणासाठी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. हरीश साळवे (Harish Salve) त्यांची बाजू मांडणार आहेत. न्यायमूर्ती नविन चावला (Navin Chawla) यांच्यासमोर ही सुनावणी घेण्यात येईल. 





Kangana Ranaut : "शेवटी राक्षसच जिंकला..."; श्रद्धा वालकर प्रकरणामुळे कंगना दुखावली

Kangana Ranaut Reacts On Shraddha Walkar Case : बॉलिवूडची पंगाक्वीन कंगना रनौत (Kangana Ranaut) नेहमीच कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे चर्चेत असते. आता तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणावर भाष्य केलं आहे. कंगनाने म्हटलं आहे,"ती एक मुलगी होती आणि तिच्या आत एक स्त्रीचं मन होतं".



Amol Kolhe : डॉ. अमोल कोल्हेंचं 'शिवपुत्र संभाजी' महानाट्य लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Amol Kolhe On Shivputra Sambhaji : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे खासदार तसेच मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. अमोल कोल्हेंनी आजवर अनेक ऐतिहासिक भूमिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. आता अमोल कोल्हेंनी चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. 'शिवपुत्र संभाजी' (Shivputra Sambhaji) या महानाट्याच्या माध्यमातून ते आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. 





Bigg Boss Marathi 4 : 'बिग बॉस मराठी'च्या घरातील 'या' सदस्याला थेट रणवीर सिंहचा सपोर्ट

Ranveer Singh On Tejaswini Lonari : 'बिग बॉस मराठी'चं चौथं पर्व (Bigg Boss Marathi 4) पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. बिग बॉस मराठीचा चाहतावर्ग जगभरात आहे. आता बॉलिवूडचा सुपरस्टार रणवीर सिंहनेदेखील (Ranveer Singh) चौथ्या पर्वातील सदस्य तेजस्विनी लोणारीला (Tejaswini Lonari) खास शुभेच्छा दिल्या आहेत. 





Drishyam 2 Box Office Collection : अजय देवगणचा 'दृश्यम 2' 100 कोटींच्या कल्बमध्ये सामील

Drishyam 2 Box Office Collection : 'दृश्यम 2' (Drishyam 2) हा सिनेमा सिनेमागृहात धुमाकूळ घालत आहे. या सिनेमात बॉलिवूड अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) मुख्य भूमिकेत आहे. आता या सिनेमाने रिलीजच्या पहिल्याच आठवड्यात 100 कोटींचा टप्पा पार केला आहे. गेल्या दोन वर्षात अजयचा सुपरहिट होणारा हा तिसरा सिनेमा आहे. 





Happy Birthday Rakhi Sawant : बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत!

Rakhi Sawant : बॉलिवूडची 'ड्रामा क्वीन' राखी सावंत (Rakhi Sawant) आज 42 वा वाढदिवस साजरा करत आहे. आपल्या बेधडक वक्तव्याबद्दल राखी कायम चर्चेत असते. राखीचे खरे नाव नीरू भेडा असं आहे. पण इंडस्ट्रीत आल्यानंतर तिने तिचं नाव बदललं आणि राखी सावंत असं ठेवलं.





पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Alia Bhatt Daughter Name : नीतू आजीनं ठेवलं नातीचं नाव, आलियानं 'राहा' नावाचा अर्थही सांगितला


Alia Bhatt Daughter Name : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांच्या घरी काही दिवसांपूर्वीच चिमुकलीचं आगमन झालं. या लहान बाळाच्या जन्मापासूनच चाहत्यांमध्ये बाळाच्या नावावरून उत्सुकता होती. अखेर आलियाच्या मुलीचे नाव जाहीर करण्यात आले आहे. आलिया-रणबीरने त्यांच्या मुलीचे नाव राहा (Raha) असे ठेवले आहे. हे नाव आजी नीतू कपूरच्या पसंतीने ठेवण्यात आले आहे. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी आपल्या मुलीचे नाव सांगितलेच नाही तर त्या नावाचा अर्थही सांगितला आहे. 


Vertigo Disease : आयुष्मान खुरानाला जडलेला 'व्हर्टिगो' आजार म्हणजे काय?


Vertigo Treatment : आपल्या दमदार अभिनय कौशल्याने बॉलिवूडमध्ये आपली छाप पाडणारा प्रसिद्ध अभिनेता आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) हा देखील एकेकाळी एका आजाराच्या सावटाखाली आला होता. वास्तविक, हा आजार स्वतःच चक्कर येतो. एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आयुष्मानने स्वत: त्याच्या आजाराबाबत खुलासा केला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सहा वर्षांपूर्वी आयुष्मान खुरानाला व्हर्टिगो (Vertigo) नावाचा आजार झाला होता. आजही मला कधीकधी व्हर्टिगोच्या लक्षणांचा सामना करावा लागतो असे आयुष्मानने म्हटले होते. त्याला चक्कर येणे यांसारख्या समस्या भेडसावत होत्या. मात्र, व्हर्टिगो हा आजार नेमका काय आहे? तसेच, या आजाराची लक्षणं कोणती या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.  


व्हर्टिगो आजार म्हणजे नेमकं काय? 


व्हर्टिगोमध्ये, रुग्णाला त्याच्या सभोवतालच्या गोष्टी फिरताना दिसतात. भोवळ येणे, डोकं गरगरणे यांसारख्या समस्या जाणवू लागतात. तसेच, जर संबंधित व्यक्ती एका ठिकाणी बसली असेल तर त्या व्यक्तीला आजूबाजूच्या सर्व वस्तू आणि माणसं फिरताना दिसतात. व्हर्टिगो हा क मानसिक आजार आहे.


Kantara OTT Release : बॉक्स ऑफिसवरील दमदार यशानंतर 'कांतारा' आता ओटीटीवर रिलीज होण्यास सज्ज


Kantara OTT Release : ऋषभ शेट्टीच्या (Rishabh Shetty) 'कांतारा' चित्रपटाने (Kantara Movie) जादू सर्वत्र पसरली आहे. या सिनेमाने केवळ कन्नड भाषेमध्येच नाही तर हिंदी भाषेतही दमदार कामगिरी केली आहे. हा ब्लॉकबस्टर चित्रपट अवघ्या 20 कोटींच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला आहे. या सस्पेन्स थ्रिलर चित्रपटाला भारतभरातील प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले आहे. बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर आता हा सिनेमा आजपासून ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीजसाठी (OTT Platform Release) सज्ज झाला आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.