Entertainment News Live Updates 25 August : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 25 Aug 2022 02:44 PM
‘रिपोर्टर’ बनून शाळेच्या दुरावस्थेची माहिती देणाऱ्या मुलाचा व्हिडीओ व्हायरल! अभिनेता सोनू सूद मदतीसाठी पुढे सरसावला

हातात काठी आणि त्यावर प्लास्टिकची बाटली लावून, त्याचा माईक बनवून आपल्याच शाळेमध्ये रिपोर्टिंग करणारा अवघ्या 12 वर्षांचा हा चिमुकला सरफराज (Sarfaraj) त्याच्या हटके स्टाईलमुळे सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत (Viral Video) आला आहे. त्याचा हा व्हिडीओ पाहून अनेकांनी त्याचे कौतुक केले आहे. त्चाया हा व्हिडीओ आणि शिकण्याची जिद्द पाहून अभिनेता सोनू सूदने त्याला मदतीचा हात दिला आहे.


वाचा संपूर्ण बातमी

'डान्स का भूत', 'ब्रह्मास्त्र'चं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला!

'इमर्जन्सी'मध्ये 'फील्ड मार्शल सॅम माणेकशॉं'ची भूमिका साकारणार मिलिंद सोमण! पाहा लूक...

'इमर्जन्सी' या आगामी चित्रपटामधील अभिनेता मिलिंद सोमणचा फर्स्ट लूक रिलीज झाला आहे. कंगना रनौतच्या या चित्रपटात मिलिंद 'फील्ड मार्शल सॅम माणेकशॉं'ची भूमिका साकारत आहे.


 





राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीत सुधारणा, कॉमेडियनला शुद्ध आल्याची माहिती!

राजू श्रीवास्तव यांना 15 दिवसांनी आज शुद्ध आली आहे. त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात डॉक्टर उपचार करत आहेत. त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे त्यांचे सेक्रेटरी गर्वित नारंग यांनी माहिती देताना सांगितले आहे. जिममध्ये वर्कआऊट करत असताना छातीत दुखू लागल्याने आणि बेशुद्ध झाल्याने 10 ऑगस्ट रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.


 





जॉन अब्राहमचा 'पठाण' चित्रपटातील फर्स्ट लूक रिलीज!

आरक्षणाच्या मुद्द्यावर राजकारण रंगणार, 'राष्ट्र'मध्ये दिसणार विक्रम गोखलेंचा राजकीय बाणा!

विक्रम गोखले यांनी आजवर साकारलेल्या सर्वच व्यक्तिरेखांचं प्रेक्षकांपासून समीक्षकांपर्यंत सर्वांनीच कौतुक केलं आहे. अभिनयाचं चालतं बोलतं विद्यापीठ असं ज्यांचं वर्णन केलं जातं, ते विक्रम गोखले 'राष्ट्र'मध्ये काहीशा अनोख्या रंगात दिसणार आहेत. यात त्यांनी एक धडाकेबाज राजकारणी साकारला आहे. ज्याच्या केवळ शब्दावर संपूर्ण कारभार चालतो, असा राजकीय नेता या चित्रपटात विक्रम गोखलेंनी रंगवला आहे.


 


हृताने शेअर केली ‘अनन्या’च्या संघर्षाची झलक

'शक्य आहे, तुम्ही जे ठरवाल ते शक्य आहे!' असं म्हणत 22 जुलैला 'अनन्या' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटात प्रेक्षकांना 'अनन्या'चा जिद्दीचा प्रवास पाहायला मिळाला. या चित्रपटात अभिनेत्री हृता दुर्गुळे (Hruta Durgule) मुख्य भूमिकेत आहे.  


 





अरुंधतीच्या मनमोहक हास्याने चाहते झाले मोहित!

स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील ‘आई’ अर्थात ‘अरुंधती’ची भूमिका साकारणारी अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर सध्या चाहत्यांची खूप लाडकी आई बनली आहे.


 





‘बनी’च्या शिरपेचात मनाचा तुरा, अमेरिकेतील फिल्म फेस्टिव्हलमध्ये पार पडले स्क्रिनिंग

जगभरातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांपैकी अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या अमेरिकेतील ‘फोर्थ स्मिथ आंतरराष्ट्रीय फेस्टिव्हल’मध्ये निर्माते शंकर धुरी यांच्या ‘आकृती क्रिएशन्स’ निर्मित आणि निलेश उपाध्ये लिखित - दिग्दर्शित 'बनी' (Bunny) या एकमेव मराठी चित्रपटाची निवड झाली आहे. 'बनी'चे स्क्रिनिंग येत्या 27 ऑगस्ट 2022 रोजी, सायंकाळी टेम्पल लाइव्ह येथे होणार आहे. तीस देशांतील शेकडो चित्रपटांच्या प्रवेशिका या महोत्सवासाठी विचारधीन होत्या. त्यातून 137 चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. यात राष्ट्रीय भाषेतील 'गुठली लड्डू' आणि मराठीतील 'बनी' या दोन भारतीय चित्रपटांची निवड झाली.


वाचा संपूर्ण बातमी

Koffee With Karan 7 : कियारा अडवाणीने दिली सिद्धार्थवरील प्रेमाची कबुली

अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) आणि अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) करण जोहरच्या शोमध्ये दिसले. यादरम्यान, करण जोहरने अर्थातच या दोघांशी खूप गप्पा मारल्या. यावेळी अचानक शोचा होस्ट करणने कियाराशी तिच्या लव्ह लाईफबद्दल बोलायला सुरुवात केली. करणने कियाराला तिच्या आणि सिद्धार्थ मल्होत्राच्या (Sidharth Malhotra) नात्याबद्दल प्रश्न विचारले. तर, करणच्या प्रश्नाला उत्तर देताना कियारानेही सांगितले की, ते दोघेही एकमेकांसाठी खूप खास आहेत.


 





‘सनम बेवफा’ फेम प्रसिद्ध निर्माते सावन कुमार टाक यांची प्रकृती खालावली

'सनम बेवफा', 'सौतन' यांसारख्या सुपरहिट बॉलिवूड चित्रपटांचे दिग्दर्शक, निर्माता, लेखक आणि गीतकार सावन कुमार टाक (Saawan Kumar Tak) यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असून ते डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत.



अभिनेता मिलिंद सोमणने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट

बॉलिवूड अभिनेता आणि मॉडेल मिलिंद सोमण (Milind Soman) नेहमीच त्याच्या फिटनेसमुळे चर्चेत असतो. पण आता तो एका वेगळ्या कारणाने चर्चेत आला आहे. मिलिंदने नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदींची (Narendra Modi) भेट घेतली आहे. भेटीचे फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 


 





द काश्मीर फाइल्स’ ऑस्करला जाणार नाही म्हणणाऱ्या अनुराग कश्यपवर अनुपम खेर यांचा पलटवार, म्हणाले...

नुकत्याच एका मुलाखतीदरम्यान, अनुराग कश्यपने यंदा ऑस्करच्या परदेशी श्रेणीमध्ये नामांकनासाठी भारताकडून पाठवल्या जाण्याऱ्या संभाव्य चित्रपटांच्या यादीविषयी काही वक्तव्ये केली, ज्यात त्याने ‘द काश्मीर फाइल्स’बद्दल शंका निर्माण केली. यावर नाराज झालेले अभिनेते अनुपम खेर यांनी आता त्याला चांगलेच सुनावले आहे.


वाचा संपूर्ण बातमी

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


कॉमेडियन कृष्णा अभिषेकचाही ‘द कपिल शर्मा शो’ला गुडबाय! कारण देताना म्हणाला..


कपिल त्याच्या संपूर्ण टीमसोबत कॅनडा दौऱ्यावर होता आणि तिथे त्याने अनेक ठिकाणी त्याचे शो देखील केले. या दौऱ्यात कृष्णा अभिषेकही कपिलसोबत होता. आता टीम मायदेशात परतली आणि आता शोच्या नवीन सीझनची तयारी सुरू केली आहे. दरम्यान, कृष्णा आता या शोचा भाग नसल्याची बातमी समोर आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, कृष्णा अभिषेक याने कपिल शर्मा शो सोडला आहे आणि आता शोच्या चौथ्या सीझनमध्ये तो दिसणार नाही. अभिनेत्याने शो सोडण्यामागील कारण अ‍ॅग्रीमेंट इशू असल्याचे म्हटले आहे. शोचे निर्माते अभिनेता कृष्णाने मागितलेले मानधन देण्यास तयार नाहीत आणि हेच त्याच्या शोमधून बाहेर पडण्याचे मुख्य कारण मानले जात आहे.


सोनाली फोगट यांच्या मृत्यूमागे षडयंत्र? आज शवविच्छेदन होणार, पोलिसांकडून अनैसर्गिक मृत्यूची नोंद


सोनाली फोगाट यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यानं झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं. आज सोनाली फोगाट यांचं पोस्टमार्टम करण्यात येणार आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसारस, पोस्टमार्टमनंतरच सोनाली यांच्या मृत्यूचं कारणं समोर येतील. तसेच, त्यांच्या शरीरावर कोणत्याही प्रकारच्या जखमा आढळून आलेल्या नाहीत. उत्तर गोव्यातील अंजुना येथील रुग्णालयात डॉक्टरांच्या पथकानं त्यांना मृत घोषित केलं. गोवा पोलिसांनी याप्रकरणी अनैसर्गिक मृत्यूची (Unnatural Death) नोंद केली आहे.


विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार ‘शिवप्रताप गरुडझेप’!


छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटकेचा प्रसंग जिवंत करणारा डॉ. अमोल कोल्हेंचा 'शिवप्रताप गरुडझेप' (Shivpratap Garudjhep) हा चित्रपट आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतीच या चित्रपटाच्या रिलीजची घोषणा करण्यात आली आहे. यंदाच्या विजया दशमीच्या मुहूर्तावर अर्थात 5 ऑक्टोबर 2022 रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेते-निर्माते डॉ. अमोल कोल्हे (Amol Kholhe) यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून याची घोषणा केली आहे.


हृतिक रोशन-सैफ अली खानचा दमदार अभिनय, 'विक्रम वेधा'चा धमाकेदार टीझर रिलीज


अभिनेता हृतिक रोशन मोठ्या ब्रेकनंतर ‘विक्रम वेधा’ (Vikram Vedha) या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि हृतिक रोशन (Hrithik Roshan) अभिनित ‘विक्रम वेधा’ या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अ‍ॅक्शन पॅक्ड व्हिज्युअल्स आणि आशयघन कथानक असलेला 'विक्रम वेधा' या हिंदी चित्रपटाचा टीझर म्हणजे प्रेक्षकांसाठी एक आश्चर्याचा सुखद धक्काच आहे. या चित्रपटात ‘वेधा’च्या भूमिकेत अभिनेता हृतिक रोशन झळकणार आहे, तर सैफ अली खान ‘विक्रम’ साकारत आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.