Entertainment News Live Updates 23 October: टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live :  मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 24 Oct 2022 01:36 PM
Pushpa Crakers On Diwali: 'फ्लॉवर नहीं फायर है'; पुष्पाची क्रेझ अजूनही कायम; फटाक्यांवर अल्लू अर्जुनचा फोटो

Pushpa Crakers On Diwali: देशभरात दिवाळी  (Diwali 2022) उत्साहानं साजरी केली जात आहे. अनेक लोक दिवाळीला ] वेगवेगळे फटाके फोडतात. पाऊस, फुलबाजी, रॉकेट, सुतळी बॉम्ब इत्यादी फटाके सध्या मार्केटमध्ये मिळत आहेत. नुकताच काही फटाक्यांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, फटाक्यांच्या बॉक्सवर अभिनेता अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) फोटो लावण्यात आला आहे. हा फोटो अल्लू अर्जुनच्या पुष्पा (Pushpa) चित्रपटातील लूकचा आहे. 



'Baby On Board: 'बेबी ऑन बोर्ड’चा ट्रेलर रिलीज; सीरिज 'या' दिवशी होणार प्रदर्शित

Baby On Board: हल्ली प्रेग्नेंट ही फक्त होणारी आईच नसून होणारे बाबाही असतात. म्हणूनच तर म्हणतात ना ‘वी आर प्रेग्नेंट’. या नऊ महिन्यांचा आनंददायी प्रवास ते एकत्र करतात. मग तो व्यायाम असो, डाएट असो, डॅाक्टरची व्हिजीट असो किंवा मग डोहाळे जेवण असो. असाच गोड अनुभव पाहायला मिळणार आहे सागर केसरकर लिखित, दिग्दर्शित ‘बेबी अॅान बोर्ड’मध्ये  (Baby On Board). नुकताच या सीरिजचा ट्रेलर सोशल मीडियावर झळकला असून यात प्रतिक्षा मुणगेकर आणि अभिजीत आमकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 


Ayushmann Khurrana: भारत-पाकिस्तान सामना पाहण्यासाठी विमानाचं टेकऑफ लांबवलं? आयुष्यमान खुरानाने सांगितला किस्सा

Ayushmann Khurrana:  आयुष्मानचं ट्वीट
आयुष्यमाननं ट्वीटमध्ये लिहिलं,  'ही कथा माझ्या भावी पिढ्यांसाठी आहे. विमानाने उड्डाण करण्यापूर्वी मी मुंबई-चंदीगड फ्लाइटच्या आत शेवटच्या दोन ओव्हर पाहिल्या. विमानातील सर्व प्रवासी त्यांच्या मोबाईलमध्ये सामना बघत होते. मला खात्री आहे की, क्रिकेटप्रेमी असलेल्या पायलटने जाणूनबुजून फ्लाइटचं टेकऑफ 5 मिनिटे लांबवलं असणार आणि त्याबद्दल कोणत्याही प्रवाशानं तक्रार केली नाही.' आयुष्मानच्या या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधले. आयुष्मानच्या या ट्वीटला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स आणि लाइक केलं आहे. 



Raj Thackeray on Har Har Mahadev : हर हर महादेव चित्रपट पाहिल्यानंतर राज ठाकरेंनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले...

Raj Thackeray on Har Har Mahadev:  अभिजीत देशपांडे  दिग्दर्शित  'हर हर महादेव' (Har Har Mahadev)  हा चित्रपट  25 ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचं नुकतेच स्पेशल स्क्रिनिंग पार पडले. लोअर परळ येथील PVR मध्ये या चित्रपटाच्या स्क्रिनिंगचे आयोजन केले होते.  या स्क्रिनिंगला अनेक दिग्गज कलाकारांनी तसेच नेते मंडळींनी हजेरी लावली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी देखील या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगला हजेरी लावली.  यावेळी त्यांनी चित्रपट पाहिल्यानंतर प्रतिक्रिया दिली. 


Amruta Fadnavis: "या देवी सर्वभूतेषु..."; दिवाळीनिमित्त अमृता फडणवीस यांचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

Amruta Fadnavis: अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) या सोशल मीडियावर त्यांनी गायलेली वेगवेगळी गाणी शेअर करत असतात.  यंदा दिवाळीनिमित्त एक नवं गाणं अमृता यांनी गायलं आहे. जय लक्ष्मी माता असं या गाण्याचं नाव आहे.सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करुन या गाण्याबाबत अमृता यांनी माहिती दिली. 


Bigg Boss Marathi 4: बिग बॉसच्या घरामधून मेघा घाडगे बाहेर; स्पर्धकांना म्हणाली, 'सांभाळून राहा'


पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.   


वैशाली ठक्कर प्रकरणात एक्स-बॉयफ्रेंड राहुल नवलानी पोलिसांच्या ताब्यात, आरोपी पूजाचा शोध सुरु


टीव्ही अभिनेत्री वैशाली ठक्करच्या (Vaishali Thakkar) आत्महत्येप्रकरणी (Vaishali Thakkar Suicide Case) इंदूर पोलिसांनी मुख्य आरोपी असणाऱ्या राहुल नवलानी (Rahul Navlani) याला अटक केली आहे. आरोपी राहुल नवलानी याला पोलिसांनी इंदूरमधून अटक केली आहे. वैशालीने आत्महत्या केल्यानंतर तो फरार झाला होता. वैशालीने आपल्या सुसाईड नोटमध्ये राहुल नवलानी आणि त्याची पत्नी दिशा नवलानी यांच्यावर गंभीर आरोप केले होते. तेव्हापासून पोलीस राहुल आणि त्याच्या पत्नीच्या शोधात होते. मात्र, अद्याप राहुलची पत्नी पूजा फरार आहे.


Elnaaz Norouzi : सेक्रेड गेम्स फेम एलनाज नौरोजीकडून अनोख्या पद्धतीने हिजाब चळवळीचं समर्थन 


Elnaaz Norouzi : इराणमधील (Iran) हिजाब विरोधी चळवळ दिवसेंदिवस आक्रमक होताना पाहायला मिळत आहे.  विविध सेलिब्रिटी आणि नेटकऱ्यांकडून इराणमधील हिजाब चळवळीचं समर्थन केलं जात आहे. सेक्रेड गेम्स या वेब सीरिजमधील अभिनेत्री एलनाज नौरोजीने (Elnaaz Norouzi) देखील अनोख्या पद्धतीने या चळवळीचे समर्थन केले असून हिजाबच्या वादात इराणमध्ये मारल्या गेलेल्या महशा अमिनीच्या मृत्यूचा अनोख्या पद्धतीने निषेध केला असून एक खास संदेश देण्याचा प्रयत्न केलाय.  एलनाज नौरोजी आज जर्मनीहून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरली. त्यावेळी तिने समोरच्या बाजूला 'वुमन-लाइफ-फ्रीडम' आणि 'फ्री-इराण' असे लिहिलेला टी-शर्ट घातला होता


ब्रह्मास्त्र या दिवशी ओटीटीवर प्रदर्शित होणार 


आज (रविवारी 23 ऑक्टोबर) रोजी, OTT अॅप डिस्ने प्लस हॉटस्टारनच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या ब्रह्मास्त्र चित्रपटाचा ट्रेलर दाखवण्यात आला आहे. यासोबतच या पोस्टमध्ये ब्रह्मास्त्रच्या ओटीटी रिलीज डेटचीही माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार, पुढील महिन्यात 4 नोव्हेंबर रोजी ब्रह्मास्त्र OTT प्लॅटफॉर्म डिस्ने प्लस हॉटस्टारवर हा चित्रपट प्रदर्शित होईल. ब्रह्मास्त्रचा चित्रपट निर्माता करण जोहरनेही हीच पोस्ट इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. आणि म्हटले आहे की, मोठ्या पडद्यापासून तुमच्या हृदयापर्यंत आणि आता तुमच्या पडद्यावर या वर्षातील सर्वात हिट हिंदी चित्रपट ब्रह्मास्त्र ओटीटी रिलीजसाठी सज्ज आहे. ब्रह्मास्त्रच्या ओटीटी रिलीजच्या घोषणेने चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.