Sanjay Raut: महायुतीमध्ये पालकमंत्री पदांच्या वाटपावरुन प्रचंड  नाराजी नाट्य सुरू असतानाच महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) आणखी एक भूकंप होण्याचे संकेत मिळत आहेत. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेचे आमदार उदय सामंत (Uday Samant) कोणत्याही क्षणी भाजपचा हात पकडू शकतात. यात शिवसेना ठाकरे पक्षाचे 4 आमदार आणि 3 खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटले आहेत. तसेच काँग्रेसचे 5 आमदारही एकनाथ शिंदेंना भेटून गेल्याचा दावा शिवसेनेचे नेते उदय सामंतांनी (Uday Samant) केला आहे. सामंत हे सध्या दावोसच्या दौऱ्यावर आहेत. तिथूनच त्यांनी एक मोठा दावा केला आहे. 


दरम्यान याच मुद्द्यावरून आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर देत खडे बोल सुनावले आहे. उद्योगमंत्री उदय सामंत गुंतवणूक आणण्यापेक्षा शिवसेनेते किती आमदार, खासदार फुटतील हे दावोसमधून सांगत आहेत. दावोसमध्ये बसून एकनाथ शिंदेंना कोण भेटलं, तीन खासदार भेटले, 10 आमदार भेटले हे गुंतवणूक करत आहेत का? त्यांना मुख्यमंत्र्यांनी मुंबईला परत पाठवलं पाहिजे. असेही  संजय राऊत  म्हणाले. 


तुम्ही सरकारी खर्चाने तिथे गेले आहात, त्यावर लाखो डॉलर्स खर्च करत आहात. मात्र तुम्ही उद्योग वाढवण्यापेक्षा शिवसेना राष्ट्रवादीचे किती खासदार, आमदार फोडत आहोत, कसा धक्का देणार हे दावोसला जाऊन सांगत आहात, हे उद्योगमंत्र्यांचे काम आहे का असा सवाल खासदार संजय राऊत यांनी विचारला आहे. 


दावोस हा काय राजकारण करण्याची जागा आहे का?


मुळात दावोस हा काय राजकारण करण्याची जागा आहे का? तुम्ही स्वत: फुटलात ना, तुमच्या कपाळाल बेईमानीची पट्टी लागली आहे. आता संजय राऊत आणि आदित्य ठाकरे, सुनील राऊत हे एकनाथ शिंदेंना भेटले, एलढंच सागंयाच बाकी राहिले आहे. त्याना दुसरं काम काय आहे? दावोसमध्ये गुंतवणूक आणण्यासाठीचे प्रयत्न होताय त्याचे कौतुक केलं पाहिजे. मात्र तुम्ही उद्योग वाढवण्यापेक्षा शिवसेना राष्ट्रवादीचे किती खासदार, आमदार फोडत आहोत, कसा धक्का देणार हे दावोसला जाऊन सांगत आहात, हे उद्योगमंत्र्यांचे काम आहे का? त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी उदय सामंत यांच्या कडून दावोसचा खर्च घेतला पाहिजे, अशी टीका करत खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे.


नेमकं काय म्हणाले उदय सामंत? 



 


हे ही वाचा