Entertainment News Live Updates 24 November : रितेश देशमुखनं शेअर केला 'वेड'चा टीझर

Entertainment Live :  मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 24 Nov 2022 03:41 PM
Richa Chadha: अखेर रिचा चड्ढानं मागितली माफी; गलवान ट्वीट प्रकरणावर सोडलं मौन

Richa Chadha: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री रिचा चड्ढा (Richa Chadha)  ही तिच्या ट्वीटमुळे आणि वक्तव्यांमुळे चर्चेत असते. सध्या रिचा तिच्या एका ट्वीटमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. लष्कराचे कमांडर लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी पीओके संदर्भात एक ट्वीट केलं. या ट्वीटला रिप्लाय करत रिचानं लिहिलं,‘गलवानने HI म्हटलंय’. रिचानं केलेल्या या  रिप्लायनं अनेकांचे लक्ष वेधले. गलवानचा उल्लेख ट्वीटमध्ये करुन भारतीय सैन्याचा अपमान रिचानं केला आहे, असा आरोप काही नेटकरी तिच्यावर करत आहेत. आता रिचानं या प्रकरणावर मौन सोडलं आहे. रिचानं एक ट्वीट शेअर करुन माफी मागितली आहे. 



Ved Teaser: 'नव्या प्रवासाची सुरवात करतो'; रितेशनं शेअर केला 'वेड'चा टीझर

Ved Teaser: 20 वर्ष अभिनय कारकीर्द गाजवल्यानंतर अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) एका आगळ्या वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 30 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या 'वेड' (Ved) या त्यांच्या आगामी चित्रपटाचा टीझर नुकताच सोशल मीडियावर शेअर  झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन स्वतः अभिनेता रितेश देशमुखनं केले आहे तसेच या चित्रपटाद्वारे अभिनेत्री जिनिलिया देशमुख (Genelia D'Souza) ही मराठी चित्रपटात पदार्पण करत आहेत. या पूर्वी जेनेलियानं हिंदी ,तेलगू,तमिळ ,कन्नड आणि मल्याळम अशा तब्बल 5 भाषांमधील चित्रपटांमध्ये काम केले आहे.



Ved Teaser: 'नव्या प्रवासाची सुरवात करतो'; रितेशनं शेअर केला 'वेड'चा टीझर

Ved Teaser: 20 वर्ष अभिनय कारकीर्द गाजवल्यानंतर अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) एका आगळ्या वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 30 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या 'वेड' (Ved) या त्यांच्या आगामी चित्रपटाचा टीझर नुकताच सोशल मीडियावर शेअर  झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन स्वतः अभिनेता रितेश देशमुखनं केले आहे तसेच या चित्रपटाद्वारे अभिनेत्री जिनिलिया देशमुख (Genelia D'Souza) ही मराठी चित्रपटात पदार्पण करत आहेत. या पूर्वी जेनेलियानं हिंदी ,तेलगू,तमिळ ,कन्नड आणि मल्याळम अशा तब्बल 5 भाषांमधील चित्रपटांमध्ये काम केले आहे.



Richa Chadha: रिचा चड्ढाच्या ट्वीटची चर्चा; गलवानचा उल्लेख करत भारतीय सैन्याचा अपमान केल्याचा नेटकऱ्यांकडून आरोप

Richa Chadha: अभिनेत्री रिचा चड्ढा (Richa Chadha) नेहमीच तिच्या वक्तव्यांमुळे किंवा ट्विट्समुळे चर्चेत असते. नुकतंच तिने एक केलेल्या ट्विटमुळे नव्या वादाला तोंड फुटलंय. गलवानचा उल्लेख ट्वीटमध्ये करुन भारतीय सैन्याचा अपमान रिचानं केला आहे, असा आरोप काही नेटकरी तिच्यावर करत आहेत.  









Vikram Gokhale: "अफवांवर विश्वास ठेवू नका, विक्रम गोखलेंवर उपचार सुरु"; स्नेही राजेश दामलेंची माहिती

Vikram Gokhale:  ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांची प्रकृती चिंताजनक आहे. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर  (Deenanath Mangeshkar Hospital) रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. राजेश दामले यांनी विक्रम गोखले यांच्या प्रकृतीविषयी माहिती दिली आहे. 



Drishyam 2 Collection Day 6: 'दृश्यम-2' चा बॉक्स ऑफिसवर धमाका; सहा दिवसात केली एवढी कमाई

Drishyam 2 Collection Day 6:  'दृश्यम 2'चे ओपनिंग डे कलेक्शन 15.38 कोटी रुपये होते. तर या चित्रपटानं दुसऱ्या दिवशीही चांगली कमाई केली. या चित्रपटानं 21.59 कोटींची कमाई दुसऱ्या दिवशी केली. तसेच दृश्यम-2 नं तिसऱ्या दिवशी 27.17 कोटींची कमाई केली तर चौथ्या दिवशीही चित्रपट चांगले कलेक्शन करण्यात यशस्वी ठरलाय. चौथ्या दिवशी या चित्रपटानं 11.87 कोटी रुपयांची कमाई केली. 'दृश्यम 2' ने 5 व्या दिवशी 10.48 कोटी रुपयांची कमाई केली. बुधवारी (23 नोव्हेंबर) या चित्रपटानं 10 कोटी कमावले. आता या चित्रपटाची एकूण कमाई  96.49 कोटी एवढी झाली आहे. 

Birthday Special Salim Khan: कुटुंबाचा विरोध असूनही हेलन यांच्यासोबत बांधली लग्नगाठ; सलीम खान यांची लव्ह स्टोरी माहितीये?

Birthday Special Salim Khan: बॉलिवूडमधील ज्येष्ठ पटकथा लेखक, अभिनेते आणि चित्रपट निर्माते सलीम खान (Salim Khan) यांचा आज 87 वा वाढदविस आहे. 24 नोव्हेंबर 1935 रोजी इंदूर येथे सलीम खान यांचा जन्म झाला. अनेक हिट चित्रपटांचे लेखन केले. त्यांनी जंजीर (zanjeer) या अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या हिट चित्रपटाचे पटकथा लेखन केले. सलीम हे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असतात. जाणून घेऊयात सलीन खान आणि ज्येष्ठ अभिनेत्री हेलन (Helen) यांच्या लव्ह स्टोरीबाबत...



Vikram Gokhale: विक्रम गोखले यांची प्रकृती चिंताजनक; डॉक्टरांकडून प्रयत्न सुरू, दीनानाथ रुग्णालयाकडून माहिती

Vikram Gokhale: ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांची प्रकृती चिंताजनक आहे. डॉक्टरांकडून प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती दीनानाथ रुग्णालयाकडून मिळत आहे. काल रात्री विक्रम गोखले यांच्या मुलीनं ANI ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं की, 'ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती गंभीर असून ते लाइफ सपोर्टवर आहेत.  त्याच्यासाठी प्रार्थना करत राहा.' विक्रम गोखले यांच्या पत्नी वृषाली गोखले यांनी एबीपी न्यूजला विक्रम गोखले यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली. त्या म्हणाल्या,'ते काल कोमामध्ये गेले होते. त्यानंतर त्यांनी काहीही रिस्पॉन्स दिलेला नाही.'



पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Shehzada Teaser: कार्तिक आणि क्रितीच्या 'शहजादा' चा टीझर रिलीज


Shehzada Teaser: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) हा त्याच्या अभिनयानं प्रेक्षकांचे मनोरंजन करतो. कार्तिकच्या भूल भूलैया-2 या चित्रपटानं कोट्यवधींची कमाई केली. कार्तिकच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघतात. लवकरच तिचा त्याचा 'शहजादा' (Shehzada)  हा चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटात कार्तिकसोबतच अभिनेत्री क्रिती सेनन (Kriti Sanon) देखील प्रमुख भूमिका  साकारली आहे. नुकताच  'शहजादा' या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. या टीझरला काही नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. 


'अगं अगं सूनबाई, काय म्हणता सासूबाई' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला


Aga Aga Sunbai Kay Mhanta Sasubai : नाटक, सिनेमे, वेबसीरिज कितीही आल्या तरी छोट्या पडद्याची गंमत निराळी आहे. सध्या वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करणाऱ्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. 'अगं अगं सूनबाई, काय म्हणता सासूबाई' (Aga Aga Sunbai Kay Mhanta Sasubai) असं या मालिकेचं नाव आहे. घराघरात घडणारी सासू सूनांची भांडणं विनोदी पद्धतीने या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. सासू सुनेच्या नात्यामध्ये येणारे तीढे विनोदी ढंगाने सोडवत हसत खेळत जगताना त्यांच्यातल्या नात्याची वीण घट्ट होत जाते. घराघरात घडणाऱ्या सासू सूनांच्या भांडणाना विनोदाच्या आरशात बघण्याची संधी ही गोष्ट प्रेक्षकांना मिळवून देईल. 'अगं अगं सुनबाई काय म्हणता सासूबाई' ही मालिका प्रेक्षकांना 21 डिसेंबरपासून बुधवार ते शनिवार रात्री 10 वा. झी मराठीवर पाहायला मिळणार आहे.


Pooja Bhatt: सेलिब्रेटींना पैसे देऊन भारत जोडो यात्रेत आणलं? नितेश राणेंच्या आरोपावर पूजा भटने मौन सोडले..


Bharat Jodo Yatra: काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो यात्रेमध्ये (Bharat Jodo Yatra) अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले. ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर (Amol Palekar) यांनी नुकताच भारत जोडो यात्रेत सहभाग घेतला. तसेच अभिनेत्री पूजा भट (Pooja Bhatt), रश्मी देसाई (Rashami Desai) यांनी देखील या यात्रेमध्ये सहभाग घेतला. आता नितेश राणे यांनी एक ट्वीट करुन भारत जोडो यात्रेत सहभागी होणाऱ्या सेलिब्रिटींवर आरोप केला आहेत. या सेलिब्रिटींना भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी पैसे दिले जातात, असा आरोप नितेश राणे यांनी एक ट्वीट शेअर करुन केला आहे.  

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.