Entertainment News Live Updates 24 February : कॅनडाचं नागरिकत्व सोडून भारतीय होणार खिलाडी कुमार

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 24 Feb 2023 12:07 PM
Akshay Kumar : कॅनडाचं नागरिकत्व सोडून भारतीय होणार खिलाडी कुमार

Akshay Kumar On Canada Passport : खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमारची (Akshay Kumar) गणना बॉलिवूडच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांच्या यादीत केली जाते. सध्या 'सेल्फी' (Selfiee) या सिनेमामुळे अभिनेता चर्चेत आहे. दरम्यान एका मुलाखतीत अक्षय कुमारने कॅनडाचं नागरिकत्व (Canadian Citizenship) सोडणार असल्यावर भाष्य केलं आहे. 

ABP Network Ideas Of India Summit 2023 : 'आयडियाज ऑफ इंडिया समिट'मध्ये आयुष्मान खुरानाची हजेरी

ABP Network Ideas Of India Summit 2023 : 'आयडियाज ऑफ इंडिया समिट' (ABP Network Ideas Of India Summit 2023) हा एबीपी नेटवर्कचा (ABP Network) कार्यक्रम आज पार पडणार आहे. 'नया इंडिया, लुकिंग इनवर्ड, रिचिंग आऊट' अशी या कार्यक्रमाची थिम आहे. 24-25 फेब्रुवारी दरम्यान, हा कार्यक्रम पार पडणार असून या कार्यक्रम अभिनेता आयुष्मान खुरानादेखील (Ayushmann Khurrana) सहभागी होणार आहे.

Javed Akhtar : जावेद अख्तर यांच्या 'त्या' वक्तव्यावर भडकला Ali Zafar; म्हणाला, "तुमच्या बोलण्यानं अनेकांच्या भावना दुखावल्यात"

Ali Zafer On Javed Akhtar : बॉलिवूडचे लोकप्रिय गायक जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी पाकिस्तानातील एका कार्यक्रमात "26/11 च्या मुंबई हल्ल्याचे सूत्रधार अजूनही तुमच्या देशात खुलेआम फिरत आहेत", असं वक्तव्य केलं आहे. जावेद अख्तर यांच्या या वक्तव्याचं भारतीय मंडळी कौतुक करत आहेत. तर दुसरीकडे पाकिस्तानमधील कलाकार टीका करत आहे. अशातच पाकिस्तानी गायक आणि अभिनेता अली जफरने जावेद अख्तर यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. 








 






 











Rakhi Sawant On Adil : "आदिल ड्रायव्हर आहे, झोपडपट्टीत राहतो"; सत्य समोर येता राखी हादरली

Rakhi Sawant On Adil Khan Durrani : बॉलिवूडची 'ड्रामा क्वीन' राखी सावंत (Rakhi Sawant) सध्या तिचा पती आदिल खान दुर्रानीमुळे (Adil Khan Durrani) चर्चेत आहे. काही महिन्यांपूर्वी राखी आदिलसोबत लग्नबंधनात अडकली होती. गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री त्याच्या पतीबद्दल नव-नवीन खुलासे करत आहे. नुकत्याच एका मुलाखतीत राखी म्हणाली की,"आदिल शोरुमचा मालक नसून ड्रायव्हर आहे". 





Sridevi : जाणून घ्या वयाच्या चौथ्या वर्षी सिनेसृष्टीत पदार्पण करणाऱ्या श्रीदेवींबद्दल...

Sridevi : बॉलिवूडची 'चांदनी' अशी ओळख असणाऱ्या अभिनेत्री श्रीदेवी (Sridevi) यांची आज पुण्यतिथी आहे. त्यांच्या निधनाला (Death Anniversary) पाच वर्षे झाले असले तरी आजही चाहत्यांच्या मनात त्या जिवंत आहेत. श्रीदेवी यांचे पूर्ण नाव 'श्री अम्मा यंगर अय्यप्पन' असे आहे. त्यांनी हिंदीसह, तेलुगू, तामिळ, मल्याळम आणि कन्नड भाषेंतील सिनेमांत काम केलं आहे. 





Selena Gomez : अमेरिकन गायिका सेलेना गोमेजचे इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स

Salena Gomez Instagram Followers : लोकप्रिय अमेरिकन गायिका सेलेना गोमेजचं (Salena Gomez) नाव सध्या जगभरात चर्चेत आहे. सेलेनाचा मोठा चाहतावर्ग असून तिचे इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स (Instagram Followers) आहेत. सेलेनाआधी कायली जेनर (Kylie Jenner) या मॉडेलचे इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स होते. पण आता सेलेनाने कायलीला मागे टाकलं आहे. 





पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Musandi Marathi Movie: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘मुसंडी’ चित्रपटाचं पोस्टर अनावरण


Musandi Marathi Movie: यूपीएससी (UPSC) आणि एमपीएससी (MPSC) या परीक्षांमध्ये यश मिळवणं सोपं नाही, पण वाटतं तितकं कठीणही नाही. निश्चित ध्येय, एकाग्रपणे आणि चिकाटीने अभ्यास करण्याची वृत्ती यामुळे या परीक्षांत यश नक्कीच मिळू शकतं, हे सांगणाऱ्या ‘मुसंडी’ (Musandi) या चित्रपटाचे पोस्टर अनावरण नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते करण्यात आले. गोवर्धन दोलताडे लिखित, निर्मित आणि शिवाजी दोलताडे दिग्दर्शित 'मुसंडी'  हा मराठी चित्रपट 26 मे ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.   


आरआरआर चित्रपट अमेरिकेतील 200 हून अधिक चित्रपटगृहात पुन्हा होणार रिलीज


RRR: दिग्दर्शक एस.एस. राजामौली (SS Rajamouli) यांच्या आरआरआर (RRR) या चित्रपटानं भारतीय चित्रपटसृष्टीचं नाव सातासमुद्रापार पोहोचवलं आहे.  गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यातील बेस्ट ओरिजिनल साँग मोशन पिक्चर कॅटगिरीमधील पुरस्कार 'आरआरआर' मधील नाटू नाटू (Naatu Naatu) या गाण्यानं पटकावला. तसेच स्टीव्हन स्पीलबर्ग, जेम्स कॅमेरून आणि एडगर राइट यांसारख्या हॉलिवूडमधील दिग्गजांनी आरआरआर या चित्रपटाचं कौतुक केलं. आता हा चित्रपट अमेरिकेतील 200  हून अधिक चित्रपटगृहांमध्ये पुन्हा प्रदर्शित करण्याचा निर्णय अमेरिकन डिस्ट्रीब्यूटर कंपनी वेरिएंस फिल्म्स (Variance Films) नं घेतला आहे. वेरिएंस फिल्म्सनं एक ट्वीट शेअर करुन ही माहिती दिली आहे. 
Company logo


Mrs Chatterjee Vs Norway Trailer: 'मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे' चा ट्रेलर रिलीज


Mrs Chatterjee Vs Norway Trailer: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री राणी मुखर्जी (Rani Mukerji) ही गेली अनेक वर्ष अभिनयक्षेत्रात काम करत आहे. वेगवेगळ्या विषयांवरील आधारित चित्रपटांमध्ये राणीनं काम केलं. सध्या राणी तिच्या आगामी चित्रपटाच्या ट्रेलरमुळे चर्चेत आहे. राणीच्या 'मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे' (Mrs Chatterjee Vs Norway) या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. हा ट्रेलर रिलीज होताच, अनेकांनी  या चित्रपटाच्या ट्रेलरमधील राणीच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे.  'मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे'  या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दिसत आहे की, देविका चॅटर्जी ही तिच्या दोन मुलांसाठी लढा देत आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.