Entertainment News Live Updates 23 June : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
LIVE
Background
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
अभिनेत्री केतकी चितळेला जामीन मंजूर
आपल्या वादग्रस्त आणि बेधडक वक्तव्यांमुळे चर्चेत असणारी मराठमोळी अभिनेत्री केतकी चितळेने राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट केली होती. त्यामुळे तिला अटक करण्यात आली होती. पण आता केतकीला जामीन मंजूर झाला आहे.
मराठी सिनेसृष्टीचे महानायक अशोक सराफ येणार 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर
'कोण होणार करोडपती' हा कार्यक्रम आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या कार्यक्रम अनेकांसाठी स्वप्नपूर्तीचा मंच ठरतो आहे. मनोरंजनसृष्टीतील अथांग सागरामध्ये अभिनयाचं स्वतंत्र बेट असणारे विनोदाचे बादशाह अशोक सराफ (Ashok Saraf) ज्ञान आणि मनोरंजनाच्या अद्भुत खेळात म्हणजे 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर सहभागी होणार आहेत.
राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनकार्यावर भव्य चित्रपट निर्मिती; वरुण सुखराज करणार दिग्दर्शन
अलीकडच्या काळात मराठी चित्रपटसृष्टीत ऐतिहासिक चित्रपटांची निर्मिती मोठया प्रमाणावर होताना दिसतेय आणि रसिकप्रेक्षकही त्याला मनापासून दाद देताना दिसताहेत. अशाच वेळी महाराष्ट्राच्या आणि देशाच्याही इतिहासात मानाचं आणि अभिमानाचं स्थान असलेल्या लोककल्याणकारी राजे राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनकार्यावर आधारित भव्य मराठी चित्रपटाच्या निर्मीतीची घोषणा करण्यात आली आहे. चित्रपटाचे नाव आहे... 'शाहू छत्रपती'.
'भूल भुलैया 2' अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा'चा रेकॉर्ड मोडणार? लवकरच पार करणार 200 कोटींचा टप्पा
बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनचा 'भूल भुलैया 2' हा सिनेमा नुकताच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला असला तरी सिनेमागृहात धुमाकूळ घालत आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 183.24 कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे हा सिनेमा अल्लू अर्जुनच्या पुष्पाचा रेकॉर्ड मोडणार असे म्हटले जात आहे.
ज्यांचा कडक असेल डान्स त्यांना मिळेल चान्स; चिंचि चेटकीन शोधणार लिटिल मास्टर्स
‘डान्स महाराष्ट्र डान्स’हा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. झी मराठी लवकरच 'डान्स महाराष्ट्र डान्स लिटिल मास्टर्स' हा कथाबाह्य कार्यक्रम घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा कार्यक्रम खास लहान मुलांसाठी असणार आहे.
Urfi Javed Video: चक्क वायरपासून उर्फीनं तयार केला ड्रेस
पहा व्हिडीओ:
View this post on Instagram
ठिपक्यांची रांगोळी मालिकेत नवा ट्विस्ट; अभिनेत्री वीणा जगतापची होणार एन्ट्री
स्टार प्रवाहवरील ठिपक्यांची रांगोळी (Thipkyanchi Rangoli) मालिकेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. कानेटकर कुटुंब प्रेक्षकांच्या कुटुंबाचाच एक भाग झालंय. लवकरच या कुटुंबात नव्या सदस्याची एन्ट्री होणार आहे. या नव्या सदस्याचं नाव आहे अवंतिका कानेटकर चौधरी. अवंतिका ही विनायक कानेटकरांची मुलगी आहे . प्रेमविवाह केला म्हणून तिला कुटुंबापासून कायमचं दूर करण्यात आलं. इतक्या वर्षांनंतर पुन्हा अवंतिका कानेटकर कुटुंबात दाखल होणार आहे. अवंतिकाच्या येण्याचं नेमकं कारण काय याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री वीणा जगताप (Veena Jagtap) अवंतिकाची भूमिका साकारत असून ही भूमिका साकारण्यासाठी ती अतिशय उत्सुक आहे.
Prithviraj Sukumaran: पृथ्वीराजनं घेतली लग्झरी गाडी
पाहा व्हिडीओ:
View this post on Instagram
कुणाचं 20 तर, कुणाचं 8 कोटी! 'शमशेरा' मधील कलाकारांचं मानधन ऐकून थक्क व्हाल
Shamshera : शमशेरा (Shamshera) या बिग बजेट चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहात आहेत. अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor), अभिनेत्री वाणी कपूर (Vaani Kapoor) आणि संजय दत्त (Sanjay Dutt) अशी तगडी स्टार कास्ट असणारा 'शमशेरा' (Shamshera) चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. काल (21 जून) या चित्रपटाचा अंगावर शहारे आणणारा टीझर रिलीज झाला आहे. या चित्रपटासाठी कलाकारांनी कोट्यवधींचे मानधन घेतलं आहे.
शमशेरामधील वाणी कपूरचा लूक रिलीज
पाहा वाणीचा लूक
View this post on Instagram