Entertainment News Live Updates 21 November : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live :  मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 21 Nov 2022 06:06 PM
Jeetendra: ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली

Jeetendra: माझी मुलगी एकता कपूर ही लंडनला आहे. एकताला एक स्टुडिओ तयार करायचा आहे. इतर राज्यातून तिला बोलवणं येत होतं. त्यासाठी आपल्याच राज्यात हा स्टुडिओ उभारावा, मी यासाठी मागणी केली. असं जितेंद्र यांनी सांगितलं.  जितेंद्र यांच्या या मागणीला  मुख्यमंत्री यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.  मुंबईच्या जवळपास जमीन मिळवून देण्यास मुख्यमंत्री जितेंद्र यांना सहकार्य करतील. 

Hanuman Teaser: 'यांच्याकडून शिका!'; 'हनुमान'चा टीझर रिलीज होताच नेटकऱ्यांनी साधला 'आदिपुरुष' वर निशाणा

Hanuman Teaser: गेल्या काही दिवसांपासून आदिपुरुष (Adipurush) हा चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटाचा टीझर रिलीज झाल्यानंतर अनेकांनी या टीझरमध्ये वापरण्यात आलेल्या VFX ला तसेच कलाकारांच्या लूकला ट्रोल केलं. आता नुकताच हनुमान या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. या चित्रपटात देखील VFX चा वापर करण्यात आला. पण हनुमान (Hanuman) चित्रपटाचा टीझर पाहिल्यानंतर काही नेटकरी आदिपुरुष चित्रपटाच्या टीझरवर निशाणा साधत आहेत. 


Ameya Khopkar: "मल्टिप्लेक्सचालक नालायकपणा करतायत"; गोदावरी, सनी चित्रपटांचे शो कमी केल्यानं अमेय खोपकर संतापले

Ameya Khopkarगोदावरी (Godavari) आणि सनी (Sunny) या मराठी चित्रपट (Marathi Movie) प्रेक्षकांची गर्दी खेचत आहेत. पण या चित्रपटांचे शोज सोमवारी (21 नोव्हेंबर) कमी करण्यात आले आहेत. हे संतापजनक आणि दुर्दैवी आहे, अशा शब्दात मनसेचे नेते अमेय खोपकर (Ameya Khopkar) यांनी संताप व्यक्त केला.  मल्टिप्लेक्सचालक नालायकपणा करतायत, म्हणूनच त्यांना पुन्हा धडा शिकवण्याची वेळ आलीय, असा इशार अमेय खोपकर यांनी ट्वीटच्या माध्यमातून दिला आहे. 



Drishyam 2 : सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर 'दृश्यम 2' ओटीटीवर होणार रिलीज

Drishyam 2 : बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा (Ajay Devgn) 'दृश्यम 2' (Drishyam 2) हा सिनेमा सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घालत आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. आता सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर हा सिनेमा प्रेक्षकांना घरबसल्या पाहता येणार आहे. 

Prajaktta Mali: चाहत्याचा प्राजक्ताला सवाल 'लग्न करु की नको?', अभिनेत्री उत्तर देत म्हणाली, 'माझा भरवसा नाही'

Prajaktta Maliमराठी चित्रपट आणि मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajaktta Mali) ही सोशल मीडियावर वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते नुकताच प्राजक्तानं मराठमोळ्या लूकमधील फोटो शेअर केला. या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळाली. प्राजक्ताच्या या फोटोला एका नेटकऱ्यानं हटके कमेंट केली आहे. या कमेंटला प्राजक्तानं दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 



Click : शब्दावाचुन कळले सारे...; 'क्लिक' मूकनाट्याचं दिग्गजांकडून कौतुक

Click Mime Show : कुठल्याही प्रकारे शब्दांचा वापर न करता करण्यात आलेले नाट्य म्हणजे मूकनाट्य (Mime). गेल्या काही दिवसांपासून 'क्लिक' (Click) हे दोन अंकी मूकनाट्य रंगभूमीवर धुमाकूळ घालत आहे. विपुल काळेने (Vipul Kale) या मूकनाट्याच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.





Lokmanya : 'लोकमान्य' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

Lokmanya : मुंबई-पुण्यातील काही भागांत 'सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? अशा आशयाचे होर्डिंग लावण्यात आले. या पोस्टरमुळे अनेक चर्चांना उधाण आलं. पण ते होर्डींग कोणी लावले याबाबत कोणतीही माहिती समोर आली नव्हती. अखेर हे पोस्टर 'लोकमान्य' मालिकेच्या प्रमोशनसाठीचे असल्याचा उलगडा झाला आहे. 





Hemant Dhome : थिएटर मालकांवर हेमंत ढोमेने साधला निशाणा

Hemant Dhome : मराठी अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमे सध्या त्याच्या ‘सनी’ या चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असणारा हेमंत अनेकदा त्याच्या चित्रपटांसंबंधी अपडेट चाहत्यांशी शेअर करत असतो. याशिवाय तो अनेकदा मराठी चित्रपटांच्या सद्य परिस्थितीकडेही सर्वांचं लक्ष वेधून घेताना दिसतो. आताही असंच काहीसं घडलं आहे. मराठी चित्रपट आणि बॉक्स ऑफिसबद्दल हेमंत ढोमेनं केलेलं एक ट्वीट सध्या सोशल मीडियावर बरंच चर्चेत आहे.





Happy Birthday Monalisa : Happy Birthday Monalisa : शेकडो सिनेमे ते कोट्यवधींची कमाई; जाणून घ्या भोजपुरी अभिनेत्री मोनालिसाबद्दल...

Monalisa : भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा (Monalisa)इंडस्ट्रीतील टॉपच्या अभिनेत्रीपैकी एक आहे. आज ती तिचा 40 वा वाढदिवस साजरा करत आहे. मोनालिसा तिच्या सिनेमांसह वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत असते. 





IFFI 2022 : भारतीय चित्रपटसृष्टीतील Personality Of The Year चिरंजीवी यांना जाहीर!

IFFI 2022 : 53 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला (International Film Festival 2022) सुरुवात झाली आहे. या पुरस्कार सोहळ्यात दाक्षिणात्य अभिनेता चिरंजीवी (Chiranjeevi) यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय व्यक्तिमत्त्वाचा पुरस्काराने (Personality Of The Year) सन्मानित करण्यात आले. चिरंजीवी यांचा दाक्षिणात्य सिनेसृष्टीत चांगलाच दबदबा आहे. आपल्या दमदार अभिनयाने त्यांनी जगभरातील चाहत्यांना वेड लावलं आहे. 



पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Govinda Naam Mera trailer Out : सस्पेन्सबरोबर कॉमेडीचा तडका; 'गोविंदा नाम मेरा' चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज


Govinda Naam Mera trailer Out : बहुप्रतिक्षित 'गोविंदा नाम मेरा' (Govinda Naam Mera) या सिनेमाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal), भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) आणि कियारा अडवाणी (Kiara Advani) यांनी अभिनय केलेल्या या सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहात होते. आता या सिनेमाच्या ट्रेलरने चाहत्यांची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. या सिनेमाच्या ट्रेलरने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.


Drishyam 2 : अजयच्या 'दृश्यम 2'मध्ये झळकतोय मराठमोळा चेहरा


Siddharth Bodke On Drishyam 2 : बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा (Ajay Devgn) 'दृश्यम 2' (Drishyam 2) हा सिनेमा सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घालत आहे. या सिनेमातील सर्वच कलाकारांचं त्यांच्या दमदार अभिनयासाठी कौतुक होत आहे. पण दुसरीकडे या सिनेमातील एका मराठमोळ्या चेहऱ्याने सिने-प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.  


Aindrila Sharma Death: अभिनेत्री अँड्रिला शर्माची मृत्यूशी झुंज अपयशी; वयाच्या 24 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास


Aindrila Sharma Death: बंगाली अभिनेत्री अँड्रिला शर्माचं (Aindrila Sharma)निधन झालं आहे. तिनं वयाच्या 24 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून अँड्रिलाची प्रकृती चिंताजनक होती. काही दिवसांपासून अँड्रिला ही कोमामध्ये होती. ब्रेन स्ट्रोक आणि हृदयविकाराच्या झटक्याने कोलकाता येथील रुग्णालयात उपचारादरम्यान अँड्रिला शर्मा यांचा मृत्यू झाला. 


Chup On OTT : सनी देओल अन् दुलकर सलमानचा 'चुप' ओटीटीवर होणार रिलीज


Chup On OTT : बॉलिवूड अभिनेता दुलकर सलमान (Dulkar Salman) आणि सनी देओलच्या (Sunny Deol)  'चुप: रिवेंज ऑफ द आर्टिस्ट' (Chup: Revenge of the Artist) या सिनेमाने सिनेमागृहात चांगलाच धुमाकूळ घातला. आता हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होण्यास सज्ज आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.