एक्स्प्लोर

Entertainment News Live Updates 21 December : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live :  मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

LIVE

Key Events
Entertainment News Live Updates 21 December : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Background

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

Gadad Andhar Teaser: पाण्याखालचं विश्व दाखवणारा 'गडद अंधार'

Gadad Andhar Teaser: पाणी आणि मानवी जीवन यांचं नातं अतूट आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'अवतार : द वे आॅफ वॅाटर' या हॅालिवूड चित्रपटात प्रगत तंत्रज्ञानाच्या आधारे पाण्याखालचं विश्व दाखवण्यात आलं आहे. तंत्रज्ञानाच्या या शर्यतीत मराठी चित्रपटही कुठेच मागे नसल्याचं दर्शवणारा सुपर नॅचरल थ्रीलर 'गडद अंधार' हा चित्रपट 3 फेब्रुवारी 2023 ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा टिझर सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आला आहे. पाण्याखालचं अद्भुत आणि रहस्यमय विश्व दाखवणारा 'गडद अंधार' चा टीझर उत्सुकता वाढवणारा आहे. या चित्रपटात नेमकं काय पहायला मिळणार याबाबतचं कुतूहल जागं करणाऱ्या या टिझरला नेटकऱ्यांचा भरभरून प्रतिसाद मिळत असून, सिनेप्रेमींद्वारे 'गडद अंधार'चा टिझर शेअर करण्यात येत आहे.

अर्जुन कपूरच्या 'कुत्ते'चा टीझर आऊट

Kuttey Trailer Out Now : बॉलिवूडचा सुपरस्टार अर्जुन कपूर (Arjun Kapoor) सध्या त्याच्या आगामी 'कुत्ते' (Kuttey) सिनेमामुळे चर्चेत आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर आऊट झाला आहे. लोकप्रिय दिग्दर्शिक विशाल भारद्वाज (Vishal Bhardwaj) या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहे. 

Bigg Boss Marathi 4 : एक घर, 100 दिवस आणि 16 स्पर्धकांचा प्रवास संपणार

Bigg Boss Marathi 4 : 'बिग बॉस' (Bigg Boss) हा छोट्या पडद्यावरील वादग्रस्त कार्यक्रम चाहत्यांच्या पसंतीस उतरत असतो. पण यंदाचं बिग बॉस मराठीचं चौथं पर्व प्रेक्षकांच्या पसंतीस उतरण्यात कमी पडलं. अखेर आता हा कार्यक्रम प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. लवकरच 'बिग बॉस मराठी'च्या (Bigg Boss Marathi 4) चौथ्या पर्वाचा महाअंतिम सोहळा रंगणार आहे. 

Avatar 2 Box Office Collection : निळ्या विश्वाची जादू कायम

Avatar The Way Of Water Box Office Collection Day 4 : 'अवतार द वे ऑफ वॉटर' (Avatar The Way Of Water) हा सिनेमा जगभरात चांगली कमाई करत आहे. हा सिनेमा प्रदर्शित होऊन फक्त चार दिवस झाले आहेत. रिलीजच्या चौथ्या दिवशी या सिनेमाने अनेक रेकॉर्ड आपल्या नावे केले आहेत. 
 
17:10 PM (IST)  •  21 Dec 2022

Rapchik Kolinbai : 'रापचिक कोळीणबाई' गाण्यात अमृताची नखरेल अदा

Amruta Patki: अभिनेत्री अमृता पत्की (Amruta Patki) हिने ग्लॅमर विश्वात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. 2006 च्या ‘मिस इंडिया’ या सौंदर्य स्पर्धेपर्यंत यशस्वी ठरल्यानंतर अमृताने आंतरराष्ट्रीय पातळीवरही ‘मिस अर्थ’ स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले आणि तिथेही ‘मिस अर्थ एअर’चा किताब मिळवला होता. अमृताने 2010 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केले, त्यानंतर काही मराठी चित्रपटांमध्ये ती झळकली होती. मराठी-हिंदी चित्रपटांमध्ये झळकलेली ही गुणी अभिनेत्री आता बऱ्याच कालावधीनंतर ‘सुर्या’ या चित्रपटातून मराठी रुपेरी पडद्यावर दिसणार आहे.  सध्या मराठी चित्रपटात बॉलीवूड तारका आयटम साँगवर थिरकताना दिसतायेत. या यादीत अमृताचाही समावेश झाला आहे. अमृता पत्की हिच्या नृत्याचा जलवा ‘सुर्या’ या आगामी मराठी चित्रपटात पहायला मिळणार आहे. 

15:17 PM (IST)  •  21 Dec 2022

Samantha Ruth Prabhu Health : समंथा सिनेसृष्टीतून ब्रेक घेणार?

Samantha Ruth Prabhu Health : सौंदर्यवती समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. पण गेल्या काही दिवसांपासून ती आजारपणामुळे चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रकृतीमुळे ती सिनेसृष्टीपासून ब्रेक घेणार असल्याचे म्हटले जात होते. आता तिच्या प्रकृतीसंदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. 

Samantha Ruth Prabhu Health : समंथा सिनेसृष्टीतून ब्रेक घेणार? समोर आलं मोठं कारण

12:55 PM (IST)  •  21 Dec 2022

Namrata Shirodkar: नम्रता शिरोडकरनं सांगितलं अभिनय क्षेत्र सोडण्याचं कारण; म्हणाली, 'महेश बाबूनं...'

Namrata Shirodkar: अभिनेत्री नम्रता शिरोडकर (Namrata Shirodkar) ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध होती. नम्रतानं अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींसोबत स्क्रिन शेअर केली. तिनं काही हिट चित्रपटांमध्ये देखील काम केलं. नम्रतानं फेब्रुवारी 2005 मध्ये दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता महेश बाबूसोबत(Mahesh Babu) लग्नगाठ बांधली. त्यानंतर ती रुपेरी पडद्यावर दिसली नाही. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये नम्रता शिरोडकरनं अभिनय क्षेत्र सोडण्यामगचं कारण सांगितलं. 

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

11:36 AM (IST)  •  21 Dec 2022

Best Films Of 2022 : सर्वोत्कृष्ट 50 सिनेमांच्या यादीत राजामौलींच्या 'RRR'ने मारली बाजी

RRR Beats Top Gun Maverick : 'आरआरआर' (RRR) हा सिनेमा रिलीजझाल्यापासून चर्चेत आहे. अद्याप या सिनेमाची क्रेझ कमी झालेली नाही. दिवसेंदिवस हा सिनेमा रेकॉर्ड करत आहे. आता हा सिनेमा ब्रिटिश फिल्म इंस्टीट्यूटमधील साइट अॅन्ड साऊंड मॅगजीनच्या या वर्षातील टॉप 50 सिनेमांच्या यादीत सामील झाला आहे.

View this post on Instagram
 
A post shared by RRR Movie (@rrrmovie)

11:32 AM (IST)  •  21 Dec 2022

Deepika Padukone Troll: 'रेनकोट घातलाय...'; फिफा वर्ल्ड कप 2022 ला गेलेल्या दीपिकाला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Deepika Padukone Troll: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) ही सध्या चर्चेत आहे.  यंदा दीपिकाला  फिफा वर्ल्ड कप 2022  (fifa world cup final 2022) ट्रॉफीच्या अनावरण सोहळ्यासाठी निमंत्रण देण्यात आलं होतं. ट्रॉफीचं अनावरण करणारी दीपिका फक्त बॉलीवूडमधीलच नव्हे तर जगातील पहिली अभिनेत्री बनली आहे. ट्रॉफीचं अनावरण करणाऱ्या दीपिकानं एक खास लूक केला होता. दीपिकाच्या या लूकनं अनेकांचे लक्ष वेधलं. सध्या काही नेटकरी दीपिकाच्या ड्रेसला ट्रोल करत आहेत. 

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 20 January 2025Donald Trump oath Ceremony | अमेरिकेत पुन्हा डोनाल्ड ट्रम्प पर्व, 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून घेतली शपथSpecial Report Akshay Shinde Case | अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरप्रकरणी पोलीस गोत्यातJalgoan Crime News : जळगावात 'सैराट', पूजा-मुकेशच्या लव्हस्टोरीचा रक्तरंजित शेवट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
Embed widget