Entertainment News Live Updates 20 October: टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
Mann Kasturi Re Trailer: एका रॅाक कॅान्सर्टद्वारे ‘नाद’ गाण्याचे जोरदार लाँचिंग झाले. सोशल मीडियावर या गाण्याला जबरदस्त प्रतिसाद मिळाल्यानंतर आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. नुकताच ‘मन कस्तुरी रे’ (Man Kasturi Re) या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा संपन्न झाला. या वेळी अभिनय बेर्डे (Abhinay Berde) आणि तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) यांनी स्कुटीवरून धमाकेदार एन्ट्री केली. या सोहळ्याला अभिनय आणि तेजस्वीसह चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती.
मराठी मनोरंजन विश्वच नव्हे तर, बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी अभिनेत्री सई ताम्हणकर नेहमीच चर्चेत असते. अभिनयाव्यतिरिक्त सई ताम्हणकर तिच्या फॅशनमुळे देखील नेहमीच चर्चेत असते. अभिनेत्री दररोज आपले नवनवे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकतेच सई ताम्हणकरने तिचे नवे फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे. या फोटोमध्ये तिचा लूक पाहून चाहते घायाळ झाले आहेत.
Sachin Ahir: 'मराठी सन्मानाचा आपला मराठमोळा दीपोत्सव' हा कार्यक्रम भाजपकडून आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम वरळीमधील जांबोरी मैदान येथे पार पडला. भाजपकडून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात गायक राहुल देशपांडे (Rahul Deshpande) यांचा अपमान भाजपनं केल्याचा आरोप शिवसेनेचे नेते सचिन अहिर (Sachin Ahir) यांनी केला आहे. सचिन अहिर यांनी ट्वीट करुन हा आरोप केला आहे. राहुल देशपांडे यांचं गाणं थांबवून अभिनेता टायगर श्रॉफचा (Tiger Shroff) सत्कार केल्याचा आरोप सचिन अहिर यांनी केला आहे.
टीव्ही अभिनेत्री वैशाली ठक्करच्या (Vaishali Thakkar) आत्महत्येप्रकरणी (Vaishali Thakkar Suicide Case) इंदूर पोलिसांनी मुख्य आरोपी असणाऱ्या राहुल नवलानी (Rahul Navlani) याला अटक केली आहे. आरोपी राहुल नवलानी याला पोलिसांनी इंदूरमधून अटक केली आहे. वैशालीने आत्महत्या केल्यानंतर तो फरार झाला होता. वैशालीने आपल्या सुसाईड नोटमध्ये राहुल नवलानी आणि त्याची पत्नी दिशा नवलानी यांच्यावर गंभीर आरोप केले होते. तेव्हापासून पोलीस राहुल आणि त्याच्या पत्नीच्या शोधात होते. मात्र, अद्याप राहुलची पत्नी पूजा फरार आहे.
साऊथ चित्रपट ‘कांतारा’ (Kantara) सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. कन्नड भाषेत रिलीज झालेला हा चित्रपट आता हिंदीसह इतर अनेक भाषांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटाची जादू पाहायला मिळत आहे. या चित्रपटाने कमाईचे अनेक विक्रम रचले आहेत. या चित्रपटाने अनेक बिग बजेट चित्रपटांना पिछाडीवर टाकले आहे. बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींचा गल्ला जमवत या चित्रपटाने किच्चा सुदीपचा ‘विक्रांत रोणा’ आणि दिवंगत अभिनेता पुनीत यांच्या ‘जेम्स’ला देखील मागे टाकले आहे.
Rani Chatterjee : देशभरात दिवाळीचा (Diwali 2022) सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. अनेक सेलिब्रिटी दिवाळीला ट्रेडिशनल लूकमधील फोटो आणि व्हिडीओ शेअर करतात. नुकताच अभिनेत्री राणी चॅटर्जीनं (Rani Chatterjee) एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) शेअर केला. या व्हिडीओमध्ये ती फटाका फोडताना दिसत आहे. हा फटाका फोडताना एक घटना घडली. ही घटना कॅमेऱ्यामध्ये कैद झाली.
Bhediya-Junoon: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) आणि अभिनेत्री क्रिती सेनन (Kriti Sanon) यांचा भेडिया (Bhediya) हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर काल रिलीज झाला. हा ट्रेलर पाहून आता वरुणच्या या चित्रपटाची तुलना नेटकरी 30 वर्षापूर्वी रिलीज झालेल्या राहुल रॉयच्या जुनून (Junoon) या चित्रपटासोबत करत आहेत. तर काही युझर्स या चित्रपटाच्या ट्रेलरचं कौतुक करत आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही गावांमध्ये गावपळण ही अनोखी प्रथा पाळली जाते. गावपळण प्रथा पाळणाऱ्या गावातील ग्रामस्थ एका ठराविक काळासाठी गाव सोडून दुसरीकडे राहायला जातात. या प्रथेबाबत अनेक वंदता आहेत. मात्र, आजही ही प्रथा पाळली जाते. या प्रथेबरोबरच एक प्रेमकथा गुंफून ‘प्रेम प्रथा धुमशान’ हा चित्रपट तयार झाला आहे.
पाकिस्तानी अभिनेता फवाद खान (Fawad Khan) आणि अभिनेत्री माहिरा खान (Mahira Khan) यांचा 'द लीजेंड ऑफ मौला जट' (The Legend of Muala Jatt) हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करत असून, आता भारतातही या चित्रपटाची चर्चा होत आहे. फवाद खान अभिनित हा चित्रपट 1979मध्ये आलेल्या युनुस मलिक दिग्दर्शित ‘मौला जट’ चित्रपटाचा रिमेक आहे. फवाद खानच्या चित्रपटाने ओपनिंग वीकेंडला 51 कोटींचे रेकॉर्डब्रेक कलेक्शन केले आहे. यासह या पाकिस्तानी चित्रपटाने एक नवा इतिहास रचला असून, ओपनिंग वीकेंडला 50 कोटींची कमाई करणारा हा पहिला पाकिस्तानी चित्रपट ठरला आहे.
खरं तर दिवाळी झाल्यावर तुळशीच्या लग्नापासून संपूर्ण महाराष्ट्रभर विवाह सोहळ्यांची धूम सुरू होते, पण यंदा दिवाळीपूर्वीच 'वऱ्हाडी वाजंत्री'चा (Varhadi Vajantri) गाजावाजा होऊ लागला आहे. अभिनेते-दिग्दर्शक विजय पाटकर यांनी दिग्दर्शित केलेल्या 'वऱ्हाडी वाजंत्री' या आगामी मराठी चित्रपटाची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा सुरू आहे. उत्सुकता वाढवणाऱ्या या चित्रपटातील गाणीही संगीतप्रेमींच्या मनाचा ठाव घेणारी आहेत. महाराष्ट्राचा लाडका अभिनेता मकरंद अनासपुरेसंगे चित्रपटातील इतर कलाकारांनी धरलेल्या 'वऱ्हाडी वाजंत्री'च्या ठेक्यावर महाराष्ट्रातील तमाम सिनेप्रेमींचे पाय थिरकणार आहेत.
Noti Binodini Biopic: अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. कंगना रनौत तिच्या चित्रपटांमधील दमदार अभिनयासाठी ओळखली जाते. ती अनेकदा सोशल मीडिया आणि फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित समस्यांवर बेधडकपणे आपली मते मांडते. दरम्यान, बॉलिवूडची ‘पंगा क्वीन’ कंगना एका प्रोजेक्टमध्ये आयकॉनिक सुपरस्टारच्या भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. अभिनेत्री कंगना रनौत 'नटी बिनोदिनी' (Noti Binodini) यांच्या बायोपिकमध्ये दिसणार आहे.
पार्श्वभूमी
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
बिग बॉस 16 चा स्पर्धक साजिद खान विरोधात तक्रार देण्यासाठी शर्लिन चोप्रा पोलिस स्टेशनमध्ये दाखल
बॉलिवूड निर्माता-दिग्दर्शक साजिद खान (Sajid Khan) सलमान खानच्या रिअॅलिटी शो 'बिग बॉस 16' द्वारे आपलं आयुष्य नव्याने सुरू करण्याचा प्रयत्न करत होता. चार वर्षांनंतर तो पुन्हा इंडस्ट्रीत येण्याचा विचार करत असताना त्याच्या शोमध्ये जाण्याबाबत अनेक सेलिब्रिटींनी नाराजी व्यक्त केली होती. आता अभिनेत्री शर्लिन चोप्राने साजिद खानविरोधात लैंगिक छळाचा आरोप करत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मात्र, पोलिसांनी अद्याप याप्रकरणी गुन्हा दाखल केलेला नाही.
'आदिपुरुष' चित्रपट निर्माता ओम राऊतला भूषण कुमार यांच्याकडून खास गिफ्ट; किंमत ऐकून व्हाल अवाक्!
प्रसिद्ध दिग्दर्शक ओम राऊत (Om Raut) हा सध्या त्याच्या आदिपुरुष (Adipurush) या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला. या ट्रेलरमध्ये वापरण्यात आलेल्या VFX मुळे अनेकांनी या ट्रेलरला ट्रोल केलं. या चित्रपटात सैफ अली खान (Saif Ali Khan), प्रभास (Prabhas) आणि क्रिती सेनन (Kriti Sanon) यांनी प्रमुख भूमिका साकरली आहे. या चित्रपटाचे निर्माते भूषण कुमार (Bhushan Kumar) यांनी ओम राऊतला लग्झरी कार गिफ्ट केली आहे.
हॉरर अन् कॉमेडीचा तडका! वरुण धवन-क्रिती सेननच्या ‘भेडिया’चा जबरदस्त ट्रेलर पाहिलात का?
बॉलिवूड अभिनेता वरूण धवन (Varun Dhawan) आणि क्रिती सेननची (Kriti Sanon) जोडी पहिल्यांदाच 'भेडिया' (Bhediya) चित्रपटातून मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार आहे. या हॉरर-कॉमेडी चित्रपटाचा पहिला टीझर प्रदर्शित झाला, ज्याने प्रेक्षकांची उत्सुकता ताणली होती. त्यानंतर, या चित्रपटातील वरुण धवन आणि क्रिती सेननचे पोस्टर्सही रिलीज करण्यात आले होते. या पोस्टरमध्ये वरुण धवन ‘भेडिया’ अर्थात लांडग्याच्या खतरनाक अवतारात दिसला, तर 'मिमी' फेम अभिनेत्री क्रिती सेननच्या पूर्णपणे वेगळ्या लूकनेही चाहत्यांना खूप प्रभावित केले होते. आता या चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर देखील रिलीज करण्यात आला आहे.
'कोण आहेत ही माणसं? यांना कामधंदे नाहीत का?'; अफवा पसरवणाऱ्यांचे वर्षा दांदळे यांनी टोचले कान
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा दांदळे (Varsha Dandale) या त्यांच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतात. वेगवेगळ्या मालिकांमधून त्या प्रेक्षकांच्या भेटीस येत असतात. 2021 मध्ये वर्षा यांचा अपघात झाला होता. या अपघातात त्यांना दुखापत झाली. पण काही काळ ब्रेक घेतल्यानंतर प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी त्या पुन्हा सज्ज झाल्या. सध्या त्या नवा गडी नवं राज्य या मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. या मालिकेत त्या राघवच्या आईची भूमिका साकारत आहेत. सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी एक पोस्ट व्हायरल झाली होती. 'वर्षा दांदळे या अंथरूणाला खिळून आहेत' अशा आशयाची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली. या अफवा पसरवणाऱ्यांना आता वर्षा यांनी चांगलंच सुनावलं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -