Entertainment News Live Updates 20 August : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी पत्रकार परिषदेत माध्यमांच्या प्रश्नांना उत्तरे देताना म्हटले की, अर्जुन कपूरने जनतेला धमकावण्याऐवजी आपल्या अभिनयावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. हिंमत असेल तर इतर धर्माच्या लोकांवरही चित्रपट बनवा. या वक्तव्यावरून त्यांनी अर्जुन कपूरला फ्लॉप अभिनेताही म्हटले असून, गुंडगिरीने काहीही होणार नाही, आता जनता जागरूक झाली आहे, तेव्हा अभिनयावर लक्ष द्या, असा सल्ला दिला आहे.
अभिनेत्री महिमा चैधरी ही 'इमर्जन्सी' या चित्रपटात पुपुल जयकर यांची भूमिका साकारणार आहे. पुपुल जयकर या भारतीय सांस्कृतिक कार्यकर्त्या आणि लेखका होत्या.
'गदर'सारखे अनेक मोठे आणि हिट चित्रपट देणारे दिग्दर्शक अनिल शर्मा यांचे वडील आणि बॉलिवूडचे प्रसिद्ध निर्माते के. सी. शर्मा यांचे शुक्रवारी रात्री त्यांच्या अंधेरी येथील राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 89 वर्षांचे होते. मागील काही काळापासून ते आजारी होते. के.सी. शर्मा यांनी मनोरंजन विश्वात अनेक चित्रपटांची निर्मिती केली होती. त्यांनी 'तहलका', 'जवाब' आणि 'पोलिसवाला गुंडा' या चित्रपटांची निर्मिती केली होती.
टेलिव्हिजन अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी तिच्या ग्लॅमरस स्टाईलमुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे.
बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी आणि अभिनेत्री जान्हवी कपूरची बहीण खुशी कपूर इंस्टाग्रामवर खूप सक्रिय असते.
बॉयकॉट प्रवृत्तीमुळे मनोरंजन विश्वाचे नुकसान होत असल्याचे विजय म्हणाला, यावेळी त्याने आमिर खानच्या 'लाल सिंह चड्ढा' चित्रपटाला समर्थन दिले. एका मुलाखतीत बोलताना विजय म्हणाला की, ‘मला वाटतं, चित्रपटाच्या सेटवर अभिनेता, दिग्दर्शक, अभिनेत्री यांच्याशिवाय इतरही महत्त्वाची पात्रं असतात. एका चित्रपटात दोनशे ते तीनशे लोक काम करतात. अनेक लोकांसाठी हे उदरनिर्वाहाचे साधन आहे. एक चित्रपट अनेकांना रोजगार देतो. त्यामुळे हे असं करणं चुकीचं आहे.’
बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) हिचा बहुचर्चित ‘दोबारा’ (Dobaaraa) हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. ‘दोबारा’ हा चित्रपट 19 ऑगस्टला रिलीज झाला. या चित्रपटाकडून बॉलिवूडला खूप अपेक्षा होत्या. मात्र, या चित्रपटाकडेही प्रेक्षकांनी पाठ फिवली आहे. तापसीच्या ‘दोबारा’ला काही ठिकाणी प्रेक्षकच नसल्याने शो देखील रद्द करावे लागले आहेत. तर, काही ठिकाणी केवळ 8-10 लोकांनी हा चित्रपट पाहिला.
बॉलिवूडचा उमदा अभिनेता रणदीप हुडा (Randeep Hooda) आज (20 ऑगस्ट) आपला वाढदिवस साजरा करत आहे. रणदीप हुडा याचा जन्म 20 ऑगस्ट 1976 रोजी हरियाणामध्ये झाला. आपल्या मुलाने डॉक्टर बनावे अशी त्याच्या कुटुंबाची इच्छा होती. पण, त्याला असलेल्या अभिनयाच्या वेडापायी ते शक्य होऊ शकले नाही.
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) आणि जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) बॉलिवूडमधील ‘बेस्ट फ्रेंड्स’पैकी एक आहेत. दोघी नेहमीच एकमेकींसोबत वेळ घालवताना दिसतात. सारा आणि जान्हवीची मैत्री बॉलिवूडमध्ये नेहमीच चर्चेचा विषय असते. मात्र, आता दोघींनी त्यांच्या चाहत्यांना एक सुखद धक्का दिला आहे. नुकताच त्यांनी सोशल मीडियावर एक एकत्र फोटो शेअर केला आहे. दोघींचा हा फोटो पाहून असे दिसतेय की, त्या लवकरच एका नवीन प्रोजेक्टमध्ये एकत्र दिसणार आहेत.
पार्श्वभूमी
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक; अद्याप शुद्धीवर नाही, जवळच्या नातेवाईकांची एबीपी न्यूजला माहिती
राजू श्रीवास्तव यांच्या जवळच्या नातेवाईकांनी एबीपी न्यूजला माहिती दिली आहे की,"राजू श्रीवास्तव अद्याप शुद्धीवर आलेले नाहीत. त्यांच्या मेंदूला आलेली सूज अजूनही कमी झालेली नाही. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांना शुद्धीवर आणण्यासाठी डॉक्टर सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. राजू श्रीवास्तव अजूनही व्हेंटिलेटरवर असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. राजूच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी त्यांच्या कुटुंबियांसह चाहतेदेखील प्रार्थना करत आहेत".
'बस बाई बस'च्या आगामी भागात क्रांती रेडकर अन् भरत जाधव होणार सहभागी
'बस बाई बस' हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला आला असून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो आहे. या कार्यक्रमात सुबोध भावे सूत्रसंचालनाची धुरा सांभाळणार आहे. या कार्यक्रमाच्या आगामी भागात क्रांती रेडकर आणि भरत जाधव सहभागी होणार आहे.
'गॉसीप आणि बरंच काही' मालिकेत पाहायला मिळणार कलाकारांची पडद्यामागची धमाल मस्ती!
मालिका विश्वात सध्या वेगवेगळे प्रयोग होत आहेत. मायबाप प्रेक्षक पडद्यावरील मालिकांवर तसंच कलाकारांवर प्रेम करतात. मालिकांच्या पडद्यामागचं वातावरणं कसं असेल, हे जाणून घेण्याची उत्सुकताही प्रेक्षकांना लागून राहिलेली असते. येत्या 21 ऑगस्टपासून दर रविवारी 'गॉसीप आणि बरंच काही' या मालिकेच्या माध्यमातून मालिकेतल्या कलाकारांची पडद्यामागची धमाल, मजा, मस्ती आणि गप्पा हे सारं प्रेक्षकांना प्रत्यक्ष पाहायला मिळणार आहे.
खिलाडी कुमारच्या 'कठपुतली'चा टीझर आऊट
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा 'रक्षा बंधन' हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पण हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात मात्र कमी पडला आहे. बॉक्स ऑफिसवर फ्लॉप होणारा येत्या वर्षातला हा तिसरा सिनेमा आहे. अशातच आज खिलाडी कुमारच्या आगामी 'कठपुतली' सिनेमाचा टीझर आऊट झाला आहे. अक्षय कुमारचा हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित होणार नसून ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.
सिनेमागृहात फ्लॉप ठरलेला रणबीरचा 'शमशेरा' ओटीटीवर रिलीज
बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरने गेल्या अनेक दिवसांनी 'शमशेरा' या सिनेमाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं. या सिनेमात रणबीरसोबत वाणी कपूर, संजय दत्त महत्त्वाच्या भूमिकेत दिसून आले होते. आता सिनेमागृहात फ्लॉप ठरलेला हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -