Hasan Mushrif : राष्ट्रवादी काँग्रेसचे दोनदिवसीय अधिवेशन शिर्डीमध्ये पार पडत आहे. या अधिवेशनामध्ये पहिल्या दिवशी धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांचीच सर्वाधिक चर्चा झाल्यानंतर आज दुसऱ्या दिवशी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी कानमंत्र दिला. नेत्यांना सुद्धा आगामी होऊ घातलेल्या महानगरपालिकांची जबाबदारी घेण्याचे आवाहन केलं. यावेळी बोलताना सुनील तटकरे यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना कोल्हापूर महापालिकेची जबाबदारी घेण्याचे आवाहन केले.
मुंबई शहर पुनर्बांधणी करणार आहोत
सुनील तटकरे म्हणाले की, इथून जबाबदारी घेऊनच आपल्याला या ठिकाणाहून जायचं आहे. तटकरे यांनी कार्यकर्त्यांना संबोध करताना सांगितले की पुढील आठ दिवसांमध्ये पूर्ण मुंबई शहर पुनर्बांधणी करणार आहोत. पुणे पिंपरीचा जो विकास झाला तसेच मुंबईत देखील आपल्याला काम करायचं आहे. ते पुढे म्हणाले की, काँग्रेस, भाजपला मुंबईत मतदान होत आहे. सेनेला सुद्धा मदत मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेस मात्र 15 जागांच्या पुढे जात नाही. त्यामुळे अजित पवारांच्या नेतृत्वात मुंबईमध्ये आपण यश प्राप्त करणार आहोत, असं त्यांनी सांगितलं.
आता मुंबईत देखील अजित पवारांचा चेहरा स्वीकृत झाला
त्यांनी सांगितले की, अजित पर्व हे 1991 पासून सुरू झालं आहे. प्रत्येकाच्या मनात भावना आहे, पुढील 25 वर्षाचा पक्षाचा गाढा पुढे घेऊन जाण्याचा विचार आमच्या सर्वांच्या मनात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. कार्यकर्त्यांना बळ देणं गरजेचं आहे. विधानसभा निवडणुकीत 72 टक्के स्ट्राईक रेट पक्षाने ठेवला. मुंबई सारख्या शहरात आम्हाला राष्ट्रवादीचा चेहरा म्हणून पुढं जायचं आहे. ग्रामीण भागात आपं ताकद उभी केली. मात्र, शहरात आपल्या नेतृत्वाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. मुंबईत आपण यात्रा काढली. आता मुंबईत देखील अजित पवारांचा चेहरा स्वीकृत झाला आहे.
एका मोठ्या पराभवाला तोंड देऊन मोठा विजय प्राप्त केला
खासदार प्रफुल पटेल म्हणाले की, लोकसभेनंतर निवडणुकीला सामोरे कसं जायचं हा प्रश्न होता. मात्र 4 ते 5 महिन्यात आपण मेहनत केली. एका मोठ्या पराभवाला तोंड देऊन मोठा विजय प्राप्त केला. देशात मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनले. त्यात महाराष्ट्राचा आणि राष्ट्रवादीचा हिस्सा काय? हा प्रश्न उपस्थित होतो. लोकसभा निवडणुकीत मी आणि अजित पवार देवगिरीला बसून टिव्ही पाहत होतो. आम्ही एकमेकांचा चेहरा पाहत होतो. आपल्याला खचायचं नाही हे ठरवलं आणि कामाला लागलो. बारामती निकालावरून आपण काही चूक केली आहे का? महाराष्ट्राने आपल्याला नाकारल आहे का? हा विचार मनात येत होता. कदाचित तोच क्षण एक मोठा विजय घेचून आणण्याचा भाग होता. महायुती म्हणून आपण निवडणुकीला सामोरे गेलो. पाच सहा महिन्यात परिवर्तन होईल असा निकाल प्राप्त केला.
इतर महत्वाच्या बातम्या