Entertainment News Live Updates 2 December : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live :  मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 02 Dec 2022 02:52 PM
Ahmednagar: कोपरगाव शेतकऱ्यांच्या विजप्रश्नी विजवीतरण समोर उपोषण

Ahmednagar: अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरात शेतकऱ्यांच्या विजेच्या मागणीसह विविध मागण्यांसाठी वितरण कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण सुरू केलंय. कोपरगाव नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष पद्माकांत कुदळे यांच्या नेतृत्वात दिवसा थ्रीफेज विज पुर्ण दाबाने दिली जावी, तसेच प्रलंबित सबस्टेशनचे काम त्वरीत पुर्ण केले जावे आणी शेतकऱ्यांकडून सक्तीने विज बिल वसुली थांबवावी या मागणीसाठी हे लाक्षणिक उपोषण करण्यात आलंय. एकीकडे अतिवृष्टीमुळे बळीराजा संकटात सापडलाय तर शासनाकडून अद्याप कोणतीही मदत मिळाली नाही. त्यातच विजप्रश्नी बळीराजाला उपोषण करण्याची वेळ आली असल्याची टीका पद्माकांत कुदळे यांनी केलीय. 

Belgaum News: लाल पिवळा झेंडा घेऊन नाचलेल्या विद्यार्थ्याला झालेल्या मारहाण प्रकरणी एकूण चार विद्यार्थ्यावर गुन्हा दाखल
Belgaum News: लाल पिवळा झेंडा घेऊन नाचलेल्या विद्यार्थ्याला झालेल्या मारहाण प्रकरणी एकूण चार विद्यार्थ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती बेळगाव पोलीस आयुक्त डॉ.एम.बी.बोरलिंगय्या यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

 

मारहाण झालेल्या वेळचा व्हिडिओ आणि प्रत्यक्षदर्शी यांच्या आधारे चार जणावर टिळकवाडी पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला आहे या चार जणापैकी एक जण सज्ञान असून अन्य तीन जण अल्पवयीन आहेत.मारहाण झालेल्या विद्यार्थ्याने दिलेल्या तक्रारी नुसार तक्रार दाखल करून घेण्यात आली आहे.मारहाण केलेल्या विद्यार्थ्यांची ओळख पटवण्यात आली असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असेही प्रसिध्दी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
पीक विमा आणि मदतीसाठी परभणीत 19 गावांचे शेतकरी आक्रमक

परभणी जिल्ह्यात यंदा अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असे असताना 3 महिन्यानंतर ही शेतकरी मदत आणि पीक विम्यापासून वंचित आहे. त्यामुळे आता शेतकरी आक्रमक होत असुन आज परभणी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयासमोर 19 गावच्या शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन सुरु केले असुन सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी या आंदोलकांनी केली आहे येत्या 8 दिवसात जर सरकारने मदत अथवा पीक विमा दिला नाही तर विमा कंपनी आणि कृषी अधिकारी कार्यालय जागेवर न ठेवण्याचा इशाराही या शेतकऱ्यांनी दिलाय आंदोलक शेतकऱ्यांशी बातचीत केली आहे. 

Freddy Review : थक्क करणारं मास्टर माईंड 'फ्रेडी'चं जग

Freddy Movie Review : बॉलिवूडचा चॉकलेट बॉय कार्तिक आर्यनचा (Kartik Aaryan) 'फ्रेडी' (Freddy) हा सिनेमा आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आजवर कार्तिक सकारात्मक आणि विनोदी भूमिकेत दिसून आला आहे. पण 'फ्रेडी' सिनेमात कार्तिकचा एक नवा अंदाज पाहायला मिळाला आहे.


Freddy Review : थक्क करणारं मास्टर माईंड 'फ्रेडी'चं जग

Nora Fatehi : नोरा फतेहीच्या अडचणीत वाढ

Nora Fatehi : बॉलिवूडची लोकप्रिय नृत्यांगणा नोरा फतेही (Nora Fatehi) सध्या चर्चेत आहे. 'फिफा विश्वचषक 2022'मध्ये (FIFA World Cup 2022) भारताचं प्रतिनिधित्व करताना तिने राष्ट्रध्वज उलटा पकडला होता. त्यामुळे आता नोराला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे. तसेच नोराच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. 





Goldy Brar Detained: सिद्धू मुसेवालाच्या हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रार FBIच्या रडारवर

Goldy Brar Detained: प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला (Punjabi Singer Sidhu Moose Wala) यांच्या हत्येमागील सूत्रधार गोल्डी ब्रार (Gangster Goldy Brar) याचा सुगावा एफबीआयला (FBI) लागल्याची माहिती मिळत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गोल्डीला कॅलिफोर्नियामध्ये ट्रॅक करण्यात आलं आहे. भारतीय सुरक्षा यंत्रणांच्या सूत्रांच्या हवाल्यानं ही बातमी समोर येत आहे. अमेरिकेत एफबीआयनं गँगस्टर गोल्डी ब्रारचा शोध सुरु केला आहे. एफबीआय लवकरच गोल्डी ब्रारला अटक करणार असल्याची माहिती मिळत आहे. सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर गोल्डी ब्रारनं हत्येची जबाबदारी घेतली होती.

Shahrukh Khan : शाहरुखने सौदी अरेबियातील मक्का मशिदीला दिली भेट

Shahrukh Khan : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) सध्या चर्चेत आहे. त्याने नुकतीच सौदी अरेबिया येथील मक्का मशिदीला भेट दिली आहे. मशिदीला भेट दिल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये शाहरुख पांढऱ्या कपड्यात मक्कामध्ये उमराह करताना दिसतो आहे.



Akshaya Hardeek Wedding : आली समीप लग्नघटीका... चढली तोरणं, मांडव दारी; राणादा अन् पाठकबाईंची लगीनघाई

Akshaya Hardeek Wedding : 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेले राणा-अंजली म्हणजेच हार्दिक जोशी (Hardeek Joshi) आणि अक्षया देवधर (Akshaya Deodhar) आज लग्नबंधनात अडकणार आहेत. दोघांचही केळवण, मेहंदी, हळद आणि संगीत दणक्यात पार पाडलं आहे. 





पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


अजय देवगणच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; 'सिंगम अगेन' येणार प्रेक्षकांच्या भेटीस


Singham Again: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अजय देवगणचा (Ajay Devgn) चाहता वर्ग मोठा आहे. त्याच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघतात. लवकरच त्याचा भोला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. तसेच काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या अजयच्या दृश्यम-2 (Drishyam 2) या चित्रपटाला देखील प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. आता अजयच्या सिंघम या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची घोषणा करण्यात आली आहे. सिंघम (Singham) आणि सिंघम रिटर्न्स हे चित्रपट हिट ठरल्यानंतर आता सिंघम अगेन (Singham Again) या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. 


Kaali Rani: ‘काळी राणी’ येणार रंगभूमीवर; विजय केंकरेंचं शंभरावं नाटक


Kaali Rani: नाट्यकर्मी म्हणून असलेली अंगभूत ऊर्जा घेऊन , ज्येष्ठ नाट्यकर्मी दिग्दर्शक विजय केंकरे गेली 40 वर्षे रंगभूमीवर कार्यरत आहेत वेगवेगळ्या शैलीतील नाटकं प्रभावीपणे  प्रेक्षकांपर्यंत पोहचविणारे विजय केंकरे आता ‘काळी राणी’ (Kaali Rani) या आपल्या नव्या नाटकासहित आपल्या नाटयकारकिर्दीचं शतक साजरं करतायेत. ‘काळी राणी’ हे त्यांचं 100 वं नाटक 11 डिसेंबरला रंगभूमीवर येतयं. या नाटकाची खासियत म्हणजे विजय केंकरे यांचे जसे 100  वे नाटक आहे तसेच या नाटकाशी संबधित असलेल्या कलाकार तंत्रज्ञ यांनीही या नाटकाद्वारे आपल्या नाटयकारकिर्दीचे वेगवेगळे टप्पे गाठले आहेत. रत्नाकर मतकरी यांचे 90 वे नाटक,  प्रदीप मुळ्ये 200 वे नाटक, अजित परब 40 वे नाटक शीतल तळपदे 125 वे नाटक, मंगल केंकरे 50 वे नाटक वे नाटक राजेश परब 50 वे नाटक, अक्षर शेडगे 1400 वे नाटक आणि डॉ. गिरीश ओक यांचे 51 वे नाटक. असा भन्नाट योग ‘काळी राणी’ या नाटकाने साधला आहे. 


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.