Entertainment News Live Updates 19 November : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live :  मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 19 Nov 2022 06:24 PM
Tabassum: ज्येष्ठ अभिनेत्री तबस्सुम यांचे निधन; वयाच्या 78 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Tabassum: ज्येष्ठ अभिनेत्री तबस्सुम यांचे हृयविकारच्या निधन झाले आहे. वयाच्या 78 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईमध्ये तबस्सुम यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. 

Bruce Lee: 49 वर्षांनी उलगडलं ब्रूस लीच्या मृत्यूचं रहस्य? 'या' कारणामुळे झालं मार्शल आर्टिस्टचं निधन, शास्त्रज्ञांनी दिली माहिती

Bruce Lee: मार्शल आर्ट सुपरस्टार आणि फिल्म दिग्दर्शक ब्रूस लीचा (Bruce Lee) चाहता वर्ग मोठा आहे. ब्रूस लीचं निधन होऊन 49 वर्ष झाली आहेत. जगभरातील प्रेक्षक आजही ब्रूस लीचे चित्रपट आवडीनं बघतात. 20 जुलै 1973 रोजी ब्रूस लीनं वयाच्या 32 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. आता 49 वर्षांनंतर ब्रूस लीच्या मृत्यूचं रहस्य उलगडलं आहे. काही शास्त्रज्ञांच्या टीमनं ब्रूस लीच्या मृत्यूचं खरं कारण सांगितलं आहे.


ब्रूस लीचा मृत्यू सेरेब्रल एडेमा (मेंदूला सूज) झाल्यामुळे झाला, असं आतापर्यंत काही लोक म्हणत होतं. पण, शास्त्रज्ञांच्या एका टीमने आता अशी माहिती दिली आहे की, ब्रूस लीचा मृत्यू जास्त पाणी प्यायल्यामुळे झाला. 



Shraddha Walker: श्रद्धा वालकर प्रकरणावर चित्रपट, नावही ठरलं; हा दिग्दर्शक करणार निर्मिती

Shraddha Murder Case: दिल्लीमध्ये झालेल्या श्रद्धा वालकरच्या (Shraddha Murder Case) हत्याकांड प्रकरणानं संपूर्ण देश हदरला आहे. श्रद्धा वालकर नावाच्या तरुणीची तिचा लिव्ह-इन पार्टनर आफताबनं (Aftab) गळा दाबून हत्या केली. आफताबनं श्रद्धाच्या मृतदेहाचे तब्बल 35 तुकडे केले. आता श्रद्धा वालकर प्रकरणावर एका चित्रपटाची निर्मिती केली जाणार आहे. या चित्रपटाचं कथानक हे श्रद्धा वालकर प्रकरणावर आधारित असणार आहे. दिग्दर्शक मनीष एफ सिंह (Manish F Singh) हे या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. या चित्रपटाचं नाव देखील ठरलं आहे. 

Nysa Devgn: न्यासा देवगणनं प्लास्टिक सर्जरी केल्याच्या चर्चेवर काजोलनं सोडलं मौन; म्हणाली 'तिच्या वडिलांप्रमाणे ती...'

Nysa Devgn: अभिनेत्री काजोल (Kajol) आणि अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) यांची मुलगी न्यासा देवगण (nysa devgn) ही सोशल मीडियावर सक्रिय असते. वेगवेगळ्या लूकमधील फोटो न्यासा सोशल मीडियावर शेअर करते. तिच्या फोटोला नेटकऱ्यांची पसंती मिळते. काही दिवसांपूर्वी न्यासानं एका दिवाळी पार्टीला हजेरी लावली. या पार्टीमधील न्यासाच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले. न्यासाचे या दिवाळी पार्टीमधील काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. या फोटोला आणि व्हिडीओला कमेंट करुन अनेकांनी न्यासाला ट्रोल केलं आहे. न्यासानं प्लास्टिक सर्जरी केली आहे, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरु होती. आता या चर्चेवर काजोलनं मौन सोडलं आहे. या सर्व अफवा असल्याचं काजोलनं सांगितलं. 

IFFI : 'इफ्फी' आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला उद्यापासून सुरुवात

International Film Festival : भारतीय सिने-सृष्टीत सध्या गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची म्हणजेच 'इफ्फी'ची (IFFI) चर्चा आहे. उद्यापासून भारतातील या सर्वात मोठ्या चित्रपट महोत्सवाला सुरुवात होणार आहे. गोव्यात 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान हा महोत्सव पार पडणार आहे. 

Sharad Ponkshe: 'ए मुर्खा... हिंमत असेल तर इथे ये', शरद पोंक्षेंचा नाव न घेता राहुल गांधींवर हल्लाबोल; शेअर केला व्हिडीओ

Sharad Ponkshe: स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केलेल्या वक्तव्यानंतर वाद निर्माण झाला. तसेच महाराष्ट्रातलं राजकीय वातावरणही तापलं. आंदोलनं झाली आणि आरोप-प्रत्यारोपही झाले. या सगळ्या वादानंतर अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियात शेअर केला आहे. अंदमानातील सेल्युलर जेलमधील व्हिडीओ शेअर करुन शरद पोंक्षे यांनी सावरकरांच्या टीकाकारांना आव्हान दिलंय. या व्हिडीओच्या माध्यमातून शरद पोंक्षे यांनी राहुल गांधी यांच्यावर नाव न घेता हल्लाबोल केला आहे. 



Snehlata Vasaikar : जागतिक पुरुष दिनानिमित्त 'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम स्नेहलता वसईकरची खास पोस्ट; "यशस्वी स्त्रीच्या मागे खंबीर पुरुष असतो"

Snehlata Vasaikar On International Mens Day : मराठमोळी अभिनेत्री स्नेहलता वसईकर (Snehlata Vasaikar) गेल्या काही दिवसांपासून 'बिग बॉस'मुळे (Bigg Boss) चर्चेत आहे. आज 'जागतिक पुरुष दिना'निमित्त (International Men's Day) तिने एक खास पोस्ट शेअर केली आहे. 



Hrithik Roshan: हृतिक रोशन आणि सबा आझाद राहणार 'मन्नत'मध्ये? 97 कोटींचं घर खरेदी केल्याची चर्चा

Hrithik Roshan: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) चित्रपटांबरोबरच वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असतो.  हृतिक आणि सबा आझाद (Saba Azad) यांच्या जोडीबाबत सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. रिपोर्टनुसार, सबा आणि हृतिक हे डेट करत आहेत. लवकरच हृतिक आणि सबा हे एका नव्या घरामध्ये शिफ्ट होणार आहेत, अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. 



Atal : अटल बिहारी बाजपेयी यांच्या भूमिकेत दिसणार पंकज त्रिपाठी

Pankaj Tripathi On Movie Atal : देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजयेपी यांच्या आयुष्यावर आधारित 'अटल' (Atal) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाची घोषणा झाल्यापासून या सिनेमात अटल बिहारी वाजपेयी यांची भूमिका कोण साकारणार याची चाहत्यांना उत्सुकता लागली होती. आता या सिनेमात पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) अटल बिहारी वाजपेयी यांच्या भूमिकेत दिसणार असल्याची माहिती समोर आली आहे. 





Indira Gandhi Birth Anniversary : 'या' अभिनेत्रींनी रुपेरी पडद्यावर साकारली माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका; लूकचं प्रेक्षकांनी केलं कौतुक

Indira Gandhi Birth Anniversary : भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांची आज जयंती आहे. त्या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या. पंतप्रधान या नात्याने त्यांनी अनेक निर्णय घेतले. त्यांना 'आर्यन लेडी' असेही म्हटले जाते. इंदिरा गांधी यांच्या आयुष्यावर भाष्य करणारे अनेक सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. यात 'ऑंधी'(Aandhi), 'बेल बॉटम' अशा अनेक सिनेमांचा समावेश आहे. या सिनेमात अनेक अभिनेत्रींनी त्यांची आव्हानात्मक भूमिका साकारली आहे.


Indira Gandhi Birth Anniversary : 'या' अभिनेत्रींनी रुपेरी पडद्यावर साकारली माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका; लूकचं प्रेक्षकांनी केलं कौतुक

Drishyam 2: बॉक्स ऑफिसवर ‘दृश्यम 2’ ची बंपर ओपनिंग! पहिल्याच दिवशी जमवला ‘इतका’ गल्ला

Drishyam 2 Box Office Collection Day 1:  ‘दृश्यम 2’ या चित्रपटानं पहिल्या दिवशी 14 कोटींची कमाई केली आहे. दृश्यम 2 हा भारतात 3302 स्क्रीन्सवर आणि ओव्हरसीजमध्ये 858 स्क्रीन्सवर रिलीज झाला आहे.  म्हणजेच हा सिनेमा एकूण 4 हजाराहून अधिक स्क्रीन्सवर रिलीज झाला.  रिपोर्टनुसार, जवळपास 50 कोटींच्या बजेटमध्ये या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. 



Happy Birthday Zeenat Aman : सत्तरच्या दशकात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी झीनत अमान!

Zeenat Aman : सत्तरच्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री झीनत अमान (Zeenat Aman) यांचा आज 71 वा वाढदिवस आहे. झीनत यांनी आपल्या अभिनयाने बॉलिवूडला वेड लावलं होतं. तसेच झीनत यांनी 'फेमिना मिस इंडिया' आणि 'मिस एशिया पॅसिफिक इंटरनॅशनल' हे किताब जिंकले आहेत. 

Happy Birthday Sushmita Sen : 'मिस इंडिया' ते 'मिस युनिव्हर्स'; आजही आपल्या सौंदर्याने चाहत्यांना घायाळ करणारी सुष्मिता सेन!

Sushmita Sen : बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) आज 46 वा वाढदिवस साजरा करत आहे. सुष्मिताने वयाच्या 18 व्या वर्षी 'मिस इंडिया'चा (Miss India) किताब जिंकला होता. तसेच ती त्या वर्षी 'मिस युनिव्हर्स'देखील झाली होती. बॉलिवूडच्या अनेक सुपरहिट सिनेमांत सुष्मिता झळकली आहे. 





पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


आमिर खानच्या लेकीचा एंगेजमेंट सोहळा थाटामाटात पार; सोहळ्याला संपूर्ण खान कुटुंबियांची उपस्थिती


बॉलिवूड अभिनेता आमिर (Aamir Khan) खानची मुलगी आयरा खान (Ira Khan) हिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरेबरोबर आज मुंबईत एंगेजमेंट सोहळा पार पडला. या एंगेजमेंटच्या निमित्ताने एका भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात आयरा खान लाल गाऊनमध्ये खूपच सुंदर दिसत होती. या एंगेजमेंट सोहळ्याला आमिर खानसह संपूर्ण कुटुंबियांची उपस्थिती पाहायला मिळाली. 


विकी कौशलचा 'गोविंदा नाम मेरा' या दिवशी होणार रिलीज


अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) बॉलिवूडमधील दमदार अभिनेत्यांपैकी एक आहे. आतापर्यंतच्या कारकिर्दीत विकी कौशलने अनेक भूमिका साकारल्या असून प्रत्येक भूमिकेत त्याने आपलं स्थान आणि अभिनय कौशल्य दाखवून दिलं आहे. विकी कौशलचा बहुप्रतिक्षित 'गोविंदा नाम मेरा' (Govinda Naam Mera) हा सिनेमाही रिलीजसाठी सज्ज झाला आहे. अशातच विकीने त्याच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. विकीने त्याच्या इन्स्टाग्रामवर चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे.


सामान्य स्वप्नांचा असामान्य प्रवास; राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या 'गोष्ट एका पैठणीची'चा ट्रेलर आऊट


'गोष्ट एका पैठणीची' (Goshta Eka Paithanichi) हा सिनेमा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. 68 व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात या सिनेमाला 'सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटा'चा मान मिळाला आहे. आता सामान्य स्वप्नांचा असामान्य प्रवास उलगडणाऱ्या 'गोष्ट एका पैठणीची' (Goshta Eka Paithanichi) या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. एक पैठणी असावी, इतकं साधं स्वप्न बाळगणारी इंद्रायणी, तिच्या स्वप्नांबाबत खूप सकारात्मक दिसत आहे. मात्र या स्वप्नापर्यंत पोहोचण्याचा तिचा प्रवास खडतर दिसत आहे. तिचे पैठणीचे हे स्वप्न पूर्ण होईल का, की तिचा हा प्रवास तिला एका वेगळ्या वाटेवर नेणार? या प्रश्नांची उत्तरे 'गोष्ट एका पैठणीची' हा सिनेमा पाहिल्यावर प्रेक्षकांना मिळतील. सामान्य स्वप्न उराशी बाळगून, ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका सर्वसामान्य गृहिणीचा हा असामान्य प्रवास आहे. 


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.