Entertainment News Live Updates 19 January : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 19 Jan 2023 03:55 PM
Jethalal In Shark Tank India 2 : शार्क टँकमध्ये पोहोचला 'जेठालाल'; हा व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हीही खळखळून हसाल

Jethalal In Shark Tank India 2 : छोट्या पडद्यावरील 'शार्क टँक इंडिया-2' (Shark Tank India-2) या कार्यक्रमाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहेत. या कार्यक्रमाच्या पहिल्या सीझनप्रमाणेच दुसऱ्या सीझनला देखील प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. आता या कार्यक्रमाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, शार्क टँक इंडिया या शोमध्ये तारक मेहता का उल्टा चष्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या कार्यक्रमातील जेठालाल जातो. 



Rakhi Sawant : राखी सावंत मुंबई पोलिसांच्या ताब्यात; मॉडेलचा आक्षेपार्ह व्हिडीओ आणि फोटो व्हायरल केल्याचा आरोप

Rakhi Sawant : मुंबई पोलिसांनी अभिनेत्री राखी सावंतला (Rakhi Sawant) ताब्यात घेतलं आहे. काही वेळाने पोलीस राखी सावंतला अंधेरी न्यायालयात हजर करणार आहेत.  


आंबोली पोलिसांनी राखीला ताब्यात घेतलं आहे. राखी सावंतवर एका महिला मॉडेलचा आक्षेपार्ह व्हिडीओ आणि फोटो व्हायरल केल्याचा आरोप आहे. यानंतर मॉडेलच्या तक्रारीवरुन राखीवर आंबोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तिच्या तक्रारीवरुन नोव्हेंबर 2022 मध्ये माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत राखीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांकडून वारंवार प्रयत्न करुनही ती हजर राहत नव्हती. त्यामुळे आज पोलीस पथकाने तिला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले असून या प्रकरणाचा तपास सुरु आहे. शर्लिन चोप्राच्या या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 



Swapnil Joshi: स्वप्निल जोशीनं ट्वीट करताना चुकवले तीन शब्द; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले, 'म्हणे मी पुण्याचा'

Swapnil Joshi: मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता स्वप्निल जोशी (Swapnil Joshi) हा त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत असतो. त्याच्या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळते. दुनियादारी (Duniyadari), तू ही रे (Tu Hi Re),मुंबई-पुणे-मुंबई (Mumbai-Pune-Mumbai)  यांसारख्या चित्रपटांमध्ये स्वप्निलनं काम केलं. स्वप्निल त्याच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकतो. स्वप्निलचा वाळवी हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती आहे. सध्या स्वप्निल हा त्याच्या एका ट्वीटमुळे चर्चेत आहे. स्वप्निलनं ट्वीट शेअर करुन वेड या चित्रपटाच्या टीमचं कौतुक केलं. पण या ट्वीटमधील तीन शब्द त्यानं चुकवले. आता या ट्वीटमुळे सध्या त्याला नेटकरी ट्रोल करत आहेत. 



Viral Video : 'जाने बलमा घोडे पे क्यों सवार है'; टांझानियाच्या किली पॉलच्या बहिणीनं गायलं गाणं, नेटकऱ्यांनी केलं कौतुक

Kili Paul सोशल मीडियावर (Social Media) वेगवेगळे रील्स व्हायरल होत असतात. टांझानियाच्या किली पॉलच्या (Kili Paul) रील्सला नेटकऱ्यांची पसंती मिळते. बॉलिवूडमधील वेगवेगळ्या कलाकारांच्या गाण्यावरचे रील्स किली पॉल सोशल मीडियावर शेअर करतो. नुकताच एक खास व्हिडीओ किली पॉलने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये किली पॉलसोबतच त्याची बहिण नीमा पॉल देखील दिसत आहे. किली आणि नीमा यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 



Nirmal Mukherjee: "अशी चिकमोत्याची माळ" गाण्याचे संगीतकार "निर्मल मुखर्जी" यांचे निधन

Nirmal Mukherjee: वाद्यवादक आणि संगीतकार "निर्मल मुखर्जी" यांचे निधन झाले. ते 71 वर्षांचे होते. बोंगो, कोंगो, तुंबा, दरबुका, डी-जेंबे अशा सर्वच पाश्चिमात्य वाद्यांवर त्यांची हुकुमत होती हे विशेष. हिंदी, बंगाली भाषेवर त्यांचं प्रभुत्व होतंच पण ते मराठी आणि विशेषतः मालवणी भाषेत गप्पा मारत असत.
"अशी चिकमोत्याची माळ"  हे अप्रतिम गणेशगीत त्यांनी अरविंद हळदीपूर यांच्या सोबतीने संगीतबद्ध केलं.  ते अरविंदजी हळदीपूर यांच्यासह "अरविंद-निर्मल" या नावाने संगीत देत असत. संगीतकार राजेश रोशनजींच्या टीममध्ये ते नेहमीच असत. वाद्य संयोजक म्हणून अनेक गाण्यात त्यांचं योगदान आहे.

73 व्या बर्लिन इंटरनॅशनल  फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'घाट' चित्रपटाचा होणार प्रमिअर

Ghaath: छत्रपाल निनावे यांच्या  घाट या चित्रपटाचा प्रमिअर 73 व्या बर्लिन इंटरनॅशनल  फिल्म फेस्टिव्हलमध्ये होणार आहे. 





Ved Movie: 'वेड' आता नव्या रुपात; चित्रपटात करण्यात आले 'हे' बदल, प्रेक्षकांना पाहता येणार सत्या आणि श्रावणीच्या प्रेमाची जादू

Ved Movie : अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि अभिनेत्री जिनिलिया देशमुख (Genelia Deshmukh) यांचा 'वेड' (Ved) हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. हा चित्रपट लवकरच 50 कोटींच्या क्लबमध्ये सामील होईल, असं म्हटलं जात आहे. आता वेड या चित्रपटाच्या टीमने या चित्रपटाबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. या चित्रपटात काही बदल करण्यात आले आहेत. रितेशने एक व्हिडीओ शेअर करुन याबाबत प्रेक्षकांना सांगितलं. 



पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Gadad Andhar Trailer: 'गडद अंधार' चा ट्रेलर झाला रिलीज; चित्रपट 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीस


Gadad Andhar Trailer : पाण्याखालचं विश्व दाखवणारा 'गडद अंधार' (Gadad Andhar) हा मराठी प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज झाल्यापासूनच सर्वांच्या मनात या चित्रपटाबद्दल कुतूहल आहे. 'गडद अंधार'बाबतची उत्कंठा शिगेला पोहोचली असली तरी हा चित्रपट पाहण्यासाठी रसिकांना 3 फेब्रुवारीपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. या चित्रपटातील 'दरिया...' हे गाणं काही दिवसांपूर्वी रिलीज झालं, या गाण्याला रसिकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. आता या चित्रपटातील म्युझिकसह ट्रेलरही रिलीज करण्यात आला आहे. 'गडद अंधार'च्या ट्रेलरचं सोशल मीडियावर कौतुक होत असून, अल्पावधीतच लाखो व्ह्युजही मिळाले आहेत.


Radhika Merchant Mehndi: राधिका मर्चंटच्या हातावर रंगली अनंत अंबानीच्या नावाची मेहंदी; 'घर मोरे परदेसिया' वरील डान्सचा Video Viral


Anant Ambani Radhika Merchant Mehndi : उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी (Nita Ambani) यांचा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) हा राधिका मर्चंटसोबत (Radhika Merchant) लग्नगाठ बांधणार आहे. त्यामुळे अंबानी कुटुंबाच्या घरात उत्साहाचं वातावरण आहे. अनंत आणि राधिका यांच्या प्री-वेडिंग प्रोग्रॅम्सला सुरुवात झाली आहे. मंगळवारी (17 जानेवारी) मेहंदी सोहळा पार पडला. ब्राईड टू बी रधिका मर्चंटचे मेहंदी सोहळ्यातील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये राधिका ही खास लूकमध्ये दिसत आहे. तसेच राधिकाचा मेहंदी सोहळ्यातील एक व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये राधिका 'घर मोरे पिया पर किया' या गाण्यावर थिरकताना दिसत आहे. 


Ved Box Office Collection: रितेश- जिनिलियाची बॉक्स ऑफिसवर जादू कायम; 'वेड' चं कलेक्शन माहितीये?


Ved Box Office Collection : बॉलिवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि अभिनेत्री जिनिलिया देशमुख (Genelia Deshmukh) यांचा वेड हा चित्रपट 'वेड' (Ved) हा चित्रपट 30 डिसेंबर 2022 रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटात रितेश आणि जिनिलिया यांच्यासोबतच अशोक सराफ (Ashok Saraf), विद्याधर जोशी तसेच अभिनेता शुभंकर तावडे आणि जिया शंकर या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. जाणून घेऊयात या चित्रपटाचं कलेक्शन-


Rakhi Sawant: मुकेश अंबानी मदत करतायत; मुकेश अंबानी मदत करतायत; आईच्या तब्येतीबाबत राखी सावंतने दिली महत्त्वाची माहिती


Rakhi Sawant: 'बिग बॉस' फेम अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) ही 'ड्रामा क्वीन' या नावाने ओळखली जाते. राखी ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. राखीने काही दिवसांपूर्वी आदिल खान दुर्रानीसोबत (Adil Khan Durrani) लग्न केले. राखीच्या आईची तब्येत गेल्या काही दिवसांपासून बिघडली आहे. राखीच्या आईवर उपचार सुरु आहेत. राखीने नुकतच मीडियासोबत चर्चा करताना सांगितलं की, "तिच्या आईच्या उपचारासाठी उद्योजक मुकेश अंबानी (Mukesh Ambani) हे तिची मदत करत आहेत." 


Quotation Gang Trailer: अंगावर शहारे आणणारा 'कोटेशन गँग'चा ट्रेलर रिलीज; सनी लिओनी, जॅकी श्रॉफ प्रमुख भूमिकेत


Quotation Gang Trailer : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता जॅकी श्रॉफ (Jackie Shroff) आणि अभिनेत्री सनी लिओन (Sunny Leone) यांच्या कोटेशन गँग (Quotation Gang) या तमिळ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. ट्रेलरमध्ये असे अनेक सीन्स आहेत, जे तुम्हाला थक्क करतील. कोटेशन गँगच्या ट्रेलरमधील डायलॉग्सना प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. कोटेशन गँगचा ट्रेलर पाहिल्यानंतर लक्षात येते की या चित्रपटाचे कथानक गँगवॉरवर आधारित आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.