Entertainment News Live Updates 19 August: टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 19 Aug 2022 05:43 PM
Shamshera On Ott : सिनेमागृहात फ्लॉप ठरलेला रणबीरचा 'शमशेरा' ओटीटीवर रिलीज

Shamshera On Amazon Prime : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरने (Ranbir Kapoor) गेल्या अनेक दिवसांनी 'शमशेरा' (Shamshera) या सिनेमाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं. या सिनेमात रणबीरसोबत वाणी कपूर (Vaani Kapoor), संजय दत्त (Sanjay Dutt) महत्त्वाच्या भूमिकेत दिसून आले होते. आता सिनेमागृहात फ्लॉप ठरलेला हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे. 

'गॉसीप आणि बरंच काही' मालिकेत पाहायला मिळणार कलाकारांची पडद्यामागची धमाल मस्ती!

येत्या 21 ऑगस्टपासून दर रविवारी 'गॉसीप आणि बरंच काही' (Gossip Aani Barach Kahi) या मालिकेच्या माध्यमातून मालिकेतल्या कलाकारांची पडद्यामागची धमाल, मजा, मस्ती आणि गप्पा हे सारं प्रेक्षकांना प्रत्यक्ष पाहायला मिळणार आहे. 





Cuttputlli Motion Poster: : अक्षय कुमारच्या नव्या चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज!

अक्षय कुमारच्या 'कटपुतली' या चित्रपटाच्या अपडेटची चाहते बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होते. नुकतेच या चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज करण्यात आले आहे, तसेच ट्रेलरच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. उद्या म्हणजेच 20 ऑगस्टला या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होणार आहे. या चित्रपटात ‘खिलाडी’ कुमार एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे.


 





‘पाणी आता डोक्यावरून जाऊ लागलंय’, अर्जुननंतर ‘बॉयकॉट’ ट्रेंडवर अभिनेता विजय वर्माची प्रतिक्रिया!

प्रदर्शित होणाऱ्या सर्व बॉलिवूड चित्रपटांवर बहिष्कार टाकण्याचा ट्रेंड सध्या सुरु झाला आहे. बॉलिवूडच्या बड्या स्टार्सच्या चित्रपटांवर बहिष्कार टाकला जात असून, त्याचा थेट परिणाम बॉक्स ऑफिसवर होत आहे. आतापर्यंत प्रदर्शित न झालेल्या चित्रपटांनाही याचा फटका बसला आहे. अभिनेता विजय वर्मा याने देखील आपला संताप व्यक्त केला असून, ‘आता पाणी डोक्यावरून जाऊ लागलं आहे’, अशी प्रतिक्रिया त्याने दिली आहे.

'रॉकेट्री' चित्रपटासाठी घर विकलं? आर. माधवन म्हणाला...

आर. माधवननं एख ट्वीट शेअर केलं आहे. या ट्वीटनं अनेकांचं लक्ष वेधलं.





PHOTO : निळ्यासावळ्या कृष्ण रूपातील ‘या’ अभिनेत्रीला ओळखलंत का?

Santosh Juvekar : संतोष जुवेकरचं आवाहन; 'सणा सारखाच साजरा करा त्याची स्पर्धा करू नका'

Ananya Panday : अनन्या आणि विजयनं केली पूजा

अनन्या पांडेचा ‘सो कूल’ अंदाज, रेड आऊटफिटमध्ये दिसतेय खास!

अनन्या पांडेचा ‘सो कूल’ अंदाज, रेड आऊटफिटमध्ये दिसतेय खास!

'सातव्या मुलीची सातवी मुलगी', झी मराठीची नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

‘बॉयकॉट’ ट्रेंडला घाबरला करण जोहर, ‘लायगर’ संदर्भात घेतला मोठा निर्णय!

करण जोहर त्याचा आगामी ‘लायगर’ हा चित्रपट आधी साऊथ भाषेत दाक्षिणात्य भागांमध्ये रिलीज करणार असल्याचे म्हटले जात आहे. 'लायगर' 25 ऑगस्टला रिलीज होत आहे, ज्यासाठी संपूर्ण टीम मेहनत करत आहे. चित्रपटाचे मुख्य कलाकार अनन्या पांडे आणि विजय देवरकोंडा देशातील विविध शहरांमध्ये जाऊन चित्रपटाचे प्रमोशन करत आहेत. दरम्यान, मीडिया रिपोर्ट्सनुसार, करण जोहर दक्षिण भारतात ‘लायगर’ पहिल्यांदा रिलीज करण्याच्या तयारीत आहे.


वाचा संपूर्ण बातमी

गाण्याच्या माध्यमातून गुंफला भारतीय आणि अनिवासी भारतीयांच्या नात्याचा वीण, महेश काळेंच्या ‘ऐक्य मंत्र’ला उदंड प्रतिसाद!

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त (Independence Day 2022) प्रसिद्ध गायक महेश काळे (Mahesh Kale) आणि जगभरातील अनिवासी भारतीयांच्या मुलांनी ‘ऐक्य मंत्र’ (Aikya Mantra) या शास्त्रीय संगीतावर आधारीत एकात्मतेचे गाणे म्हणत, मातृभूमी भारत आणि भारतीय संस्कृती यांच्याप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली. 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त हे गाणे सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले.


 


‘दुसऱ्या बाळासाठी जरा वाट बघायची’ म्हणत ट्रोल करणाऱ्यांना अभिनेत्री देबिना बॅनर्जीने दिलं सडेतोड उत्तर!

देबिना दुसऱ्यांदा आई होणार आहे. अवघ्या चार महिन्यांपूर्वी तिने एका मुलीला जन्म दिला आहे, त्यामुळे लोक तिच्या दुसऱ्या प्रेग्नन्सीमुळे तिला ट्रोल करत आहेत. दरम्यान, अलीकडेच अभिनेत्रीने सोशल मीडियावर चाहत्यांसाठी एक सेशन आयोजित केले होते, ज्यामध्ये चाहत्यांनी तिला अनेक प्रश्न विचारले.


 





सुनील पाल यांनी दिली राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीची माहिती

राजू श्रीवास्तव यांना अजूनही शुद्ध आलेली नाही. त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रूग्णालयामध्ये उपचार सुरू असून, काल रात्रीपासून त्यांची प्रकृती अधिक खालावली आहे. त्यांचा रक्तदाबही सातत्याने घसरत आहे. त्यांचा जवळचा मित्र आणि कॉमेडियन सुनील पाल (Sunil Pal) याने राजू यांच्या मेंदूने काम करणे बंद केल्याच्या माहितीची पुष्टी केली आहे.


 

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


सुपरवुमनची सुपर कथा; केदार शिंदे दिग्दर्शित "बाईपण भारी देवा" येणार प्रेक्षकांच्या भेटीस


नववर्षाची आनंददायी सुरूवात होणार आहेत. कारण जिओ स्टुडिओज हे प्रेक्षकांना खास भेट देणार आहेत. केदार शिंदे दिग्दर्शित आपल्या सर्वसामान्य आयुष्यातील सुपरवुमनची सुपर कथा "बाईपण भारी देवा" (Baipan Bhari Deva) प्रदर्शित होणार 6 जानेवारी 2023 ला !  पत्नी, बहीण, सासू, मावशी… आपल्या आयुष्यात असलेल्या या सर्व जीवाभावाच्या मैत्रिणींना समर्पित असलेला असा हा चित्रपट आहे.


महागडी ज्वेलरी ते 52 लाखांचा घोडा; फक्त जॅकलिनच नाही तर तिची बहिण आणि आईला देखील सुकेशनं दिले कोट्यवधींचे गिफ्ट्स


अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) ही मनी लाँड्रिंग प्रकरणामुळे सध्या चर्चेत आहे. अंमलबजावणी  संचालनालयाने (ED - Enforcement Directorate) अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसवर आरोपपत्र दाखल केलं आहे.  अंमलबजावणी संचालनालयाच्या दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार, जॅकलिनला सुकेश चंद्रशेखरने (Sukesh Chandrashekhar) 10 कोटी रुपयांच्या भेटवस्तू दिल्या आणि हा पैसा सुकेशने केलेल्या 200 कोटींच्या फसवणुकीच्या प्रकरणातला होता. जॅकलिनला याची पूर्वकल्पना असताना तिने ही भेटवस्तू स्वीकारल्यामुळे जॅकलिनला या प्रकरणात आरोपी करण्यात आले आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात आरोपी असणाऱ्या सुकेश चंद्रशेखर या उद्योगपतीनं जॅकलिनला काही महागड्या भेटवस्तू दिल्या.


स्वराज्य महोत्सव’ राष्ट्रीय लघुपट स्पर्धेत 'रेखा'ची बाजी; सांगलीतल्या युवा दिग्दर्शकाच्या कलाकृतीला भरभरुन दाद


विविध विषयांवर आधारित असणाऱ्या लघुपटांना प्रेक्षकांची पसंती मिळते. सध्या प्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव (Ravi Jadhav) यांनी निर्मिती केलेली ‘रेखा’ (Short) ही शॉर्ट फिल्म चर्चेत आहे. या लघुपटाला ‘स्वराज्य महोत्सव’ या राष्ट्रीय लघुपट स्पर्धेत सर्वोत्कृष्ट फिल्म, सर्वोत्कृष्ट  स्त्री कलाकार आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक असे तीन मानाचे पुरस्कार मिळाले आहेत. नुकतीच रवी जाधवनं एक खास पोस्ट शेअर करुन याबाबत माहिती दिली आहे. 


कॉमेडियन मुनव्वरचा शो वादाच्या भोवऱ्यात; भाजपकडून धमकी, कार्यक्रम झाला तर...


प्रसिद्ध कॉमेडियन मुनव्वर फारुकी (Munawar Faruqui) हा त्याच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतो. त्याच्या स्टँडअप कॉमेडिचा शो आता पुन्हा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. भाजपच्या एका नेत्यांकडून तेलंगना सरकारकडे आणि पोलिसांकडे मुनव्वरचा शो रद्द करण्याचे अवाहन करण्यात आलं आहे. 20 ऑगस्ट रोजी हैदराबादमध्ये मुनव्वरचा हा स्टँडअप कॉमेडी शो होणार आहे. हा शो साईबराबामधील HICC कन्वेंशन सेंटरमध्ये आयोजित करण्यात आला.  


'सूरज माझ्या मुलीचा शारीरिक आणि मानसिक छळ करत होता'; जिया खानच्या आईनं न्यायालयात दिली माहिती


2013 मध्ये मुंबई येथे स्वत:च आयुष्य संपवणाऱ्या अभिनेत्री जिया खानच्या (Jiah khan) आईनं बुधवारी (17 ऑगस्ट) न्यायालयात सांगितले की, अभिनेता सूरज पांचोली हा 2012 मध्ये जियावर शारीरिक आणि मानसिक छळ करत होता. रिपोर्टनुसार, जिया खान आणि सूरज पांचोली यांचे अफेअर होते. जियाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी सूरजवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) या प्रकरणाचा तपास करत आहे. सूरज पांचोली हा सध्या जामिनावर बाहेर आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.