Entertainment News Live Updates 18 October : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live :  मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 18 Oct 2022 06:20 PM
Prajakta Gaikwad: प्राजक्ता गायकवाडचा नवा चित्रपट; "काटा किर्रर्र" मधून आली प्रेक्षकांच्या भेटीस

Prajakta Gaikwad: स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेमधून आपल्या अभिनयाची छाप सोडत तमाम मराठी भाषिक प्रेक्षकांच्या मनात घर करणारी, अभिनयाने परिपूर्ण अशी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड (Prajakta Gaikwad) "काटा किर्रर्र" या चित्रपटामधून आपल्या भेटीला आली आहे.  प्रेम करण्यासाठी कोणत्याच गोष्टींच्या बंधनाची गरज नसते, आणि जिथे कोणत्याही प्रकारचे बंधने येतात तिथे प्रेम कधीच होत नाही. काटा किर्रर्र चित्रपटामध्ये अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडनं  मोहिनी ही भूमिका साकरली आहे. आपल्या भावावर म्हणजेच चित्रपटामधील मुख्य कलाकार कांतावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध त्याच्या पाठीशी उभी राहून त्याच्या साठी झगडणारी अशी बहीण आपल्याला चित्रपटामध्ये बघायला मिळेल. आपल्या परिपूर्ण अशा अभिनय कौशल्याने प्राजक्ता गायकवाड हिने मोहिनी या भूमिकेला साजेसा न्याय मिळवून दिला आहे.

Vanita Kharat: 'साथी'; वनिता खरातच्या पोस्टनं वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

Vanita Kharat: महाराष्ट्राची हास्य जत्रा या शोमधील प्रसिद्ध अभिनेत्री वनिता खरात ही तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे सध्या चर्चेत आहे. नुकताच वनितानं सुमित लोंढे याच्यासोबतचा फोटो शेअर केला आहे. या पोस्टला वनितानं 'साथी' असं कॅप्शन दिलं आहे. 





Jeev Majha Guntala: अंतरा आणि मल्हारच्या नव्या प्रवासाला सुरुवात; जीव माझा गुंतलाचा प्रोमो व्हायरल

Jeev Majha Guntala: छोट्या पडद्यावरील जीव माझा गुंतला (Jeev Majha Guntala) या मालिकेला प्रेक्षकांची नेहमी पसंती मिळते. या मालिकेत आता  मल्हार - अंतराच्या नव्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. शितोळे कुटुंबाला होणारा त्रास मल्हारला बघवत नसल्याने तो अंतराचं घर सोडून वेगळं रहण्याचा निर्णय घेणार आहे आणि त्याला अंतराची साथ मिळणार आहे. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये दिसत आहे की दोघांच्या नव्या प्रवासाला सुरुवात झाली असून, त्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागणार आहे. हा प्रवास मल्हारसाठी जास्त आव्हानत्मक आणि खडतर असणार आहे.



AR Rahman, Sachin Tendulkar: फ्रेंडशिप गोल्स! सचिन तेंडूलकर आणि ए.आर. रहमान यांची ग्रेट-भेट, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

AR Rahman, Sachin Tendulkar:  प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमान (AR Rahman) आणि क्रिकेटर सचिन तेंडूलकर (Sachin Tendulkar) यांचा एक खास फोटो नुकताच व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये सचिन आणि  ए.आर. रहमान यांच्यामधील मैत्री दिसत आहेत. ए.आर. रहमाननं हा फोटो ट्विटरवर शेअर केला. हा फोटो शेअर करुन त्यानं कॅप्शनमध्ये लिहिलं, 'मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडूलरसोबत हँग-आऊट करताना.' कॅप्शनमध्ये ए.आर. रहमाननं फ्रँडशिप गोल्स या हॅशटॅगचा वापर केला आहे. तसेच त्यानं सचिनला या ट्वीटमध्ये टॅग देखील केलं आहे. 



Ranveer Singh : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह पुन्हा अडचणीत?

रणवीर नुकताच स्वतः अॅस्टन मार्टिन ही गाडी चालवताना स्पॉट झाला होता. मात्र, याबाबत एका ट्विटर युजरने दावा केला आहे की, या कारचा विमा संपला आहे. स्क्रीनशॉट शेअर करत गुप्ता अण्णा नावाच्या एका ट्विटर युजरने लिहिले की, ‘मुंबई पोलीस रणवीर सिंहवर कठोर कारवाईची करण्याची गरज आहे. तो काल विमा संपलेली कार चालवत होता.’


 





BTS : प्रसिद्ध ‘बॉय बँड’ आता गिटारऐवजी हातात घेणार बंदूका; आता देशासाठी लढणार!

BTS या हिट बँडचे सर्व सदस्य सैन्यात (लष्करी सेवा) सामील होणार असल्याची अधिकृत माहिती त्यांच्या कंपनीकडून जाहीर करण्यात आली आहे. या निवेदनात, संगीत कंपनीने सांगितले की, BTSचे कलाकार ऑक्टोबर महिन्याच्या शेवटापासून सैन्यात सामील होणार आहेत.


 



 





The Kashmir Files 2 : 'द काश्मीर फाइल्स 2' पुढल्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला; विवेक अग्निहोत्रीची माहिती

'द कश्मीर फाइल्स' कधी होणार प्रदर्शित?


श्रेयांश त्रिपाठीने विचारलेल्या प्रश्नाला विवेक अग्निहोत्रीने उत्तर दिलं आहे. विवेकच्या उत्तराने 'द कश्मीर फाइल्स'चे चाहते आनंदी झाले आहेत. त्याने लिहिलं आहे,"काम सुरू आहे. 2023 पर्यंत वाट पाहा". 





Bhediya Poster : 'भेडिया' सिनेमातील कृती सेननचा फर्स्ट लुक आऊट

Kriti Sanon First Look From Bhediya Movie : बॉलिवूड अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) आणि कृती सेननचा (Kriti Sanon) 'भेडिया' (Bhediya) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या सिनेमातील कृती सेननचा लुक समोर आला आहे. 





Jaya Bachchan: 'तुम्ही कोण आहात?'; फोटोग्राफर्सवर भडकल्या जया बच्चन, व्हिडीओ व्हायरल

Jaya Bachchan:  अभिनेत्री  जया बच्चन (Jaya Bachchan) यांनी नुकत्याच मुंबईमध्ये पार पडलेल्या एका फॅशन शोमध्ये हजेरी लावली होती. या शोमध्ये जया या त्यांच्या नातीसोबत म्हणजेच नव्या नवेली नंदासोबत (Navya Naveli Nanda) गेल्या होत्या. यावेळी अनेक फोटोग्राफर्स हे जया बच्चन आणि नव्या यांचे फोटो काढत होते. अशातच जया या फोटोग्राफर्सवर भडकल्या. नुकताच जया बच्चन यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये जया बच्चन या फोटोग्राफर्सवर भडकलेल्या दिसत आहेत. 



Alia Bhatt Delivery : कपूर घराण्यात 'या' महिन्यात होणार चिमुकल्याचं आगमन

Alia Bhatt Delivery : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) सध्या चर्चेत आहेत. लवकरच त्यांच्या घरी एका छोट्या पाहुण्याचं आगमण होणार आहे. रिलायंसच्या एच एन रुग्णालयात आलिया बाळाला जन्म देणार आहे. पिंकव्हिलाच्या रिपोर्टनुसार, आलियाची डिलीव्हरी नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी किंवा डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होऊ शकते. 

Kedar Shinde Post : ‘मायबाप प्रेक्षकांच्या पायावर डोकं ठेवलं तर आपले पाय आपसूकच जमिनीवर रहातात’, लेकीच्या वाढदिवशी केदार शिंदेची खास पोस्ट!

‘महाराष्ट्र शाहीर’ (Maharashtra Shahir) या चित्रपटामुळे निर्माते-दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) सध्या प्रचंड चर्चेत आहेत. या चित्रपटातून केदार शिंदे यांची मुलगी सना शिंदे (Sana Shinde) बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटात सना तिच्या पणजीची म्हणजेच शाहीर साबळे यांच्या पत्नी भानुमती साबळे यांची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटामुळे नवखा चेहरा असली तरी सना शिंदे देखील चर्चेत आली आहे. आज (18 ऑक्टोबर) सनाचा वाढदिवस आहे. तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना वडील केदार शिंदे यांनी खास मोलाचा सल्ला देणारी पोस्ट शेअर केली आहे.


 


 


Bigg Boss Marathi 4 : 'बिग बॉस मराठी'च्या घरातील सदस्यांत 'फ्रेंड टू फ्रेंड' चर्चा

Bigg Boss Marathi 4 : आजच्या भागात समृद्धी यशश्रीसोबत 'फ्रेंड टू फ्रेंड' चर्चा करताना दिसणार आहे. समृद्धी यशश्रीला सांगताना दिसणार आहे की,"मला एक गोष्ट सांगायची आहे, मला तुझ्या 
धैर्याचा कौतुक वाटतं. हे सगळे तुझ्याविरुद्ध असले तरीदेखील".

Drishyam 2 Twitter Reaction: 'अंगावर शहारे आले'; 'दृश्यम-2' च्या ट्रेलरवर नेटकऱ्यांच्या रिअॅक्शन, चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव

Drishyam 2 Twitter Reaction: 'दृश्यम 2' (Drishyam 2) चा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला. या ट्रेलरला नेटकऱ्यांची पसंती मिळाली असून अनेकांनी या ट्रेलरला कमेंट करुन या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. 


एका युझरनं ट्रेलरला कमेंट केली, 'या चित्रपटाचा ट्रेलर वेगळ्याच लेव्हलचा आहे. पाहून अंगावर शहारे आले.' तर दुसऱ्या नेटकऱ्यानं कमेंट केली, 'दृश्यम-2 चा ट्रेलर जबरदस्त आहे. सात वर्षानंतर केस पुन्हा ओपन झाली आहे. आता 18 नोव्हेंबरची वाट बघत आहे.' 'अजय देवगण यांना मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत', अशी कमेंट देखील एका युझरनं केली. 


PHOTO : ‘यह लाल इश्क़, यह मलाल इश्क़’, मनमोहक हास्य पाहून तुम्हीही पडाल प्राजक्ता माळीच्या प्रेमात!

मराठी मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी अभिनेत्री प्राजक्ता माळी ही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीची अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच आपले फोटोशूट सोशल मीडियावर शेअर करत असते.  तिच्या फोटोंची चर्चा चाहत्यांमध्ये नेहमीच रंगल्याचं पाहायला मिळतं.


Happy Birthday Jyotika : साऊथ मनोरंजन विश्व गाजवणाऱ्या ज्योतिकाचा वाढदिवस!

साऊथ स्टार सूर्याप्रमाणेच त्याची पत्नी ज्योतिका देखील साऊथ मनोरंजन विश्वाची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. 18 ऑक्टोबर 1977 रोजी मुंबईत जन्मलेल्या ज्योतिकाने कन्नड, मल्याळम, तेलगू आणि हिंदी चित्रपटांमध्येही काम केले आहे. दक्षिणेतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीमध्ये ज्योतिकाचे नावही आहे. साऊथच्या प्रत्येक चित्रपटात ज्योतिका झळकते.


 





यंदाची दिवाळी ठरणार फिल्मी दिवाळी; घरबसल्या अनुभवता येणार ‘दगडी चाळ 2’चा थरार! जाणून घ्या वेळ आणि दिवस..

पदार्पणातच प्रवाह पिक्चर वाहिनीला मिळणारा प्रेक्षकांचा प्रतिसाद अभूतपूर्व आहे. काही दिवसांपूर्वीच भेटीला आलेला ‘चंद्रमुखी’ चित्रपट जवळपास 1 कोटी 25 लाख प्रेक्षकांनी पाहिला. ‘पावनखिंड’, ‘झिम्मा’, ‘चंद्रमुखी’, ‘कारखानिसांची वारी’ अशा अनेक सुपरहिट चित्रपटांच्या वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियरनंतर प्रवाह पिक्चर वाहिनी प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहे आणखी एक ब्लॉकबस्टर चित्रपट अर्थातच ‘दगडी चाळ 2’. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला आहे.


 





Happy Birthday Kunal Kapoor : सहाय्यक दिग्दर्शक ते अभिनेता; 'रंग दे बसंती' फेम कुणाल कपूरविषयी जाणून घ्या...

Happy Birthday Kunal Kapoor : बॉलिवूड अभिनेता कुणाल कपूर आज 45 वां वाढदिवस साजरा करत आहे. 2004 साली कुणालच्या अभिनय प्रवासाला सुरुवात झाली असली तरी त्याने बॉलिवूडच्या अनेक लोकप्रिय सिनेमांत काम केलं  आहे. अभिनेता होण्याआधी कुणालने अमिताभ बच्चन आणि मनोज बाजपेयीच्या 'अक्स' या सिनेमासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं. 'रंग दे बसंती' या सिनेमामुळे कुणालला लोकप्रियता मिळाली आहे. कुणालने डॉन, आजा नच ले, डियर जिंदगी, गोल्ड अशा लोकप्रिय सिनेमांत काम केलं आहे. 

Allu Arjun Pushpa 2 : अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा: द रूल'च्या शूटिंगला सुरुवात

Allu Arjun Pushpa 2 : दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) 'पुष्पा: द राइज' (Pushpa: The Rise) या सिनेमाने चांगलाच धुमाकूळ घातला. त्यानंतर निर्मात्यांनी या सिनेमाच्या आगामी भागाची घोषणा केली. 'पुष्पा: द रूल' या सिनेमाच्या शूटिंगला आता सुरुवात झाली असून शूटिंगदरम्यानचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 



चहाची भांडी धुण्यापासून सुरु केलेला प्रवास थेट हॉलिवूडपर्यंत पोहचला! वाचा अभिनेते ओम पुरी यांच्याबद्दल..

Om Puri : आयुष्यात अनेक संघर्ष करत असतानाच ओम पुरी यांनी इंडस्ट्रीत मोठं स्थान मिळवलं आणि मेथड अॅक्टिंगचे ते चालते बोलते विद्यापीठ म्हणून ओळखले गेले.त्यांचा जन्म 18 ऑक्टोबर 1950 रोजी हरियाणातील अंबाला येथे झाला. परंतु, त्यांचे शालेय शिक्षण पटियाला येथून झाले. बालपणी त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती फारच हालाखीची होती. उदरनिर्वाहासाठी त्यांनाही काम करावे लागत होते.


 


 





Happy Birthday Swapnil Joshi : लाखो तरुणींच्या गळ्यातील ताईत स्वप्नील जोशीबाबत जाणून घ्या...

Swapnil Joshi Birthday : मराठी मनोरंजनसृष्टीतील 'चॉकलेट बॉय' स्वप्नील जोशीने (Swapnil Joshi) बालपणीच मनोरंजनविश्वात पदार्पण केलं. आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घालण्यासोबत त्याने मराठी-हिंदी मालिका, सिनेमे आणि वेबसीरिज अशा सर्वच माध्यमांत काम केलं आहे. विनोदी अभिनेता म्हणून लोकप्रिय असलेल्या 'चॉकलेट बॉय' स्वप्नील जोशीचा आज वाढदिवस आहे. 





पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


सात वर्षांनी अजय देवगण दिसणार विजय साळगावकरच्या भूमिकेत; 'दृश्यम 2'चा ट्रेलर रिलीज


'दृश्यम' या सिनेमाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. या सिनेमाच्या यशानंतर चाहते 'दृश्यम 2'ची (Drishyam 2) प्रतीक्षा करत होते. आता निर्मात्यांनी 'दृश्यम 2'चा ट्रेलर आऊट केला आहे. सोशल मीडियावर 'दृश्यम 2'चा ट्रेलर चर्चेत आहे. अजयने सिनेमाचं नवं पोस्टर शेअर करत लिहिलं आहे,"खरं हे झाडाच्या मुळाप्रमाणे असतं कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी एक ना एक दिवस बाहेर येतंच". 'दृश्यम 2'चं पोस्टर आणि ट्रेलर सध्या सोशल मीडियावर चांगलचं व्हायरल होत आहे. 'दृश्यम 2'चा ट्रेलर चाहत्यांची उत्सुकता वाढवणारा आहे.


लग्नाआधीच वैशाली ठक्करने संपवलं जीवन; डिसेंबरमध्ये करणार होती लग्न


मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री वैशाली ठक्करने (Vaishali Thakkar) आत्महत्या केल्याने मनोरंजनसृष्टीला मोठा धक्का बसला. तपासादरम्यान पोलिसांना वैशालीच्या खोलीत एक सुसाईड नोट सापडली आहे. आधीच्या बॉयफ्रेडकडून छळ होत असल्याने तिने सुसाईड केल्याचं समोर आलं आहे. वैशालीची जवळची मैत्रीण जान्हवीने मीडियाला माहिती देत म्हटलं आहे की, गेल्या काही दिवसांपूर्वी माझं आणि वैशालीचं फोनवर बोलणं झालं होतं. त्यावेळी दिवाळीनंतर लग्नाची खरेदी करण्यासाठी मी मुंबईत येईल असं वैशाली मला म्हणाली होती. तसेच ती माझ्या घरी काही दिवस राहायला येणार असल्याचंदेखील म्हणाली होती. तिने मला तिच्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल म्हणजेच मितेशबद्दलदेखील सांगितलं होतं. वैशालीने माझं आणि त्याचं व्हिडीओ कॉलद्वारे बोलणं करून दिलेलं. मितेश एक चांगला मुलगा आहे".


आलिया भट्ट मॅटरनिटी लीव्हवर; बाळाच्या जन्मानंतर एक वर्ष घेणार ब्रेक


बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) लवकरच आई होणार आहे. आलिया आणि रणबीर 14 एप्रिलला लग्नबंधनात अडकले आहेत. तर जूनमध्ये आलियाने चाहत्यांना गोड बातमी दिली. गेल्या काही दिवसांपासून आलिया आगामी सिनेमांच्या शूटिंग आणि प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अशातच आलियाने एक मोठा निर्णय घेतला आहे. बाळाच्या जन्मानंतर आलिया एक मोठा ब्रेक घेणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, आलिया तिच्या बाळासोबत जास्तीत जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळेच तिने मोठा ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. आलियाने बाळाच्या जन्मानंतर वर्षभर मॅटरनिटी लीव्हवर जाण्याचा निर्णय घेतला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.


टेंशन होणार खल्लास मनोरंजन होणार झकास; 'फु बाई फू' प्रेक्षकांच्या भेटीला


गेल्या काही दिवसांत वेगवेगळा आशय असलेले मनोरंजनात्मक कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. 'फू बाई फू' (Fu Baai Fu) हा लोकप्रिय कार्यक्रम गेल्या काही दिवासांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या कार्यक्रमाचे तब्बल 14 भाग प्रदर्शित झाले आहेत. आता नऊ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा 'फू बाई फू' हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'फू बाई फू' कार्यक्रमात कॉमेडीचे कार्यक्रम गाजवलेले हरहुन्नरी कलाकार दिसणार आहेत. तसेच काही नवे कलाकार देखील या कार्यक्रमात असणार आहेत. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मराठीतील आघाडीची अभिनेत्री वैदेही परशुरामी करणार असून परिक्षणाची जबाबदारी कॉमेडी क्वीन निर्मिती सावंत आणि उमेश कामत करणार आहेत.


'हाऊस ऑफ द ड्रॅगन'ची प्रतीक्षा संपली; सीझनचा शेवटचा भाग प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज


'हाऊस ऑफ द ड्रॅगन्स'मध्ये (House of the Dragon) 'गेम ऑफ थ्रोन्स' कथेच्या 200 वर्षांपूर्वीची गोष्ट सांगण्यात आली आहे. ही सीरिज यूएस आणि युरोपच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. गेम ऑफ थ्रोन्स प्रमाणे 'हाऊस ऑफ द ड्रॅगन्स'चा एकावेळी एक भाग प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आता या मालिकेतला नऊवा भाग प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. यूएस आणि युरोपमध्ये  एचबीओ आणि  एचबीओ मॅक्सवर वर रात्री नऊ वाजता 'हाऊस ऑफ द ड्रॅगन्स'च्या नऊव्या भागाचा प्रीमियर होणार आहे. तर ऑस्ट्रेलियातील प्रेक्षक Foxtel आणि Binge वर पाहू शकतात. 'हाऊस ऑफ द ड्रॅगन्स'चा आज रात्री प्रेक्षकांच्या भेटीला येणारा नऊवा भाग हा या सीझनचा शेवटचा भाग असणार आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.