Entertainment News Live Updates 17 September : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
Te Me Navhech : 'ती मी नव्हेच' (Te Me Navhech) या सिनेमाची नुकतीच घोषणा करण्यात आली असून लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात श्रेयस तळपदे, उर्मिला मातोंडकर आणि निनाद कामत महत्त्वाच्या भूमिकेत दिसून येणार आहेत. 'ती मी नव्हेच' या सिनेमानं आता सिनेसरिकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी शहरात आजपासून चौथे झाडीपट्टी नाट्य संमेलन सुरू झाले आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक वामन केंद्रे, अभिनेत्री दिपाली सय्यद, माजी मंत्री आ. विजय वडेट्टीवार यांची उद्घाटन सोहळ्याला उपस्थिती होती. विदर्भातील चार जिल्ह्यातल्या झाडीपट्टी रंगभूमीला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी झाडीपट्टी नाट्य संमेलन आयोजित केले जाते. यंदा प्रसिद्ध झाडीपट्टी कलाकार अनिरुद्ध वनकर संमेलनाध्यक्ष आहेत.
Dharmaveer : 'धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे' (Dharmaveer Mukkam Post Thane) या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला असून आता या सिनेमाचा टॉकीज प्रिमिअर होणार आहे. त्यामुळे मराठी सिनेसृष्टीला सुगीचे दिवस दाखवणारा सिनेमा प्रेक्षकांना आता घरबसल्या पाहायला मिळणार आहे.
Nene Vasthunna Teaser : दाक्षिणात्य सुपरस्टार धनुष (Dhanush) सध्या त्याच्या आगामी 'नेने वस्थुन्ना' (Nene Vasthunna) सिनेमामुळे चर्चेत आहे. नुकताच या सिनेमाचा टीझर आऊट झाला आहे. सेल्वाराघवनने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या सिनेमात धनुष दुहेरी भूमिकेत दिसून येणार आहे.
'कौन बनेगा करोडपती'च्या चौदाव्या पर्वाला अखेर करोडपती स्पर्धक मिळाली आहे. सोनी टीव्हीने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर नवा प्रोमो शेअर करत यासंदर्भात माहिती दिली आहे. 'कौन बनेगा करोडपती'च्या चौदाव्या पर्वाला मिळालेली पहिली स्पर्धक कोल्हापूरची एक गृहिणी आहे. कविता चावला असे या पहिल्या करोडपती स्पर्धकाचे नाव आहे.
Shah Rukh Khan : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज वाढदिवस असून बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खाननेदेखील किंग खानला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
बॉलिवूड किंग शाहरुख खान याचा लेक आर्यन खान नुकताच मुंबई विमानतळावर स्पॉट झाला. या दरम्यानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आर्यन खान मुंबई विमानतळावरून बाहेर पडताना दिसतो, तर, अचानक एक चाहता समोर येऊन त्याला लाल गुलाब देतो. आर्यनही ते गुलाब प्रेमाने घेतो. इतकेच नाही तर पुढे गेल्यावर तो पुन्हा एकदा मागे वळून त्या चाहत्याला सलाम करतो. आर्यनच्या या कृतीचे सध्या खूप कौतुक होत आहे.
'ठिपक्यांची रांगोळी' मालिकेतील सुवा आई आणि विठू बाबा अर्थात अभिनेत्री लिना भागवत आणि मंगेश कदम खऱ्या आयुष्यातही नवरा बायको आहेत. दोघे एकाच नाटकात काम करत होते. तिथेच त्यांचे सुर जुळले आणि दोघांनी आयुष्यभरासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. 'आता होऊ दे धिंगाणा' या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांनी आपल्या आठवणींना उजाळा दिला आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, दिनेश विजानच्या हॉरर कॉमेडी चित्रपटात समंथा रुथ प्रभू राजकन्येची भूमिका साकारणार आहे. त्याचबरोबर या चित्रपटात आयुष्मान खुराना व्हॅम्पायरच्या भूमिकेत दिसणार आहे.
अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) याने देखील ट्विट करत शुभेच्छा दिल्या आहेत. 'तुमची दृष्टी, तुमची कळकळ आणि तुमची काम करण्याची क्षमता, या सगळ्या गोष्टी मला खूप प्रेरणा देतात. नरेंद्र मोदीजी यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. येणारी वर्ष तुमच्यासाठी आरोग्यदायी आणि आनंदी जावो हीच सदिच्छा.’
अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा देताना लिहिले की, ‘आदरणीय पंतप्रधान श्री @narendramodi जी! तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! परमेश्वर तुम्हाला उदंड आणि निरोगी आयुष्य देवो! घेतलेली शपथ आणि जबाबदारी पार पाडण्यासाठी तुम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहात! वर्षानुवर्षे करत राहाल! तुमच्या नेतृत्वाबद्दल धन्यवाद! वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा!’
बॉलिवूड अभिनेते परेश रावल यांनी ट्विट करत पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि लिहिले की, 'तुम्हाला दीर्घायुष्य आणि निरोगी आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.'
साऊथ स्टाईल कमालीची अॅक्शन आणि कॉमेडी आणि सोबत रोमँटिक सीन्सचा भरणा असलेला 'राडा' चित्रपट येत्या 23 सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाला आहे. 'राडा' चित्रपटाची सध्या सोशल मीडियावर चांगलीच हवा सुरू आहे. अशातच चित्रपटातील एक नवं कोरं 'मैनाचा पोपट झाला' हे गाणे रसिक प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.
मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीची अभिनेत्री म्हणून जिचे नाव घेतले जाते, अशी नायिका म्हणजे प्राजक्ता माळी. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या प्राजक्ताला भटकंतीची देखील आवड आहे.
टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वात चर्चेत असलेली अभिनेत्री निया शर्मा हिला कोणत्याही ओळखीची गरज नाही. आपल्या कामामुळे तसेच बोल्डनेसमुळे चर्चेत राहणारी निया शर्मा आज अर्थात 17 सप्टेंबरला तिचा वाढदिवस साजरा करत आहे.
अनेक साऊथ चित्रपटांमध्ये काम केलेल्या रश्मिकाचे बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यामागे एक महत्त्वाचे कारण आहे. बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याचा निर्णय का घेतला याचा खुलासा स्वतः रश्मिकाने केला आहे. रश्मिकाने तिच्या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान मीडियाशी संवाद साधला. यादरम्यान रश्मिकाने ती बॉलिवूडमध्ये का आली, हे सांगितले.
‘आरआरआर’ ऑस्करच्या यादीत सामील होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार ऑस्करच्या शर्यतीत दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या या चित्रपटाच्या नावाची चर्चा आहे. अमेरिकन मीडिया कंपनी, ‘व्हरायटी’ने ऑस्करसाठी विविध श्रेणींमध्ये नामांकन मिळणाऱ्या चित्रपटांची संभाव्य यादी जाहीर केली आहे. या यादीत समाविष्ट केलेल्या दोन श्रेणींमध्ये ‘RRR’चे नाव सामील करण्यात आले आहे.
‘पैचान कौन?’ या प्रश्नामुळे प्रसिद्ध झालेला विनोदवीर नवीन प्रभाकर (Navin Prabhakar) आता एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. आगामी ‘आपडी थापडी’ (Aapdi Thaapdi) या मराठी चित्रपटात तो महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार असून, हा चित्रपट दसऱ्याच्या मुहूर्तावर म्हणजेच 5 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.
हॉलिवूड स्टार विल स्मिथला ‘सॅटरडे नाईट लाईव्ह’मध्ये आता सहभागी होता येणार नाहीये. 2022च्या अकादमी अवॉर्ड्समध्ये कॉमेडियन ख्रिस रॉकला थप्पड मारल्याप्रकरणानंतर या शोकडून विल स्मिथवर (Will Smith) कायमची बंदी घालण्यात आली आहे.
पार्श्वभूमी
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
चिंचि चेटकिणीच्या भूमिकेतून वैभव मांगलेंची एक्झिट!
विश्वविक्रमी बालनाट्य अर्थात ‘अलबत्या गलबत्या’ हे चिमुकल्या प्रेक्षक वर्गाच्या चांगलंच पसंतीस उतरलं होतं. या नाटकाने बालरंगभूमीला पुन्हा एकदा एक नवीन जीवनदान दिले होते. या नाटकात प्रसिद्ध अभिनेते वैभव मांगले यांनी साकारलेल्या चिंचि चेटकिणीच्या भूमिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. मात्र, आता वैभव मांगले यांनी या भूमिकेतून आणि या नाटकातून एक्झिट घेतली आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित याची माहिती दिली आहे.
सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर 'विक्रांत रोना' ओटीटीवर रिलीज
दाक्षिणात्य सुपरस्टार किच्चा सुदीप गेल्या अनेक दिवसांपासून 'विक्रांत रोना'मुळे चर्चेत आहे. या सिनेमाने सिनेमागृहात चांगलाच धुमाकूळ घातला. आता सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे. 'विक्रांत रोना' हा सिनेमा हिंदीत डिज्नी प्लस हॉटस्टारवर रिलीज झाला आहे.
'शिवप्रताप गरुडझेप' सिनेमात मनवा नाईक दिसणार सोयराबाईंच्या भूमिकेत
अभिनेत्री, दिग्दर्शिका आणि निर्माती अशी चौफेर मुशाफिरी करत अभिनेत्री मनवा नाईकने आपली स्वत:ची वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे. निर्मात्याच्या भूमिकेत शिरल्यानंतर अभिनेत्री म्हणून ती अभावानेच दिसली. मात्र, बऱ्याच कालावधीनंतर आता ती पुन्हा एकदा अभिनेत्री म्हणून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाली आहे.
'आयएनटी'चं बिगुल वाजलं
जून महिन्यात कॉलेज सुरू झाल्यानंतर नाट्यवेड्या विद्यार्थ्यांना वेध लागतात ते 'आयएनटी' या मानाच्या एकांकिका स्पर्धेचे. वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे गेली दोन वर्ष एकांकिका स्पर्धा होत नव्हत्या. पण आता कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्याने पुन्हा एकदा त्याच जल्लोषात एकांकिका स्पर्धा पार पडणार आहेत. 'आयएनटी' ही एकांकिका विश्वातील अत्यंत मानाची एकांकिका स्पर्धा आहे. या मानाच्या एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी येत्या 20 सप्टेंबरला पार पडणार आहे.
'माझी तुझी रेशीमगाठ' आता पाहा नव्या वेळेत
'माझी तुझी रेशीमगाठ' ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. सध्या ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. गेल्या काही दिवसांपासून 'माझी तुझी रेशीमगाठ' ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची चर्चा रंगत होती. पण आता ही मालिका प्रेक्षकांना नव्या वेळेत पाहायला मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -