Entertainment News Live Updates 16 May : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 16 May 2023 04:23 PM
Adipurush: 'मंगलमय हर भक्त होगा, जब आदिपुरुष का स्वागत होगा'; आदिपुरुष चित्रपटाच्या पोस्टरनं वेधलं लक्ष

Adipurush:  'आदिपुरुष' (Adipurush) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला. या ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता अभिनेता प्रभासनं  (Prabhas)  या चित्रपटाचं एक पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं आहे. या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. प्रभासनं या पोस्टरला खास कॅप्शन देखील दिलं आहे. 





Prashant Damle : निकाल लागला! अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामले

Natya Parishad Election : पंचवार्षिक नाट्य परिषद निवडणूक मध्यंतरी पार पडली पण अध्यक्षपद कोणाकडे जाणार याची प्रतिक्षा सगळ्यांनाच होती. आज अध्यक्षपदासाठीची निवडणूक पार पडली असून अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या (Akhil Bhartiya Marathi Natya Parishad) अध्यक्षपदी प्रशांत दामले (Prashant Damle) यांची निवड झाली आहे. 


वाचा सविस्तर

Akhil Bhartiya Marathi Natya Parishad : अध्यक्षपदासाठीच्या मुख्य मतांच्या मतमोजणीस सुरुवात

Akhil Bhartiya Marathi Natya Parishad : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदासाठीची निवडणूक आज पार पडली आहे. अध्यक्षपदासाठीच्या मुख्य मतांच्या मतमोजणीस सुरुवात झाली असून थोड्याच वेळात अध्यक्षपदी कोण विराजमान होणार याचा निकाल समोर येईल. प्रशांत दामलेंच्या रंगकर्मी नाटक समूहातील संपूर्ण 11 जणांची कार्यकारिणीवर निवड झाली आहे. यात सुशांत शेलार, गिरीश महाजन, विजय चौगुले, संदीप तेंडुलकर, दीपा क्षीरसागर, सविता मालपेकर, संदीप पाटील, विशाल शिंगाडे, विजयकुमार साळुंखे, संजय रहाटे, दीपक रेगेंचा समावेश आहे. 

Amol Kolhe :   अमोल कोल्हेंच्या 'शिवपुत्र संभाजी' महानाट्याचा प्रयोग सुप्रिया सुळेंनी पाहिला; पोस्ट शेअर करत म्हणाल्या, 'अतिशय मोलाचे काम...'

Amol Kolhe :  डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) हे सध्या 'शिवपुत्र संभाजी' (Shivputra Sambhaji) या महानाट्यामधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. अमोल कोल्हे हे या महानाट्याचे प्रयोग संपूर्ण महाराष्ट्रात करत आहेत. नुकताच 'शिवपुत्र संभाजी'  या महानाट्याचा प्रयोग पिंपरी चिंचवड येथे  पार पडला. या प्रयोगाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी हजेरी लावली. 'शिवपुत्र संभाजी' हे महानाट्य पाहिल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी एक खास पोस्ट शेअर करुन या महानाट्याच्या टीमचे कौतुक केले आहे. 



Sheezan Khan KKK 13 : 'खतरों के खिलाडी 13'साठी शीझान खान दक्षिण आफ्रिकेत दाखल

Sheezan Khan On Khatron Ke Khiladi 13 : टीका आणि आरोपांनंतर पुन्हा करिअर घडवण्याची संधी खूप कमी मंडळींना मिळते. अभिनेत्री तुनिषा शर्मा (Tunisha Sharma) आत्महत्येप्रकरणी शीझान खान (Sheezan Khan) पोलिसांच्या ताब्यात होता. आता तुरुंगातून बाहेर आल्यानंतर शीझानला लगेचच 'खतरों के खिलाडी 13'साठी (Khatron Ke Khiladi 13) विचारणा झाली आहे. शीझान आता 'खतरों के खिलाडी 13'मध्ये स्टंट करताना दिसणार आहे. 





Rakhi Sawant : आदिल तुरुंगात मला मारण्याचा कट रचतोय; 'ड्रामाक्वीन' राखी सावंतचा दावा

Rakhi Sawant Blamed Adil Khan : बॉलिवूडची ड्रामाक्वीन राखी सावंतने (Rakhi Sawant) आता आदिल खान दुर्रानीवर (Adil Khan Durrani) नवे आरोप केले आहेत. राखी म्हणाली आहे की,"आदिल खान दुर्रानीने मला मारण्याचा कट रचला आहे. तो तुरुंगात असल्याने त्याने एका व्यक्तीला मला मारण्याची सुपारी दिली आहे". 

Natya Parishad : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचं मतदान पूर्ण

Natya Parishad : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचं मतदान पूर्ण झालं आहे. महाराष्ट्रातून आलेल्या 60 सदस्यांचं मतदान संपन्न झालं असून थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होणार आहे. दुपारी दीडच्या सुमारास निवडणूक अधिकारी गुरुनाथ दळवी अध्यक्षपदाची घोषणा करणार आहेत.

Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते'मालिकेत नवा ट्वीस्ट

Aai Kuthe Kay Karte Marathi Serial Latest Update : 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) ही मालिका सध्या चर्चेत आहे. मालिकेत सध्या ईशा आणि अनिषच्या लग्नाची गडबड सुरू आहे. दरम्यान मालिकेत आता अरुंधतीच्या नव्या नणंदेची एन्ट्री झाली आहे. वीणाच्या येण्याने मालिकेत नवा ट्वीस्ट आला आहे. आता मालिकेच्या आगामी भागात वीणा अनिरुद्धला त्याची जागा दाखवताना दिसणार आहे. 

Cannes Film Festival 2023 : 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'ला आजपासून सुरुवात; 'या' अभिनेत्री उंचावणार देशाची शान

Cannes Film Festival : जगभरातील सिनेप्रेमींसाठी महत्त्वाचा असणाऱ्या 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'ला 
(Cannes Film Festival 2023) आजपासून सुरुवात होत आहे. 76 व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 16 ते 27 मे दरम्यान यंदाचा कान्स फिल्म फेस्टिव्हल पार पडणार आहे. 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'च्या रेड कार्पेटवर दरवर्षी जगभरातील अनेक कलाकार पदार्पण करत असतात. यंदादेखील अनुष्का शर्मापासून मानुषी छिल्लरपर्यंत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर पदार्पण करणार आहेत. 

Natya Parishad : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूक आज पार पडणार

Akhil Bhartiya Marathi Natya Parishad : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या (Akhil Bhartiya Marathi Natya Parishad) अध्यक्षपदाची निवडणूक आज पार पडणार आहे. सोबतच इतर पदांसाठीचीही निवडणूक पार पडेल. यावेळी नाट्य परिषदेच्या निवडणुकीत भाजपनं देखील उडी घेतली आहे. 


Natya Parishad : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूक आज पार पडणार; अध्यक्षपदी कोण विराजमान होणार?

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


पुढच्या सहा महिन्यात PVR Inox चे 50 थिएटर बंद होणार, 333 कोटींचा तोटा झाल्यानंतर कंपनीचा निर्णय


PVR Inox : पीव्हीआर-आयनॉक्स मल्टिप्लेक्स चेन ऑपरेटरला (PVR Inox Multiplex chain) मार्च अखेरच्या तिमाहीत 333 कोटींचा तोटा झाल्यानंतर आता कंपनीने एक मोठा निर्णय घेतला आहे. कंपनीकडून पुढील सहा महिन्यात 50 सिनेमा स्क्रिन्स बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पीव्हीआर-आयनॉक्स मल्टिप्लेक्स कंपनीचे तिमाहीचे आकडे जाहीर करताना ही माहिती देण्यात आली. 


Aai Kuthe Kay Karte: डान्स आणि गाण्यांनी रंगला ईशा आणि अनिषचा साखरपुडा सोहळा


Aai Kuthe Kay Karte:  आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte)  या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. सध्या या मालिकेत सध्या ईशा आणि अनिष यांच्या साखरपुड्या सोहळा सुरु आहे. ईशा आणि अनिष यांचा साखरपुडा देशमुखांच्या घरीच पार पडत आहेत. डान्स आणि गाण्यांनी  ईशा आणि अनिषचा साखरपुड्याचा सोहळा रंगणार आहे. नुकताच 'आई कुठे काय करते' या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये यश हा ईशाचं कौतुक करताना दिसत आहे. 


FTII Recruitment 2023 : FTII मध्ये अनेक पदांवर भरती; सरकारी नोकरी करण्याची इच्छा असेल तर आजच करा अर्ज


FTII Recruitment 2023 : फिल्म अॅन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII) पुणे येथे शिक्षण घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी एफटीआयआयमधून शिक्षण घेतले आहे. आता या एफटीआयआयमध्ये नोकरी करण्याची इच्छा असेल तर तुम्हाला ही संधी उपलब्ध झाली आहे. एफटीआयआयमध्ये गट ब आणि क या श्रेणीच्या पदांसाठी नोकऱ्या उपलब्ध आहेत. यासाठी तुम्हाला ऑनलाइन अर्ज करावा लागेल. 


'फिल्म अॅन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया' मधील (Film and Television Institute of India) भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 29 एप्रिलपासून सुरू झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, FTII मध्ये गट B आणि गट C श्रेणी पदांसाठी एकूण 84 रिक्त जागा आहेत. रिपोर्टनुसार, जे उमेदवार भारतीय नागरिक आहेत आणि केंद्रीय गृह मंत्रालयाने पात्र घोषित केले आहेत तीच मंडळी एफटीआयआयमध्ये भरतीसाठी अर्ज करू शकतात. 


Don 3: डॉन-3 येणार प्रेक्षकांच्या भेटीस; चित्रपटाच्या निर्मात्यांनी दिली मोठी अपडेट


Don 3: बॉलिवूडमधील बदशाह अशी ओळख असणाऱ्या शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan)  डॉन (Don) या चित्रपटाचे दोन भाग रिलीज झाले. यामधील डॉन  (Don: The Chase Begins Again) हा चित्रपट 2006 मध्ये रिलीज झाला तर डॉन- द किंग इज बॅक (Don 2: The King Is Back) हा चित्रपट 2011 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आला. या दोन्ही चित्रपटांमध्ये शाहरुखनं प्रमुख भूमिका साकारली आहे. आता डॉन या चित्रपटाच्या  तिसर्‍या (Don 3) भागाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. आता  'डॉन 3' या चित्रपटाबाबत निर्माते रितेश सिधवानी  (Ritesh Sidhwani)  यांनी मोठी अपडेट दिली आहे. दिग्दर्शक-अभिनेता फरहान अख्तर (Farhan Akhtar) या चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम करत असल्याची माहिती आहे, निर्माते रितेश सिधवानी यांनी दिली आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.