Entertainment News Live Updates 13 September: टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
Hush Hush Trailer : 'हश हश' सीरिजचा ट्रेलर रिलीज ट्रेलर रिलीज झाला आहे. पाहा ट्रेलर:
Sukh Mhanje Nakki Kay Asta : सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळते. लवकरच या मालिकेच्या कथानकात नवं वळण येणार आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून ज्या सुखाची जयदीप-गौरी आणि संपूर्ण शिर्केपाटील कुटुंब आतुरतेने वाट पहाट होते तो क्षण अखेर आलाय. लवकरच शिर्के पाटील कुटुंबात चिमुकल्या पाहुण्याचं आगमन होणार आहे.
Plan A Plan B trailer: प्लान ए प्लान बी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. हा चित्रपट 30 सप्टेंबर रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.
Brahmastra Box Office Collection Day 4 : अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) यांच्या ब्रह्मास्त्र (Brahmastra) या चित्रपटाची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे. हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. चित्रपटातील VFX ला आणि गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. हा चित्रपट रिलीज होऊन चार दिवस झाले आहेत. चौथ्या दिवशी देखील या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. जाणून घेऊयात ब्रह्मास्त्रच्या कलेक्शनबाबत...
Vijay Deverakonda : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) आणि बॉलिवूडमधील अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday) यांचा लायगर (Liger) हा चित्रपट फ्लॉप ठरला. अनन्या पांडेचा अभिनय आणि कथानक यामुळे हा चित्रपट फ्लॉप ठरला असं अनेकांचे मत आहे. आता लायगर फ्लॉप ठरल्यानंतर विजयनं पहिली पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टला विजयनं दिलेल्या कॅप्शननं अनेकांचे लक्ष वेधले.
दाक्षिणात्य अभिनेता विषक नायर 'इमर्जन्सी' चित्मरपटाध्ये साकारणार संजय गांधींची भूमिका!
Emmy Awards 2022 : एमीच्या रेड कार्पेटवर झेंडायाचा जलवा
एमी पुरस्कार सोहळ्यासाठी झेंडायानं खास लूक केला होता. तिनं ब्लॅक स्ट्रॅपलेस गाऊन, सिलव्हर नेकपिस अन् इअरिंग्स असा लूक केला होता. झेंडायाच्या या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले. इन्स्टाग्रामवर झेंडायानं तिच्या या लूकचा फोCटो शेअर केला.
एमी अवॉर्ड्सच्या नामांकन यादीमध्ये ‘सॅक्सेशन’ या ड्रामा सीरिजने 25 वेगवेगळ्या श्रेणींमध्ये आपले स्थान निर्माण केले होते. आता ‘सॅक्सेशन’ला सर्वोत्कृष्ट ड्रामा सीरिज म्हणून एमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
'टेड लासो'ला सर्वोत्कृष्ट विनोदी सीरिजसाठी एमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कोरियन ड्रामा सीरिज ‘स्क्विड गेम’साठी अभिनेता ली जंग जे याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला.
ह्वांग डोंग-ह्युक यांना ‘स्क्विड गेम’ या ड्रामा सीरिजच्या उत्कृष्ट दिग्दर्शनासाठी एमी पुरस्कार मिळाला.
अभिनेत्री जीन स्मार्टला कॉमेडी सीरिज ‘हॅक्स’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.
अभिनेत्री झेंडायाला ‘युफोरिया’ या ड्रामा सीरिजसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा एमी पुरस्कार मिळाला.
Apple TV Plusच्या ‘टेड लासो’ कॉमेडी सीरिजसाठी जेसन सुडेकिसने मुख्य अभिनेता म्हणून दुसऱ्यांदा एमी पुरस्कार जिंकला.
जेरॉड कारमायकलला त्याच्या ‘जेरॉड कारमायकल: रोथॅनियल’साठी व्हरायटी स्पेशलमध्ये सर्वोत्कृष्ट लेखकाचा पुरस्कार देण्यात आला.
‘व्हाईट लोटस’साठी माईक व्हाईटला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार देण्यात आला.
‘वॉच आऊट फॉर द बिग गर्ल्स’साठी सर्वोत्कृष्ट रिअॅलिटी शो विभागात लिझोने एमी पुरस्कार पटकावला.
जॉन ऑलिव्हरने ‘लास्ट वीक टुनाईट’साठी एमी अवॉर्ड जिंकला. या विभागात ‘द डेली शो विथ ट्रेवर नोह’, ‘लेट नाईट विथ सेथ मेयर्स’, ‘द लेट शो विथ स्टीफन कोल्बर्ट’ यांना देखील नामांकन मिळाले होते.
25 वेगवेगळ्या श्रेणींमध्ये नामांकनांसह एमी अवॉर्ड्समध्ये इतिहास रचणाऱ्या एचबीओच्या ‘सक्सेशन’साठी मॅथ्यू मॅकफॅडन यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा एमी पुरस्कार मिळाला.
25 वेगवेगळ्या श्रेणींमध्ये नामांकनांसह एमी अवॉर्ड्समध्ये इतिहास रचणाऱ्या एचबीओच्या ‘सक्सेशन’साठी मॅथ्यू मॅकफॅडन यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा एमी पुरस्कार मिळाला.
अभिनेत्री आआंद ज्युलिया गार्नरला ‘ओझार्क’ या सीरिजसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री श्रेणीमध्ये एमी पुरस्कार मिळाला.
अमेरिकन अभिनेत्री शेरिल ली राल्फ हिला विनोदी चित्रपट श्रेणीतील सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा एमी पुरस्कार पटकावला आहे.
अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथील मायक्रोसॉफ्ट थिएटरमध्ये 74व्या एमी पुरस्कार सोहळ्याचे (Emmy Awards 2022 ) आयोजन करण्यात आले आहे. पुरस्कार सोहळ्याचे थेट प्रक्षेपण अमेरिकेतील एनबीसी आणि पीकॉक टीव्हीवर होत असताना, भारतातही हा पुरस्कार सोहळा आज थेट पाहता येत आहे.
पार्श्वभूमी
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
‘शिवप्रताप गरुडझेप’चा टीझर रिलीज; अमोल कोल्हेंनी शेअर केली पोस्ट
क्ताचा एकही थेंब न सांडता आपल्या बुद्धिचातुर्याच्या बळावर औरंगजेबाच्या बलाढ्य मुघल सत्तेचा पोलादी पहारा भेदून केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटकेचा प्रसंग आता ‘शिवप्रताप गरुडझेप’या चित्रपटामधून प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज झाला आहे. या टीझरनं सध्या नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. नुकतीच अभिनेते अमोल कोल्हे यांनी एक पोस्ट शेअर करुन ‘शिवप्रताप गरुडझेप’ या चित्रपटाचा टीझर रिलीज झाल्याची माहिती दिली.
आलिया-रणबीरच्या 'ब्रह्मास्त्र'ची रेकॉर्डब्रेक कमाई; सुपरहिट 'ब्रह्मास्त्र' 200 कोटींच्या क्लबमध्ये सामील
बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्टचा (Alia Bhatt) बहुचर्चित 'ब्रह्मास्त्र' (Brahmastra) हा सिनेमा सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घालतो आहे. रिलीजच्या तिसऱ्याच दिवशी या सिनेमाने जगभरात रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. जगभरात 'ब्रह्मास्त्र' सिनेमा 200 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. 'ब्रह्मास्त्र' या सिनेमाने रिलीजआधीच अनेक रेकॉर्ड केले होते. त्यामुळे या सिनेमाकडून प्रेक्षकांच्या खूप अपेक्षा होत्या. 'ब्रह्मास्त्र' सिनेमा बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात यशस्वी ठरला आहे. 'ब्रह्मास्त्र'चे अनेक शो हाऊसफुल्ल जात आहेत. जगभरात हा सिनेमा 200 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. अवघ्या तीन दिवसांत या सिनेमाने जगभरात 225 कोटींचा गल्ला जमवला आहे.
जॅकलीन फर्नांडिसला दिल्ली पोलिसांकडून समन्स; 14 सप्टेंबरला हजर राहण्याचे निर्देश
बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) गेल्या अनेक दिवसांपासून मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामुळे चर्चेत आहे. आता दिल्ली पोलिसांकडून जॅकलीनला मनी लाँड्रिंग प्रकरणी समन्स बजावण्यात आला आहे. 14 सप्टेंबरला जॅकलीनला न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. जॅकलीनला याआधी 12 सप्टेंबरला न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले होते. पण काही कारणांमुळे जॅकलीन आज न्यायालयात जाऊ शकली नाही. त्यामुळे तिला आता 14 सप्टेंबरला न्यायालयात हजर राहण्याचं समन्स पोलिसांनी दिलं आहे.
'पोन्नियिन सेल्वन' देणार 'ब्रह्मास्त्र'ला टक्कर; रिलीजआधीच केली कोट्यवधींची कमाई
गेल्या काही दिवसांपासून बॉक्स ऑफिवर दाक्षिणात्य सिनेमांचा दबदबा आहे. दाक्षिणात्य सिनेमांना टक्कर देत बॉलिवूडचा 'ब्रह्मास्त्र' सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. तर दुसरीकडे 'ब्रह्मास्त्र'ला टक्कर देत 'पोन्नियिन सेल्वन' (Ponniyin Selvan) या सिनेमाने रिलीजआधीच कोट्यवधींची कमाई केली आहे. मणिरत्नमच्या 'पोन्नियिन सेल्वन' या सिनेमाची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली आहे. त्यामुळे आता या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. रिपोर्टनुसार, 500 कोटींच्या बजेटमध्ये 'पोन्नियिन सेल्वन' सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -