Entertainment News Live Updates 13 october: टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live :  मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 13 Oct 2022 05:36 PM
Chal Ab Wahan: ‘चल अब वहाँ’; वैभव आणि पूजाकडून चाहत्यांना सरप्राइज; हिंदी अल्बम होणार रिलीज

Chal Ab Wahan: गेल्या काही दिवसांपासून  वैभव तत्ववादी (Vaibhav Tatwawadi) आणि पूजा सावंत (Pooja Sawant) ही प्रेक्षकांची आवडती जोडी एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र हे दोघे नेमके कशासाठी एकत्र येणार याचा खुलासा मात्र झाला नव्हता. नुकतीच या दोघांनी ‘चल अब वहाँ’ (Chal Ab Wahan) या आपल्या आगामी रोमँटिक हिंदी सॉंग अल्बमची घोषणा करत आपल्या चाहत्यांना ‘सरप्राइज’ दिलं आहे. नुकताच या अल्बमचा प्रकाशन  सोहळा दिमाखात संपन्न झाला. मराठी रुपेरी पडद्यावरची ही हिट जोडी आता ‘चल अब वहाँ’ या ‘व्हिडीओ पॅलेस’ निर्मित पहिल्या हिंदी अल्बममध्ये आपल्याला रोमँटिक अंदाजात दिसणार आहे. 


Bigg Boss Marathi 4: बिग बॉसच्या घरात रंगणार कॅप्टन्सी कार्य; जो गाडी व्यवस्थित करणार पार्क, तोच ठरणार 'पार्किंगचा किंग'

Bigg Boss Marathi 4:  छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कार्यक्रम 'बिग बॉस मराठी'चा(Bigg Boss Marathi 4) चौथा सीझन आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सीझनमधील स्पर्धकांमुळे, त्यांच्यात होणाऱ्या वादामुळे हा शो सध्या चर्चेत आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर हे करतात बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज पार्किंगचा किंग हे कॅप्टन्सी कार्य रंगणार आहे. या टास्कमध्ये कोण विजयी होणार आहे? या प्रश्नाचं उत्तर लवकरच प्रेक्षकांना मिळेल. 



Urvashi Rautela: 'आधी इराणमध्ये आणि आता भारतात...'; उर्वशी रौतेलाची पोस्ट चर्चेत

Urvashi Rautela: बॉलिवूड अभिनेत्री  उर्वशी रौतेला (Urvashi Rautela)  तिच्या स्टाईलनं प्रेक्षकांची मनं जिंकते. उर्वशी ही सध्या तिच्या चित्रपटांबरोबरच तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे देखील चर्चेत आहे. नुकतीच उर्वशीनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये महिलांच्या समस्या मांडल्या आहेत. 



Sonu Sood: मदतीसाठी चाहत्यांची गर्दी; भोवळ येऊन पडलेल्या महिलेला सोनू सूदने दिलं पाणी

Sonu Sood: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सोनू सूदनं (Sonu Sood)  लॉकडाऊन दरम्यान अनेकांची मदत केली. तो सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतो. अनेक लोक  सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून सोनूला मदत मागतात. त्यांच्या पोस्टला रिप्लाय देऊन सोनू त्यांना मदत देखील करतो. नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये सोनूच्या घराबाहेर लोकांची गर्दी दिसत आहे. 



Mili Teaser: 'फ्रिजर रुम' मध्ये अडकलेल्या तरुणीची गोष्ट; जाह्नवी कपूरच्या 'मिली'चा टीझर पाहिलात?

Mili Teaser:  बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) ही तिच्या स्टाईलनं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. जान्हवीच्या  ‘गुड लक जेरी’, 'रुही'  आणि  ‘धडक’ या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. जान्हवीच्या आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. जान्हवीचा मिली (Mili)  हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज झाला आहे. या टीझरनं अनेकांचे लक्ष वेधलं आहे. 


पाहा टीझर 


Rakul Preet Singh: जॅकी भगनानी आणि रकुल प्रीत सिंह बांधणार लग्नगाठ? अभिनेत्रीनं सोडलं मौन

Rakul Preet Singh: अभिनेता जॅकी भगनानी (Jackky Bhagnani) आणि अभिनेत्री  रकुल प्रीत सिंह (Rakul Preet Singh) हे गेल्या काही दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघांनी गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये त्यांच्या नात्याची घोषणा केली. अनेक वेळा जॅकी आणि रकुल हे एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडिया शेअर करत असतात. लवकरच हे दोघे लग्न करणार आहे, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे. आता या चर्चेवर रकुल प्रीतनं मौन सोडलं आहे. 


एका ट्वीटमध्ये लिहीलं होतं की, रकुल आणि जॅकी  हे लवकरच लग्नगाठ बांधणार आहे. या ट्वीटला रिप्लाय करत रकुल प्रीत सिंह एक ट्वीट शेअर केलं. यामध्ये तिनं लिहिलं, "@AmanPreetOffl तू हे कधी ठरवलं? मला सांगितलं पण नाही भावा. माझ्या आयुष्याबद्दल मला माहित नाही, हे किती मजेशीर आहे.' रकुलच्या या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधले. 


Chhello Show : दिमाखात पार पडला ‘छेल्लो शो’चा प्रीमिअर सोहळा; दीपिका पदुकोण, विद्या बालनसह बॉलिवूडच्या दिग्गजांची हजेरी!

भारताकडून ऑस्कर नामांकनासाठी अधिकृत प्रवेशिका म्हणून पाठवण्यात आलेल्या ‘छेल्लो शो’ (Chhello Show) या गुजराती चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. चिमुकल्यांच्या स्वप्नांची गोष्ट सांगणारा हा चित्रपट उद्या म्हणजेच 14 ऑक्टोबरला देशभरात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा विशेष प्रीमिअर सोहळा नुकताच मुंबईत पार पडला. या प्रीमिअर सोहळ्याला बॉलिवूडच्या दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. दिमाखात हा सोहळा पार पडला आहे.


 





Disha Vakani: दयाबेनला कॅन्सरची लागण? सुंदर अन् जेठालालनं दिली प्रतिक्रिया

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: छोट्या पडद्यावरील  ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही मालिका गेली 14 वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली आहे. या मालिकेतील काही कलाकारांनी मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. त्यापैकी एक अभिनेत्री म्हणजे दिशा वकानी (Disha Vakani) . दिशा यांनी काही वर्षांपूर्वी हा शो सोडला. सध्या दिशा या चर्चेत आहेत. दिशा यांना कॅन्सरची लागण झाली आहे, अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे. आता मालिकेत जेठालाल ही भूमिका साकारणारे दिलीप जोशी आणि सुंदर ही भूमिका साकारणारा मयूर वकानी यांनी एका मुलाखतीमध्ये प्रतिक्रिया दिली आहे. 


सविस्तर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

Video : भरत जाधव, गौरव मोरे अन् निखिल चव्हाणचा लंडनच्या रस्त्यावर ‘हेराफेरी’ परफॉर्मन्स; धमाल व्हिडीओ पाहिलात का?

सध्या भरत जाध, निखिल चव्हाण आणि गौरव मोरे त्यांच्या आगामी ‘लंडन मिसळ’ (London Misal) या चित्रपटासाठी लंडनमध्ये शूटिंग करत आहेत. या शूटिंगमधून थोडासा वेळ काढून ते सोशल मीडियावर व्हिडीओ आणि फोटोंच्या माध्यमातून चाहत्यांना लंडनची झलक दाखवत असतात. मात्र, त्यांनी नुकत्याच शेअर केलेल्या व्हिडीओने चाहत्यांना हसता हसता आठवणींमध्ये रमायला लावलं आहे.


 





Happy Birthday Pooja Hegde : साऊथ चित्रपटांमधून मनोरंजन विश्वात पदार्पण, आता बॉलिवूडमध्येही चर्चेत पूजा हेगडे!

साऊथमधून बॉलिवूडमध्ये वळलेली अभिनेत्री पूजा हेगडे आज तिचा 32वा वाढदिवस साजरा करत आहे. 13 ऑक्टोबर 1990 रोजी मुंबईत जन्मलेल्या पूजाने अल्पावधीतच मनोरंजन विश्वात आपली हक्काची जागा निर्माण केली. पूजाला लहानपणापासूनच मॉडेलिंगची आवड होती. या छंदामुळे तिला मनोरंजन क्षेत्रात काम करण्याची प्रेरणा मिळाली. अभिनेत्री पूजा हेगडेने तिच्या अभिनय कारकिर्दीला तमिळ आणि तेलुगु चित्रपटांतून सुरुवात केली. तिला पहिला चित्रपट ‘मुगामुडी’ला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. या चित्रपटातूनच पूजा साऊथ इंडस्ट्रीत खूप लोकप्रिय झाली.


 





साजिद खानमुळे ‘बिग बॉस 16’ वादात! अभिनेत्री शर्लिन चोप्राकडून सलमान खान आणि निर्मात्यांना कायदेशीर नोटीस

नेहमीप्रमाणेच यंदाचा ‘बिग बॉस 16’ (Bigg Boss 16) वादात अडकला आहे. निर्माता-दिग्दर्शक साजिद खान (Sajid Khan) याला स्पर्धक म्हणून घरात घेतल्याने या शोवर प्रचंड होत आहे. अनेक मॉडेल आणि अभिनेत्रींवर लैंगिक शोषण केल्याचा अर्थात MeToo आरोप झाल्यानंतरही चित्रपट निर्माता साजिद खानला बिग बॉसमध्ये स्पर्धक म्हणून कास्ट केल्याबद्दल आता अभिनेत्री शर्लिन चोप्रा (Sherlyn Chopra) कलर्स चॅनल आणि सलमान खानवर (Salman Khan) संतापली आहे. शर्लिन चोप्रकडून या शोच्या मेकर्सना आणि सलमान खानला कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे.


पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


हुमा आणि सोनाक्षीच्या 'डबल एक्‍सएल' चित्रपटामध्ये शिखर धवन साकारणार भूमिका; ट्रेलर पाहिलात?


बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री  सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) आणि हुमा कुरेशी (Huma Qureshi) यांच्या 'डबल एक्सएल' (Double XL) या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. या ट्रेलरमध्ये दिसत आहे की वाढलेलं वजनामुळे हुमा आणि सोनाक्षी यांना आयुष्यात येणाऱ्या अडचणी दाखवण्यात आल्या आहेत. ट्रेलरच्या सुरुवातीला दिसत आहे की हुमा ही एका पार्टीमध्ये क्रिकेटर शिखर धवनसोबत डान्स करत आहे. हुमानं या चित्रपटात राजश्री त्रिवेदी ही भूमिका साकारली आहे.


बादशाह पुन्हा पडलाय प्रेमात? पंजाबी अभिनेत्रीसोबत डेटिंगच्या चर्चा


प्रसिद्ध रॅपर  बादशाह (Badshah) हा त्याच्या गाण्यांमुळे नेहमी चर्चेत असतो. बादशाह सध्या एमटीव्ही (MTV) वरील हसल 2.0 (Hustle 2.0) या शोनमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. बादशाह सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. बादशाह हा एका पंजाबी अभिनेत्रीला डेट करत आहे, असं म्हटलं जात आहे. कोण आहे अभिनेत्री? ते जाणून घेऊयात...बादशाह आणि अभिनेत्री ईशा रिखी (Isha Rikhi) यांच्या नात्याबाबात सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. दोघे एकमेकांना डेट करत आहेत, असं म्हटलं जात आहे.


सेक्रेड गेम्स फेम अभिनेत्रीकडून इराणमधील हिजाब चळवळीचं समर्थन; व्हिडीओनं वेधलं अनेकांचं लक्ष


इराणमधील (Iran) हिजाब विरोधी चळवळ दिवसेंदिवस आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. आता हिजाब विरोधी चळवळीचं लोण जगभरात पसरलं आहे. विविध सेलिब्रिटी आणि नेटकरी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन इराणमधील हिजाब प्रकरणावर त्यांची प्रतिक्रिया देत आहेत. नुकताच सेक्रेड गेम्स या वेब सीरिजमधील अभिनेत्री एलनाज नौरोजीने (Elnaaz Norouzi) सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये तिनं महिलांच्या अधिकारांबद्दल आणि हक्कांबद्दल भाष्य केलं आहे. 


'गुण जुळणं ही लग्न जुळण्याची पहिली पायरी'; '36 गुण' चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित


लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात असे आपल्याकडे म्हणतात. ग्रह-तारे, पत्रिका, एका भेटीतच साताजन्माच्या गाठी बांधणे वगैरे या सगळयाच्या पलीकडे जाऊन नव्या नात्याची सुरुवात करीत असताना कुंडलीपेक्षा एकमेकांची मतं जुळणं महत्त्वाचं असतं हा विचार मांडणारा समित कक्कड दिग्दर्शित '36 गुण' (36 Gunn) मराठी चित्रपट 4 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. तत्पूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर लॉच सोहळा नुकताच संपन्न झाला. संतोष जुवेकर आणि पूर्वा पवार यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटात पुष्कर श्रोत्री, विजय पाटकर, वैभव राज गुप्ता, स्वाती बोवलेकर हे कलाकार आहेत.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.