Entertainment News Live Updates 12 September : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
Vikram Box Office : कमल हासनचा 'विक्रम' 400 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. आतापर्यंत या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 426 कोटींची कमाई केली आहे.
Ponniyin Selvan : मीडिया रिपोर्टनुसार, अॅमेझॉन प्राईम व्हिडीओने 'पोन्नियिन सेल्वन' या सिनेमाचे राईट्स 125 कोटींमध्ये विकत घेतले आहेत. त्यामुळेच या सिनेमाने रिलीजआधीच 125 कोटींची कमाई केल्याचं म्हटलं जात आहे.
Victoria Marathi Movie : मराठी मनोरंजनविश्वात आता 'व्हिक्टोरिया' (Victoria) सिनेमाच्या चर्चेला सुरुवात झाली आहे. लवकरच हा बहुचर्चित सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जीत अशोक (Jeet Ashok) आणि 'माझा होशील ना' फेम विराजस कुलकर्णीने (Virajas Kulkarni) या सिनेमाच्या माध्यमातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं आहे.
Kanni Movie : मराठमोळी अभिनेत्री हृता दुर्गुळे (Hruta Durgule) गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. 'मन उडू उडू झालं' या हृताच्या मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. त्यानंतर हृताचे 'अनन्या' आणि 'टाइमपास 3' हे दोन सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले. 'अनन्या' सिनेमाच्या माध्यमातून हृताने सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे. आता हृताचा लवकरच 'कन्नी' (Kanni) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Marathi Serial : मराठी मालिका विश्वात गेल्या काही दिवसांपासून नव-नवे प्रयोग होत आहेत. वेगवेगळ्या विषयांवरच्या मालिका (Marathi Serial) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. टीआरपीच्या शर्यतीत मागे पडल्याने गेल्या काही दिवसांत अनेक मालिकांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला. तर नव्या मालिकांच्या प्रोमोंनी प्रेक्षकांचं लक्ष वेधलं. आजपासून प्रेक्षकांना मनोरंजनाचा डबल धमाका मिळणार आहे. 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' (Satvya Mulichi Satvi Mulgi) आणि 'छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नं' (Chotya Bayochi Motthi Swapna) या दोन मालिका आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
Jacqueline Fernandez Money Laundering Case : बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) गेल्या अनेक दिवसांपासून मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामुळे चर्चेत आहे. आता दिल्ली पोलिसांकडून जॅकलीनला मनी लाँड्रिंग प्रकरणी समन्स बजावण्यात आला आहे. 14 सप्टेंबरला जॅकलीनला न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.
Jasmin Bhasin : अभिनेत्री जस्मिन भसीन ही सोशल मीडियावर वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करते. नुकतेच तिनं खास लूकमधील फोटो शेअर केले आहेत.
Koffee With Karan : 'कॉफी विथ करण'च्या आगामी भागात अनिल कपूर आणि वरुण धवन सहभागी होणार आहेत.
वनखिंड, झिम्मा, कारखानिसांची वारी, स्टेपनी, बळी या सिनेमांच्या वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर नंतर आता उत्सुकता आहे चंद्रमुखी सिनेमाची. तेव्हा चंद्राची जादू पुन्हा एकदा अनुभवायला सिद्ध व्हा. 25 सप्टेंबरला दुपारी 1 वाजता प्रवाह पिक्चरवर.
Brahmastra Box Office : 'ब्रह्मास्त्र' या सिनेमाने रिलीजआधीच अनेक रेकॉर्ड केले होते. त्यामुळे या सिनेमाकडून प्रेक्षकांच्या खूप अपेक्षा होत्या. 'ब्रह्मास्त्र' सिनेमा बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात यशस्वी ठरला आहे. 'ब्रह्मास्त्र'चे अनेक शो हाऊसफुल्ल जात आहेत. जगभरात हा सिनेमा 200 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. अवघ्या तीन दिवसांत या सिनेमाने जगभरात 225 कोटींचा गल्ला जमवला आहे.
Shivpratap Garudjhep : ‘आग्र्याहून सुटका’ हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकीर्दीतला अत्यंत महत्त्वाचा आणि थरारक प्रसंग आहे. महाराष्ट्रापासून दूर उत्तरेत आणि तेही औरंगजेबाच्या अमलाखालील प्रदेशात जाऊन सहीसलामत परत येणं ही अशक्यप्राय वाटणारी कामगिरी महाराजांनी फत्ते केली. हाच थरार आता ‘शिवप्रताप गरुडझेप’या चित्रपटामधून प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज झाला आहे. या टीझरनं सध्या नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.
कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज?
एका वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, ब्रह्मास्त्रचे ओटीटी राइट्स हे डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मनं विकत घेतले आहेत. अजून याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. डिज्नी प्लस हॉटस्टार हे ब्रह्मास्त्र चित्रपटाचे डिस्ट्रिब्यूशन पार्टनर आहेत. त्यामुळेच या प्लॅटफॉर्मनं चित्रपटाचे ओटीटी राइट्स विकत घेतले आहेत, असं म्हटलं जात आहे. ऑक्टोबर 2022 मध्ये हा चित्रपट ओटीटीवर रिलीज केला जाईल. या चित्रपटानं तीन दिवसांमध्ये 125 कोटींची कमाई केली.
'ब्रह्मास्त्र चित्रपटाचा बेस्ट पार्ट शाहरुखची भूमिका हा आहे. चार वर्षांनंतर शाहरुखला मोठ्या पडद्यावर पाहिलं. खूप छान वाटलं. हा पर्फेक्ट कॅमिओ आहे.' असं कॅप्शन लिहून एका नेटकऱ्यानं शाहरुखचा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे.
आगामी चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान एका मुलाखतीत स्वरा म्हणाली की, 'माझं लव्हलाईफ उद्ध्वस्त करण्यासाठी मी आदित्य चोप्रा सर आणि शाहरुख खान यांना जबाबदार धरते. शाहरुख खानचा दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे (DDLJ) हा चित्रपट मी तरुण वयात पाहिला आणि तेव्हापासून मी माझ्या आयुष्यातील 'राज'च्या शोधात होते, जो हुबेहूब शाहरुखसारखा असेल. खऱ्या आयुष्यात 'राज' नसतो, हे समजायला मला बरीच वर्षे लागली. त्यामुळे मी रिलेशनशिपमध्ये फारशी रमेन, असे मला वाटत नाही. सिंगल लाईफ कठीण असली, तरी जोडीदार शोधणे त्याहून कठीण आहे.’
एकता कपूरची प्रसिद्ध टीव्ही मालिका 'कसम से' मधून आपल्या करिअरची सुरुवात करणारी अभिनेत्री प्राची देसाई (Prachi Desai) ही बॉलिवूडच्या अशा सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे, ज्यांनी टेलिव्हिजनच्या जगापासून सुरुवात करून बॉलिवूडपर्यंत आपल्या मेहनतीने यश मिळवले आहे. आज (12 सप्टेंबर) अभिनेत्री प्राची देसाई आपला वाढदिवस साजरा करत आहे.
पार्श्वभूमी
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
'आपडी-थापडी'चा टीजर लाँच
अभिनेता श्रेयस तळपदे आणि अभिनेत्री मुक्ता बर्वे यांची जोडी दसऱ्याला एक नवीन चित्रपट घेऊन येत आहे. अभिनेता श्रेयस तळपदे आणि अभिनेत्री मुक्ता बर्वे यांच्या 'आपडी थापडी' या बहुचर्चित चित्रपटाचा टीजर लाँच झाला आहे.
महेश मांजरेकरांनी केली 'निरवधी' सिनेमाची घोषणा
गेल्या काही दिवसांपासून अनेक दर्जेदार मराठी सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. कोरोनामुळे प्रेक्षकांनी सिनेमा पाहण्यासाठी ओटीटी प्लॅटफॉर्मला प्राधान्य दिलं होतं. पण कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर अनेक दर्जेदार सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले. 'झिम्मा', 'पावनखिंड', धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे' या सिनेमांनी सिनेमागृहात चांगलाच धुमाकूळ घातला. आता 'निरवधी' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
बिंदास काव्याचे एका दिवसांत वाढले तब्बल 70 हजार सबस्क्राईबर
औरंगाबादची प्रसिद्ध युट्युबर बिंदास काव्या शुक्रवारी दुपारी अचानक बेपत्ता झाली. काव्याच्या मिसिंगबाबत तिच्या आई-वडिलांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध करून याची माहिती दिली आणि एकच खळबळ उडाली. पण या सर्व घडामोडीनंतर पोलिसांनी अखेर तिला शोधून काढले. पण या काळात काव्याची एवढी चर्चा झाली की, एका दिवसांत बिंदास काव्याचे युट्युबवर तब्बल 70 हजार सबस्क्राईबर वाढले.
सलमान खानच्या अडचणीत वाढ
बॉलिवूड अभिनेता सलमान खान सध्या चर्चेत आहे. आता भाईजानच्या अडचणीत वाढ झाली आहे. पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाच्या हत्येनंतर सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. धमकीचं पत्र मिळाल्यानंतर सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. अशातच आता सिद्धू मूसेवाला हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या एका शूटरने खुलासा केला आहे की, सलमान खान गॅंगस्टर्सच्या निशाण्यावर आहे.
अभिनेते कृष्णम राजू यांचे निधन
दाक्षिणात्य अभिनेते कृष्णम राजू यांचे निधन झाले आहे. कृष्णम राजू यांनी वयाच्या 83 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. टॉलिवूडचे 'रिबेल स्टार' अशी कृष्णम राजू यांची ओळख होती. त्यांनी 180 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. राधे श्याम हा त्यांचा शेवटचा चित्रपट. कृष्णम राजू यांनी सामाजिक, कौटुंबिक, रोमँटिक, थ्रिलर कथानकावर आधारित असणाऱ्या चित्रपटांमध्ये काम केले.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -