Entertainment News Live Updates 12 May : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 12 May 2023 01:09 PM
Salman Khan Dabangg tour In Kolkata: सलमानच्या दबंग टूरच्या तिकीटाची किंमत किती? कोणते सेलिब्रिटी होणार सहभागी? जाणून घ्या...

Salman Khan Dabangg tour In Kolkata: हिंदी चित्रपटसृष्टीचा प्रसिद्ध अभिनेता सलमान खान (Salman Khan) हा त्याच्या चित्रपटामुळे चर्चेत असतो. चित्रपटांसोबतच दबंग टूर रिलोडेड एंटरटेनमेंट कॉन्सर्टच्या माध्यमातून सलमान खान हा प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतो. आता सलमानची दबंग टूर कोलकाता (Kolkata) येथे पोहोचली आहे. काही दिवसांमध्ये कोलकाता येथे दबंग टूर आयोजित केली जाणार आहे.  सलमान खानच्या दबंग टूर कॉन्सर्टचा तिकीट दर किती आहे? हा दबंग टूर कार्यक्रम कधी होणार आहे? याबबात जाणून घेऊयात...



Aai Kuthe Kay Karte : अरुंधती, संजनानंतर अनिरुद्ध आता वीणाच्या मागे; नेटकरी म्हणाले,"आजोबा आता तिसऱ्यांदा लग्न करणार का?"

Aai Kuthe Kay Karte Marathi Serial Latest Update : 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेत आता नवा ट्वीस्ट आला आहे. आता या मालिकेत आशुतोषच्या बहिणीची एन्ट्री होणार आहे. वीणा ही अनिरुद्धची बिझनेस पार्टनर आहे. त्यामुळे संजना आणि अनिरुद्धच्या आयुष्यात मोठा बदल होणार आहे. 





City Of Dreams 3 : सत्तेसाठी अंतिम लढा; 'सिटी ऑफ ड्रीम्स'च्या तिसऱ्या सीझनचा टीझर आऊट

City Of Dreams 3 Season 3 Teaser Out : 'सिटी ऑफ ड्रीम्स' Citi Of Dreams) या बहुचर्चित वेबसीरिजचा तिसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या सीरिजचा धमाकेदार टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या टीझरमधील दमदार डायलॉग प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणारे आहेत. 

Khupte Tithe Gupte : लेदरची मोजडी, खादीचा कुर्ता अन् वागण्यात रुबाब; 'खुपते तिथे गुप्ते'च्या पहिल्या भागात हजेरी लावणार राज ठाकरे!

Raj Thackeray In Khupte Tithe Gupte : लोकप्रिय गायक, दिग्दर्शक आणि निर्माता असलेला अवधूत गुप्तेच्या (Avadhoot Gupte) 'खुप्ते तिथे गुप्ते' (Khupte Tithe Gupte) या कार्यक्रमांचं नवं पर्व लवकरच सुरू होणार आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्याच भागात राज ठाकरे (Raj Thackeray) हजेरी लावणार आहेत.





Gauahar Khan : अभिनेत्री गौहर खानच्या घरी छोट्या पाहुण्याचं आगमन

Gauahar Khan Blessed With Baby Boy : छोट्या पडद्यावर राज्य करणारी अभिनेत्री गौहर खान (Gauahar Khan) सध्या चर्चेत आहे. गौहर खान आणि जैद दरबारच्या (Zaid Darbar) घरी छोट्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्रीने चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. 


वाचा सविस्तर

Parineeti Chopra Raghav Chadha : आकर्षक रोषणाईने सजलं परिणीतीचं मुंबईतलं घर; उद्या दिल्लीत राघव चड्ढा यांच्यासोबत होणार साखरपुडा

Parineeti Chopra Raghav Chadha Engagement : 'लेडीज वर्सेस रिकी बहल'च्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणारी परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) लवकरच आम आदमी पार्टीचे खासदार राघव चड्ढा (Raghav Chadha) यांच्यासोबत लग्नबंधनात अडकणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, येत्या 13 मे ला (उद्या) परिणीती आणि राघव यांचा दिल्लीत साखरपुडा होणार आहे. दरम्यान परिणीतीचं मुंबईतलं घरदेखील आकर्षक रोषणाईने सजलं आहे. 


वाचा सविस्तर

Johnny Depp : प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता जॉनी डेप दिग्दर्शकाच्या भूमिकेत

Hollywood Actor Johnny Depp Announces Modi Biopic: हॉलिवूड (Hollywood) अभिनेता जॉनी डेप (Hollywood Actor Johnny Depp) गेल्या वर्षी त्याची पूर्वाश्रमीची पत्नी अंबर हर्डसोबतच्या (Amber Heard) घटस्फोटाच्या खटल्यामुळे चर्चेत होता. या प्रकरणाचा मात्र त्याच्या कारकिर्दीवर खोलवर परिणाम झाला. त्याला फॅन्टास्टिक बीट्समधून (Fantastic Beats) काढून टाकण्यात आलं. पायरेट्स ऑफ द कॅरिबियनमध्येही (Pirates of The Caribbean) त्याच्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. अशातच आता डेपच्या नवीन प्रोजेक्टबद्दल एक मोठं अपडेट समोर आलं आहे. पण डेप आपल्या नव्या प्रोजेक्टमध्ये कॅमेऱ्यासमोर काम करताना दिसणार नाही तर तो कॅमेऱ्यामागे असणार आहे. डेपनं 1997 मध्ये द ब्रेव्ह नावाचा चित्रपट दिग्दर्शित केला होता. त्यानंतर थेट आता तो 'मोदी' (Modi) नावाचा चित्रपट बनवणार आहे.

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.



The Kerala Story: 'द केरळ स्टोरी'ची बॉक्स ऑफिसवर जादू कायम


The Kerala Story: 'द केरळ स्टोरी' (The Kerala Story) या चित्रपटाची देशभरात चर्चा सुरु आहे. काही प्रेक्षक या चित्रपटाचं कौतुक करत आहेत. तर काही लोक या चित्रपटावर टीका करत आहेत. सुदीप्तो सेन (Sudipto Sen) यांनी दिग्दर्शित केलेला 'द केरळ स्टोरी' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई करत आहे. रिलीज झाल्यानंतर काही दिवसातच या चित्रपटानं 50 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री केली.


Taarak Mehta Ka Ooltah Chashmah:  'तारक मेहता का उल्टा चष्मा' मधील अभिनेत्रीनं असित मोदी यांच्यावर केला लैंगिक छळाचा आरोप


Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या छोट्या पडद्यावर प्रसिद्ध मालिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. गेली कित्येक वर्ष ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. आता या मालिकेचे निर्माते असित मोदी (Asit Modi)  हे सध्या चर्चेत आहेत.  ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत रोशन सिंह सोढी ही भूमिका साकारणारी अभिनेत्री जेनिफर मिस्त्री बंसीवालनं (Jennifer Mistry Bansiwal) असित मोदी आणि मालिकेच्या टीममधील इतर दोन व्यक्तींवर गंभीर आरोप केले आहेत. अभिनेत्री जेनिफर मिस्त्री बंसीवालनं असित मोदी, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेचे प्रोजेक्ट हेड सोहिल रमानी आणि  एग्झीक्युटिव्ह प्रोड्यूसर जतिन बजाज यांच्यावर लैंगिक छळाचा (Sexual harassment) आरोप केला आहे. 


Tuzech Mi Geet Gaat Aahe: स्वराने सगळ्यांना सांगितलं सत्य; 'तुझेच मी गीत गात आहे' मालिकेच्या प्रोमोनं वेधलं लक्ष


Tuzech Mi Geet Gaat Aahe:  तुझेच मी गीत गात आहे (Tuzech Mi Geet Gaat Aahe)  या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.  या मालिकेत स्वरा ऊर्फ स्वराजला गेल्या कित्येक दिवसांपासून बोलता येत नाहीये. पण सध्या तुझेच मी गीत गात आहे  या मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये दिसत आहे की, स्वराज म्हणजे स्वराला आता बोलता येत आहे. हे पाहुन मल्हारला आनंद झाला आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.