Entertainment News Live Updates 11 September : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
Me Ani Dr Kashinath Ghanekar : 'आणि डॉ. काशिनाथ घाणेकर' (Ani Dr Kashinath Ghanekar) हा सिनेमा गेल्या काही वर्षांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला असून आजही हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो आहे. अशातच रमेश भिडे (Ramesh Bhide) लिखीत 'मी आणि डॉ. काशिनाथ घाणेकर' (Me Ani Dr Kashinath Ghanekar) हे पुस्तक प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. दादरच्या रविंद्र नाट्यमंदिरात या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला आहे.
कार्तिक आर्यन आणि सारा अली खानची जोडी चाहत्यांच्या पसंतीस उतरत होती. परंतु त्यांच्या ब्रेकअपने त्यांचे चाहते नाराज झाले होते. या दोघांनी कधीही आपल्या नात्याची अधिकृत घोषणा केली नव्हती. मात्र ब्रेकअपनंतर या दोघांची काही वक्तव्ये चर्चेत आली होती.त्यानंतर ते दोघे कधीच एकत्र दिसून आले नव्हते. मात्र अलीकडे त्यांच्यातील वाद मिटलेला दिसून येत आहे. नुकतंच सारा आणि कार्तिक एकत्र दिसून आले. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
Bigg Boss 16 Date : छोट्या पडद्यावरील वादग्रस्त कार्यक्रम म्हणून 'बिग बॉस' (Bigg Boss) या कार्यक्रमाकडे पाहिलं जातं. बिग बॉसच्या स्पर्धकांमधील राडे, नवनवीन टास्क, मैत्री आणि होणारे वाद यामुळे हा कार्यक्रम नेहमीच चर्चेत असतो. सलमान खानच्या बिग बॉसचे 15 पर्व चांगलेच गाजले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून बिग बॉसचे चाहते 16 व्या पर्वाची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता बिग बॉसच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. 1 ऑक्टोबरला बिग बॉसच्या 16 व्या पर्वाचा ग्रॅंड प्रीमिअर होणार असं म्हटलं जात आहे.
Salman Khan : बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) सध्या चर्चेत आहे. आता भाईजानच्या अडचणीत वाढ झाली आहे. पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाच्या हत्येनंतर सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. धमकीचं पत्र मिळाल्यानंतर सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. अशातच आता सिद्धू मूसेवाला हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या एका शूटरने खुलासा केला आहे की, सलमान खान गॅंगस्टर्सच्या निशाण्यावर आहे.
Bindas Kavya : औरंगाबादची प्रसिद्ध युट्युबर बिंदास काव्या शुक्रवारी दुपारी अचानक बेपत्ता झाली. काव्याच्या मिसिंगबाबत तिच्या आई-वडिलांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध करून याची माहिती दिली आणि एकच खळबळ उडाली. पण या सर्व घडामोडीनंतर पोलिसांनी अखेर तिला शोधून काढले. पण या काळात काव्याची एवढी चर्चा झाली की, एका दिवसांत बिंदास काव्याचे युट्युबवर तब्बल 70 सबस्क्राईबर वाढले.
Niravadhi : महेश मांजरेकरांनी 'निरवधी' सिनेमाचे पोस्टर शेअर करत लिहिलं आहे," महेश वामन मांजरेकर लिखित आणि दिग्दर्शित 'निरवधी'... सुबोध भावे, गौरी इंगवले आणि उपेंद्र लिमये अभिनित... 'निरवधी' 2023 मध्ये येणार प्रेक्षकांच्या भेटीला!!!. 'निरवधी' सिनेमाचे पोस्टर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. महेश मांजरेकरांनी शेअर केलेल्या या पोस्टवर चाहत्यांसह सेलिब्रिटी शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. तर आता पोस्टर आऊट झाल्याने प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत.
BRAHMASTRA : आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या ‘ब्रह्मास्त्र’ सिनेमाने बॉक्सऑफिसवर धमाका केलाय. अवघ्या दोन दिवसातच या सिनेमाने 100 कोटींचा आकडा पार केलाय. दोन दिवसात या सिनेमाने जगभरात 160 कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे सध्या ‘ब्रह्मास्त्र’ बॉक्स ऑफिसव गाजवताना दिसतोय.
Ranbir Kapoor Net Worth : रणबीर कपूरचे मुंबईतील वांद्रा याठिकाणी एक आलिशान घर आहे. रणबीरने 2016 साली हे घर 35 कोटींमध्ये विकत घेतलं होतं. ऋषी कपूरची 256 कोटींची संपत्तीदेखील रणबीरच्या नावावर आहे. रणबीर 359 कोटींचा मालक आहे. यात कृष्णा राज, लग्झरी गाड्यांचादेखील समावेश आहे.
krishnam Raju : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते कृष्णम राजू (krishnam Raju) यांचे निधन झाले आहे. कृष्णम राजू यांनी वयाच्या 83 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. टॉलिवूडचे 'रिबेल स्टार' अशी कृष्णम राजू यांची ओळख होती. त्यांनी 180 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. राधे श्याम हा त्यांचा शेवटचा चित्रपट. कृष्णम राजू यांनी सामाजिक, कौटुंबिक, रोमँटिक, थ्रिलर कथानकावर आधारित असणाऱ्या चित्रपटांमध्ये काम केले.
ब्रह्मास्त्र चित्रपटानं पहिल्या दिवशी 37 कोटींची कमाई केली. तर दुसऱ्या दिवशी ब्रह्मास्त्रनं बॉक्स ऑफिसवर जवळपास 42 कोटींचे कलेक्शन केलं आहे. यामध्ये 37 कोटी हिंदी भाषेतील आणि 5 कोटी इतर भाषांतील कलेक्शन आहे. देशभरातील बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाचं एकूण 79 कोटींची कमाई केली आहे.
पार्श्वभूमी
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
‘रॅप किंग’चा घटस्फोट; 10 वर्षांच्या सुखी संसारानंतर हनी सिंहने घेतला निर्णय
आपल्या गाण्यांनी आणि रॅपने प्रेक्षकांची मनं जिंकणारा लोकप्रिय गायक 'यो यो हनी सिंह'चा (Yo Yo Honey Singh) घटस्फोट झाला आहे. 10 वर्षांच्या सुखी संसारानंतर हनी सिंहने पत्नी शालिनीसोबत घटस्फोट घेतला आहे. 2021 साली हनी सिंहवर घरगुती हिंसाचाराचा आरोप लावण्यात आला होता. हनीने शारीरिक आणि मानसिक शोषण केल्याचा आरोप त्याची पत्नी शालिनीने सोशल मीडियाच्या माध्यमातून केला होता. 2011 साली हनी सिंह शालिनीसोबत लग्नबंधनात अडकला होता. 10 वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांची लग्न करण्याचा निर्णय घेतला. आणि आता लग्नानंतर दहा वर्षांनी घटस्फोट घेतला आहे.
'ब्रम्हास्त्र'ला करावा लागतोय पायरसीचा सामना; रिलीजच्या पहिल्याच दिवशी ऑनलाईन लीक
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) सध्या 'ब्रह्मास्त्र' सिनेमामुळे चर्चेत आहेत. आज हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पण आता या सिनेमाला पायरसीचा सामना करावा लागत आहे. रिलीजच्या पहिल्याच दिवशी हा सिनेमा ऑनलाईन लीक झाला आहे. 'ब्रम्हास्त्र' हा सिनेमा एचडी क्वालिटीमध्ये लीक झाला आहे. अनेक साईटवरून हा सिनेमा नेटकरी डाऊनलोड करत आहेत. धर्मा प्रोडक्शनच्या बॅनरखाली निर्मिती करण्यात आलेल्या या सिनेमात रणबीर कपूर, आलिया भट्ट, अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी रॉय महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. अयान मुखर्जीने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.
‘केवळ दांडी यात्रेने स्वातंत्र्य नाही मिळालं...’, ‘कर्तव्यपथा’च्या उद्घाटनाला कंगनाचं वक्तव्य!
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी गुरुवारी देशाची राजधानी दिल्ली येथील ‘कर्तव्यपथा’चे (Kartavyapath) उद्घाटन केले. या उद्घाटन कार्यक्रमात देशातील अनेक नेते, कलाकार आणि सेलिब्रिटी उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान मोदींनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. या कार्यक्रमात बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतही (Kangana Ranaut) सामील झाली होती. या कार्यक्रमात सहभागी होण्यापूर्वी कंगनाने मीडियाशी संवाद साधला. यावेळी कंगनाने अनेक वक्तव्ये केली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -