Entertainment News Live Updates 10 November : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live :  मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 10 Nov 2022 04:47 PM
Sanjana Ganesan: जसप्रीत बुमराहची पत्नी ट्रोलरवर भडकली; म्हणाली, 'चप्पल सारखं तोंड...'

Sanjana Ganesan: क्रिकेटपटू जसप्रीत बुमराहची (Jasprit Bumrah) पत्नी संजना गणेशन (Sanjana Ganesan) ही सोशल मीडियावर सक्रिय असते. वेगवेगळ्या लूकमधील फोटो ती शेअर करत असते. संजना ही टीव्ही होस्ट आहे. ती सध्या ऑस्ट्रेलियामध्ये टी-20 वर्ल्ड कप कव्हर करत आहे. नुकताच संजनानं ऑस्ट्रेलियामधील एडिलेड येथील एक फोटो शेअर केला. या फोटोला कमेंट करुन एका नेटकऱ्यानं तिला ट्रोल केलं. या ट्रोलरला संजना गणेशननं सडेतोड उत्तर दिलं आहे. 



Aata Hou De Dhingaana: 'होऊ दे धिंगाणा' चा खास एपिसोड; पहिल्यादांच ‘मुलगी झाली हो’ मालिकेतली माऊ बोलणार

Aata Hou De Dhingaana: स्टार प्रवाहवरील ‘आता होऊ दे धिंगाणा’ (Aata Hou De Dhingaana) कार्यक्रमाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळतोय. याच प्रेमापोटी हा कार्यक्रम महाराष्ट्रातला नंबर वन कथाबाह्य कार्यक्रम ठरला आहे. या कार्यक्रमाच्या आगामी एपिसोडची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. आता होऊ दे धिंगाणाचा यावेळेचा एपिसोड रंगणार आहे ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte)  आणि ‘मुलगी झाली हो’ (Mulgi Zali Ho) च्या टीममध्ये. मुलगी झाली हो मालिकेतील माऊ पहिल्यांदाच या मंचावर बोलणार आहे. आजवर प्रेक्षकांनी माऊचा आवाज ऐकलेला नाही. आता होऊ दे धिंगाणाच्या (Aata Hou De Dhingaana) मंचावर पहिल्यांदाच माऊचा आवाज ऐकायला मिळणार आहे.



The Vaccine War: 'द कश्मीर फाइल्स' नंतर आता विवेक अग्निहोत्री यांच्या नव्या चित्रपटाची घोषणा; द वॅक्सीन वॉर 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीस

The Vaccine War 'द कश्मीर फाइल्स' (The Kashmir Files)  या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. या चित्रपटाच्या कथानकाला आणि कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri)  यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. आता द कश्मीर फाइल्स चित्रपटानंतर विवेक अग्निहोत्रींनी त्यांच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे.  ‘द वॅक्सीन वॉर’(The Vaccine War) असं या चित्रपटाचं नाव आहे. ट्वीट शेअर करुन विवेक अग्निहोत्री यांनी त्यांच्या नव्या चित्रपटाची माहिती दिली. 



Malaika Arora : मलायकाच्या पोस्टनं वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष; म्हणाली, 'मी होकार दिला.'

Malaika Arora: अभिनेत्री मलायका आरोरानं (Malaika Arora) नुकतीच एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टला दिलेल्या कॅप्शननं अनेकांचे लक्ष वेधलं आहे. मलायकानं ही पोस्ट शेअर केल्यानंतर आता मलायका लवकरच लग्नबंधनात अडकणार का? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. 


पाहा पोस्ट





Shehnaaz Gill: 'हा चित्रपट पाहून मी रडले'; 'ऊंचाई' चित्रपट पाहिल्यानंतर शहनाज गिलनं व्यक्त केल्या भावना

Shehnaaz Gill: छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री शहनाज गिल (Shehnaaz Gill) ही तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन करते.  बिग बॉस या रिअॅलिटी शोमुळे शहनाज गिलला विशेष लोकप्रियता मिळाली. शहनाजनं नुकतीच ऊंचाई (Uunchai) या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला हजेरी लावली. हा चित्रपट 11 नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला  सलमान खान, अक्षय कुमार, काजोल, माधुरी दीक्षित, जया बच्चन आणि रानी मुखर्जी  हे कलाकार  उपस्थित होते. यावेळी शहनाजनं हा चित्रपट पाहिल्यानंतर प्रतिक्रिया दिली. 



Jacqueline Fernandez: जामीन याचिकेच्या सुनावणीसाठी जॅकलिन फर्नांडिस पोहोचली कोर्टात; व्हिडिओ व्हायरल

Jacqueline Fernandez: 200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणामुळे चर्चेत असलेल्या बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या (Jacqueline Fernandez) नियमित जामीन याचिकेवर आज पटियाला हाऊस कोर्टात सुनावणी होणार आहे. यासाठी जॅकलिन कोर्टामध्ये पोहोचली आहे. नुकताच जॅकलिनचा दिल्ली पटियाला हाऊस कोर्टाबाहेरील  एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये जॅकलिन सुनावणीसाठी कोर्टात जाताना दिसत आहे.



Har Har Mahadev: हर हर महादेव चित्रपटाच्या वादावर शरद पोंक्षे यांची प्रतिक्रिया; म्हणाले, 'हा मुर्खपणा...'

Har Har Mahadev: सध्या हर हर महादेव (Har Har Mahadev) या चित्रपटावरुन राजकारण पेटलं आहे. राजकीय पक्षांसह अनेक संघटनांकडून या सिनेमाला विरोध होत आहे. 'हर हर महादेव' सिनेमात इतिहासाची मोडतोड करण्यात आली आहे. तसेच चुकीच्या पद्धतीने ऐतिहासिक प्रसंग दाखविण्यात आल्याचे बोललं जात आहे. यावर आता अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पंढरपूर येथे हिंदू महासभेच्या वतीने शरद पोंक्षे याना क्रांतिवीर वसंत दादा बडवे हिंदूत्व शॉर्या पुरस्कार प्रदान करण्यात आला, यावेळी पोंक्षे बोलत होते. 


Ranbir Kapoor-Alia Bhatt: आलियाला हॉस्पिटलमधून मिळाला डिस्चार्ज; रणबीर आणि आलिया चिमुकल्या परीला घेऊन पोहोचले घरी

Ranbir Kapoor-Alia Bhatt: आलियाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला  आहे. रणबीर आणि आलिया चिमुकल्या परीला घेऊन घरी पोहोचले आहेचत. 

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Karnataka News : परीक्षेच्या हॉल तिकिटावर चक्क सनी लिओनीचा फोटो! अजब प्रकार पाहून सगळेच थक्क, चौकशीचे आदेश


Sunny Leone Photo On Hall Ticket : कर्नाटकात (Karnataka) एक अजब प्रकार समोर आला आहे. 6 नोव्हेंबर रोजी झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षेच्या (TET-2022) एका परीक्षार्थीच्या हॉल तिकिटावर चक्क प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीचा (Sunny Leone) बोल्ड फोटो दिसला. आता या प्रवेशपत्राचा स्क्रीनशॉट सध्या सोशल मीडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल (Viral Post) होऊ लागला आहे. हा फोटो समोर येताच शिक्षण विभागाने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. काय घडले नेमके?


The Crew: 'द क्रू' चित्रपटाची घोषणा; तब्बू, करिना अन् क्रिती साकारणार प्रमुख भूमिका


The Crew: तब्बू (Tabu), करीना कपूर खान (Kareena Kapoor) आणि क्रिती सेनन (Kriti Sanon) यांनी त्यांच्या अभिनयाने आणि मनोरंजक चित्रपटांनी प्रेक्षकांचे मन नेहमीच जिंकले आहे. आता पहिल्यांदाच बॉलिवूडच्या या तीन सुंदर 'लीडिंग लेडीज' कॉमिक कॅपर 'द क्रू' (The Crew) साठी पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती 'वीरे दी वेडिंग'च्या सुपरहिट निर्मात्या जोडी एकता आर कपूर आणि रिया कपूर यांनी केली असून, दर्शकांना ड्रामा आणि कॉमेडीचा डोस देण्यासाठी सज्ज झाले आहेत. 


Bigg Boss Marathi 4: टास्कमध्ये होणार तुफान राडा; बिग बॉसच्या घरात नवा ग्रुप तयार होणार ?


Bigg Boss Marathi 4: बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi 4) घरामध्ये आज यशश्री, रोहित आणि रुचिरा नवा ग्रुप तयार व्हावा यावर चर्चा करताना दिसणार आहेत. यशश्रीचे म्हणणे आहे, मला एक कळत नाहीये जेव्हा सॅम आली होती तुमच्याकडे प्रोपोसल घेऊन कि आपण एक वेगळा ग्रुप तयार करूयात. पण त्याच्या आधीपासून माझ्या डोक्यात होतं ते. मी जेव्हा या ग्रुपमध्ये गेले होते. तेजू, अमृता, तू, मी आणि रोहित असा एक वेगळा ग्रुप असावा त्यात सॅम नव्हती कुठेही. सॅम जरी म्हणत असली ती वैयक्तिक खेळते तरी तिचा कल त्या ग्रुपकडे खूप जास्त आहे आणि ते तिला कधीपण परत खेचून आणू शकतात हे मी पाहिलं आहे. मला असं वाटतं तुम्हालाही खूप ग्रांटेड घेतलं जातं आणि सगळ्याच बाबतीत कि, जेव्हा हवं तेव्हा आपण त्यांना परत खेचून आणू शकतो. रुचिराचे त्यावर म्हणणे आहे, म्हणजे नॉमिनेट करायला आम्ही पाहिजे पण आमची कॅप्टीन्सी, किंवा container शिप गेली तर हे असताना कशी गेली? तिथे त्यांनी ती जपून ठेवली पाहिजे, पण यांना नॉमिनेट करताना आम्ही करू शकतो. आता रुचिराचा नक्की काय मुद्दाच आहे हे कळेलच आजच्या भागामध्ये .

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.