Entertainment News Live Updates 1 August : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 01 Aug 2022 05:20 PM
Satya Prem Ki Katha : 'भूल भुलैया 2'नंतर कार्तिक-कियाराची जोडी दिसणार 'सत्य प्रेम की कथा' सिनेमात

Satya Prem Ki Katha : बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) आणि कियारा आडवाणीचा (Kiara Advani) 'सत्य प्रेम की कथा' (Satya Prem Ki Katha) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कार्तिक-कियाराची जोडी याआधी 'भूल भुलैया 2' (Bhool Bhulaiyaa 2) या सिनेमात दिसून आली होती. या सिनेमात दोघांची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. त्यामुळे प्रेक्षकांना आता 'सत्य प्रेम की कथा' या सिनेमाची उत्सुकता आहे. 

Majhi Tujhi Reshimgath : वहिनीसमोर येणार अविनाशचे सत्य

'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेत येणाऱ्या भागात एक ट्विस्ट येणार आहे. यश अविनाशसोबत व्हिडीओ कॉलवर बोलत असताना वहिणी येते. वहिणीने अविनाशला पाहू नये यासाठी नेहा वहिनीला अडवण्याचा प्रयत्न करते. पण तरीही वहिनी अविनाशला पाहते. परीचा ड्रायव्हर अविनाश असल्याचे वहिनीला समजल्यानंतर तिला मोठा धक्का बसणार आहे. 

Timepass 3 : 'टाइमपास 3' वादाच्या भोवऱ्यात

'टाइमपास 3' या सिनेमावर मराठी एकीकरण समितीकडून आक्षेप घेण्यात आला आहे. मराठी एकीकरण समितीने फेसबुक पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे. त्यांनी लिहिलं आहे,"रवी जाधव... तुमच्या सिनेमात हिंदी राष्ट्रभाषा असल्याची खोटी माहिती दाखवण्यात आली आहे. राष्ट्रभाषा असण्याचे पुरावे द्या. अन्यथा माफी मागा. अफवा पसरवणे गुन्हा असून तो आपण करत आहात. सिनेमातील ते दृश्य तातडीने काढून टाकावे. आपण सकारात्मक प्रतिसाद द्याल ही अपेक्षा". 

'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपटाचं शूटिंग झालं पूर्ण; रणवीरनं शेअर केला खास व्हिडीओ

Salman Khan Security : बंदुकीचा परवाना अन् बुलेटप्रूफ गाडी; जीवे मारण्याच्या धमकीनंतर सलमानला कडेकोट सुरक्षा

Salman Khan : काही दिवसांपूर्वी  बॉलिवूडचा 'भाईजान' अशी ओळख असणाऱ्या सलमान खानला (Salman Khan) आणि त्याचे वडील लेखक सलीम खान (Salim Khan) यांना धमकीचे पत्र मिळाले होते. या पत्रात त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. सलमानला हे धमकीचं पत्र देण्यामागे बिश्नोई गँगचा खंडणीचा हेतू होता, अशी माहिती सूत्रांनी दिली होती.  धमकीचं पत्र मिळाल्यानंतर आता सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. नुकताच सलमानला मुंबई पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी शस्त्र परवाना दिला आहे. जाणून घेऊयात सलमानच्या सुरक्षेबाबत... 


वाचा सविस्तर बातमी 

‘विक्रांत रोणा’ला चाहत्यांना तुफान प्रतिसाद! अवघ्या चार दिवसांत पार केला 100 कोटींचा टप्पा!

Vikrant Rona : नुकताच रिलीज झालेला 'विक्रांत रोणा'(Vikrant Rona) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे. या चित्रपटाचे अवघ्या चार दिवसांतील कलेक्शन पाहता, हा चित्रपट नक्कीच मोठा विक्रम करू शकेल, असा अंदाज बांधला जात आहे. किच्चा सुदीप (Kiccha Sudeep), जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez), निरुप भंडारी (Nirup Bhandari) आणि नीता अशोक (Neeta Ashok) स्टारर ‘विक्रांत रोणा’ हा चित्रपट 28 जुलै रोजी प्रदर्शित झाला आणि चौथ्या दिवशी या चित्रपटाने जागतिक बॉक्स ऑफिसवर 100 कोटींचा टप्पा ओलांडला आहे.


'फुलाला सुगंध मातीचा' मालिकेच्या कलाकारांचा पर्यावरण रक्षणासाठी पुढाकार; प्लास्टिक बाटल्यांचा 'असा' केला वापर

Phulala Sugandh Maticha : निसर्गाने आपल्याला भरभरुन दिलंय. त्याचं हे सौंदर्य अबाधित राखण्यासाठी आता आपण सर्वांनी पुढाकार घेणं गरजेचं आहे. स्टार प्रवाहवरील (Star Pravah) फुलाला सुगंध मातीचा (Phulala Sugandh Maticha) मालिकेतील कलाकारांनी पर्यावरण रक्षणासाठी पुढाकार घेतलाय. जीजी अक्का म्हणजेच अभिनेत्री अदिती देशपांडे (Aditi Deshpande) यांच्या पुढाकाराने सेटवरच्या प्लास्टिक बाटल्यांचा टाकाऊ पासून टिकाऊ वापर करण्यात येत आहे. 


वाचा सविस्तर बातमी 

'दगडी चाळ 2'मध्ये पाहायला मिळणार डॅडी आणि सूर्यामधील संघर्ष

Daagdi Chawl 2 : 'दगडी चाळ' हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीत एखाद्या वादळासारखा आला आणि त्यानंतर 'चुकीला माफी नाही' असे म्हणणाऱ्या अरुण गुलाब गवळी ऊर्फ ‘डॅडीं'ची पुन्हा सर्वत्र चर्चा सुरू झाली. 'दगडी चाळ 1'ला (Daagdi Chawl) प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिल्यानंतर आता या चित्रपटाचे दुसरे पर्व 18 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात झळकणार आहे. या चित्रपटाचे नवं पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित झाले असून, यात पुन्हा एकदा अंकुश चौधरी (Ankush Chaudhari) आपल्याला सूर्याच्या भूमिकेत दिसतोय.


 



Kiccha Sudeep : 'एका गावातील प्रत्येक घरात माझा फोटो, लोक पूजा करतात'; किच्चा सुदीपनं सांगितला अनुभव

Kiccha Sudeep : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता किच्चा सुदीपनं (Kiccha Sudeep) कन्नड, तमिळ आणि हिंदी भाषांमधील चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्याच्या दाक्षिणात्य चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली.  किच्चा सुदीप हा त्याच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो. सध्या तो विक्रांत रोणा या चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्याचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. एका मुलाखतीमध्ये किच्चा सुगदीपनं सांगितलं की, एका गावामधील प्रत्येक घरात त्याची पूजा केली जाते. या गावाबद्दल किच्चा सुदीपनं माहिती दिली...


वाचा सविस्तर बातमी 

Karan Johar : 'बॉलिवूड संपुष्टात आलंय?'; करण जोहरच्या उत्तरानं वेधलं लक्ष

Karan Johar : गेल्या काही वर्षांपासून बॉलिवूडपेक्षा टॉलिवूड चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळत असल्याचं पहायला मिळतंय. पुष्पा, आरआरआर, विक्रम यांसारख्या साऊथ चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील कलाकारांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत आहे. त्यामुळे आता बॉलिवूड संपुष्टात येणार का? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. बॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक असणाऱ्या करण जोहरनं  (Karan Johar) बॉलिवूडच्या चित्रपटांबाबत आणि बॉक्स ऑफिस कलेक्शनबाबत सांगितलं.


वाचा सविस्तर बातमी 

Appi Amchi Collector : 'अप्पी आमची कलेक्टर' मालिकेच्या प्रोमोची चर्चा; 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीस

Appi Amchi Collector : छोट्या पडद्यावरील मालिकांना प्रेक्षकांची पसंती मिळते. विविध वाहिन्यांवरील मालिका प्रेक्षक आवडीनं बघतात. आता लवकरच झी-मराठी (Zee Marathi) या वाहिनीवर एक नवी मालिका प्रदर्शित होणार आहे. या मालिकेचं नाव 'अप्पी आमची कलेक्टर' (Appi Amchi Collector) असं आहे. या मालिकेचा प्रोमो झी-मराठी वाहिनीच्या सोशल मीडिया (Social Media) अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. कलेक्टर झालेल्या अप्पी नावाच्या एका मुलीची ही गोष्ट असणार आहे, असं प्रोमोमध्ये दिसत आहे. 


पाहा प्रोमो





'महारानी 2'मध्ये मराठमोळी अभिनेत्री अनुजा साठेची एंट्री, साकारणार महत्त्वपूर्ण भूमिका!

Maharani 2 : काही कथा आपल्‍या मनावर अनोखी छाप निर्माण करतात आणि आपल्‍यामध्‍ये अधिकाधिक उत्‍सुकता निर्माण करतात. सोनी लिव्‍हची सीरिज 'महारानी'ची (Maharani 2) कथा देखील अशीच आहे. या सीरिजने लक्षवेधक कथानकासह प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. प्रबळ राजकीय नेता म्‍हणून उदयास येण्‍यासाठी समाजातील पुरूषप्रधान अडथळ्यांचा सामना करणाऱ्या प्रमुख नायिकेच्‍या अवतीभोवती केंद्रित या सीरिजच्‍या मागील पर्वाने प्रेक्षकांमध्ये अधिक उत्‍सुकता निर्माण केली. प्रेक्षकांच्‍या प्रतिक्षेचा शेवट करत ही सीरिज उत्‍साहवर्धक अशा दुसऱ्या पर्वासह परतली आहे. या सीरिजमध्ये आता अभिनेत्री अनुजा साठे (Anuja Sathe) देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.


वाचा संपूर्ण बातमी

‘खतरों के खिलाडी 12’मधून टीव्हीचा प्रसिद्ध अभिनेता एलिमिनेट!

Khatron Ke Khiladi 12: दिग्दर्शक-निर्माता रोहित शेट्टीचा (Rohit Shetty) लोकप्रिय स्टंट रिअॅलिटी शो ‘खतरों के खिलाडी 12’ (Khatron Ke Khiladi 12) प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे. या रिअॅलिटी शोला प्रेक्षकांची खूप पसंती मिळत आहे. इतर शो प्रमाणेच या शोमधून देखील दर आठवड्याला एक स्पर्धक या शोमधून एलिमिनेट होतो. नुकत्याच पार पडलेल्या एलिमिनेशन फेरीत टीव्हीचा प्रसिद्ध अभिनेता या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. या एलिमिनेशन फेरीत जन्नत जुबेर (Jannat Zubair), कनिका मान (Kanika Mann) आणि प्रतीक सहजपाल (Pratik Sehajpal) सहभागी झाले होते. मात्र, यातून प्रतीक सहजपाल स्टंट पूर्ण न करताच करून शोमधून बाहेर पडला आहे. ‘खतरों के खिलाडी 12’मधून आता प्रतीक सहजपाल बाहेर पडला आहे.

बॉलिवूडची ‘पिंक गर्ल’, कथक-भरतनाट्यममध्येही निपुण!

Taapsee Pannu Birthday : बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) नेहमीच काहीना काही कारणांमुळे चर्चेत असते. कधी ट्रेंडिंग विषयांवरील तिच्या कमेंट्समुळे, तर कधी तिच्या चित्रपटातील दमदार अभिनयामुळे तापसी प्रसिद्धी झोतात असते. ‘बेबी’, ‘पिंक’ आणि ‘मुल्क’सारख्या चित्रपटातून तापासीने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आज (1 ऑगस्ट) अभिनेत्री तापसी पन्नू आपला वाढदिवस साजरा करत आहे. तापसीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे.


वाचा संपूर्ण बातमी

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


'पोन्नियिन सेल्वन' सिनेमातील 'कावेरी से मिलने' गाणं आऊट


'पोन्नियिन सेल्वन' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचे पोस्टर आऊट झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. टीझरदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस पडला. आता या सिनेमातील 'कावेरी से मिलने' हे पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.


आमिर खानच्या 'लाल सिंह चड्ढा'वर बहिष्कार घालण्याची नेटकऱ्यांची मागणी


बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा 'लाल सिंह चड्ढा' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमा प्रदर्शित होण्याआधीच सोशल मीडियावर या सिनेमावर बहिष्कार टाकला जात आहे. #BoycottLaalSinghChaddha हे सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये आहे.


विवेक अग्निहोत्रींचा ट्विटरला रामराम


'द कश्मीर फाइल्स'चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री सध्या चर्चेत आहेत. विवेक अग्निहोत्रींनी नुकताच ट्विवटरला रामराम केला आहे. गेल्या काही दिवसांत अनेक सेलिब्रिटींनी ट्रोलिंगला कंटाळून ट्विटरला रामराम ठोकला आहे. आता विवेक अग्निहोत्रींनी ट्विटरला अलविदा केल्याने सोशल मीडियावर ते पुन्हा चर्चेत आले आहेत.


रॅपर बादशाहने 'ऑडी Q8' नंतर खरेदी केली 'Lamborghini Urus'


तरुणाईंच्या लाडक्या रॅपर बादशाहने एक महागडी कार खरेदी केली आहे. बादशाहाने गेल्या काही दिवसांपूर्वी 'ऑडी Q8' ही कार खरेदी केली होती. या कारची किंमत 1 कोटी 23 लाख रुपये होती. बादशाहने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना यासंदर्भात माहिती दिली होती. आता बादशाहने 'Lamborghini Urus' ही कार खरेदी केली आहे.


होय मी संघ स्वयंसेवक! दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरची पोस्ट चर्चेत


'फर्जंद','फत्तेशिकस्त', 'पावनखिंड', 'शेर शिवराज' या सिनेमांच्या यशानंतर दिग्पाल लांजेकर शिवराज अष्टकातील आगामी 'गरुडझेप' या सिनेमाचं काम लवकरच सुरू करणार आहे. दरम्यान दिग्पालने संघाच्या रेशीमबागेला भेट दिली आहे. रेशीमबागेतील अनुभव त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर केला आहे. दिग्पालची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.