Entertainment News Live Updates 04 March : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 04 Mar 2023 05:39 PM
Mithun Ramesh : अभिनेता मिथुन रमेश रुग्णालयात दाखल

Mithun Ramesh Hospitalized : दाक्षिणात्य सिनेसृष्टी गाजवणारा अभिनेता मिथुन रमेशला (Mithun Ramesh) रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिथुनला 'बेल्स पाल्सी' हा दुर्मिळ आजार झाला असून सध्या त्याच्यावर केरळमधील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 'बेल्स पाल्सी' हा अर्धांगवायूचा एक प्रकार आहे. यामध्ये चेहऱ्याच्या काही भागात पॅरेलिसिस होतो.

Mogal Mardini Chatrapati Tararani : सोनाली कुलकर्णी झळकणार 'मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी'च्या भूमिकेत

Sonalee Kulkarni Mogal Mardini Chatrapati Tararani : 'मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी' (Mogal Mardini Chatrapati Tararani) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. महाराणी छत्रपती ताराबाई यांच्या आयुष्यावर आधारित असलेल्या या सिनेमात मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) मुख्य भूमिकेत असणार आहे. मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी' हा सिनेमा ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांच्या कादंबरीवर आधारित आहे. 



Sheezan Khan : "शिझानच्या पाठीशी चाहते खंबीर"; जामीन मिळाल्यानंतर कुटुंबियांनी मानले आभार

Sheezan Khan : अभिनेत्री तुनिशा शर्मा (Tunisha Sharma) आत्महत्येप्रकरणी शिझान खानला (Sheezan Khan) अखेर जामीन मिळाला आहे. 2 महिने आणि 10 दिवसांनी त्याची तुरुंगातून सुटका होणार आहे. शिझानला जामीन मिळाल्याने कुटुंबियांसह चाहते आनंदी झाले आहेत. त्याच्या कुटुंबियांनी चाहत्यांचे आभार मानले आहेत. 

Hrithik Roshan Saba Azad : हृतिक-सबाच्या लग्नाचा मुहूर्त ठरला?

Rakesh Roshan On Hrithik Roshan Saba Azad : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि सबा आझाद (Saba Azad) गेल्या काही दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. अनेकदा दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आले आहे. आता हृतिक आणि सबा लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली आहे. दरम्यान हृतिकचे वडील राकेश रोशन (Rakesh Roshan) यांनी या चर्चांवर मौन सोडलं आहे. 

Sheezan Khan : तुनिषा शर्मा आत्महत्येप्रकरणी शिझान खानला दिलासा

Sheezan Khan : अभिनेत्री तुनिषा शर्मा (Tunisha Sharma) आत्महत्येप्रकरणी अभिनेता शिझान खानला (Sheezan Khan) अखेर दिलासा मिळाला आहे. वसई सत्र न्यायालयातून शिझानला जामिन मिळाला आहे. एक लाखाच्या सिक्युरिटी बॉन्डवर त्याचा जामीन अर्ज मंजूर करण्यात आला आहे.





Virat-Anushka Mahakal Darshan : विराट- अनुष्का वामिकाविना पोहोचले महाकालच्या दर्शनाला

Virat Kohli And Anushka Sharma At Mahakal Temple : भारतीय क्रिकेटर विराट कोहली (Virat Kohli) आणि त्याची पत्नी, अभिनेत्री अनुष्का शर्माने (Anushka Sharma) नुकतचं उज्जैनमधील प्रसिद्ध महाकालेश्वर मंदिरात दर्शन घेतले आहे. दर्शन घेतानाचे त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. विराट-अनुष्काने आज पहाटे 4 वाजता भस्मार्तीदेखील केली आहे. 





Pathaan : खतरनाक! शाहरुखच्या 'पठाण'ने अखेर 'बाहुबली 2'ला टाकलं मागे

Shah Rukh Khan Pathaan Box Office Collection : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) बॉक्स ऑफिसवरचा बादशाह आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. शाहरुख खान, दीपिका पादुकोन (Deepika Padukone) आणि जॉन अब्राहमचा (John Abraham) 'पठाण' बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे. आता या सिनेमाने एसएस राजामौलीच्या 'बाहुबली 2'लादेखील (Baahubali 2) मागे टाकलं आहे. 





पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


गौतमी पाटीलचा 'तो' व्हिडीओ व्हायरल; गुन्हा दाखल, तपास सुरु


Gautami Patil Viral Video : आपल्या नृत्याने सर्वांना घायाळ करणारी नृत्यांगणा म्हणजे गौतमी पाटील (Gautami Patil). गौतमीच्या प्रत्येक कार्यक्रमात राडा होतच असतो. पण गेल्या काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमादरम्यान गौतमी कपडे बदलत असताना ते शूट करुन त्याचा व्हिडीओ व्हायरल करण्यात आला होता. आता पोलिसांनी याप्रकरणाची दखल घेत गुन्हा नोंद केला आहे.


Brahmastra 2 : 'ब्रह्मास्त्र 2' ची रिलीज डेट ठरली?


Ayan Mukerji On Brahmastra 2 : 'ब्रह्मास्त्र' (Brahmastra) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. या सिनेमात बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) शिवाच्या भूमिकेत होता तर आलिया (Alia Bhatt) ईशाच्या. 'ब्रह्मास्त्र' हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असून ते आता या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची प्रतीक्षा करत आहेत. दरम्यान नुकत्याच एका मुलाखतीत अयान मुखर्जीने (Ayan Mukerji) 'ब्रह्मास्त्र 2' (Brahmastra 2) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती दिली आहे. 


आली समीप लग्नघटिका! अखेर अरुंधती-आशुतोष लग्नबंधनात अडकणार


Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. मालिकेतील सर्वच कलाकारांवर प्रेक्षक भरभरुन प्रेम करत आहेत. आता या मालिकेत रंजक वळण आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षक अरुंधती-आशुतोषच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत असून अखेर आता अरुंधती आणि आशुतोष लग्नबंधनात अडकणार आहेत. 'आई कुठे काय करते' या मालिकेमध्ये अरुंधतीच्या आयुष्यात नवं वळण येणार आहे. अरुंधतीने आशुतोषसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर देशमुख कुटुंबातून बऱ्याच चांगल्या-वाईट प्रतिक्रिया उमटल्या. अनिरुद्ध, अभिषेक, कांचन यांनी तीव्र विरोध केला. मात्र यश आणि आप्पांच्या पाठिंब्यामुळे अरुंधतीच्या आयुष्यात सुखाचं चांदणं येऊ पाहतंय.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.