Entertainment News Live Updates 03 March : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 03 Mar 2023 01:58 PM
Alia Bhatt Ranbir Kapoor : आलिया-रणबीरची मुलगी नेमकी कोणासारखी दिसते?

Alia Bhatt Ranbir Kapoor : 'तू झूठी मैं मक्कार' या सिनेमाच्या शूटिंगसाठी रणबीरने 'द कपिल शर्मा शो' (The Kapil Sharma) या कार्यक्रमात हजेरी लावली होती. दरम्यान कपिल शर्माने रणबीरला प्रश्न विचारला,"तुमच्या घरी शेजारच्या बायका येतात का? राहा आलियासारखी दिसते की रणबीरसारखी याबद्दल त्या बोलतात का?". कपिल शर्माला उत्तर देत रणबीर म्हणाला,"राहा नक्की कोणासारखी दिसते याबद्दल आमच्याही मनात गोंधळ सुरू आहे. कारण ती कधी आलियासारखी दिसते तर कधी माझ्यासारखी. पण आमच्या दोघांसारखी ती दिसते ही आनंदाची बाब आहे". 





Brahmastra 2 : 'ब्रह्मास्त्र 2' ची रिलीज डेट ठरली? दिग्दर्शक अयान मुखर्जीने दिली मोठी माहिती

Ayan Mukerji On Brahmastra 2 : 'ब्रह्मास्त्र' (Brahmastra) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. या सिनेमात बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) शिवाच्या भूमिकेत होता तर आलिया (Alia Bhatt) ईशाच्या. 'ब्रह्मास्त्र' हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असून ते आता या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची प्रतीक्षा करत आहेत. दरम्यान नुकत्याच एका मुलाखतीत अयान मुखर्जीने (Ayan Mukerji) 'ब्रह्मास्त्र 2' (Brahmastra 2) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती दिली आहे. 

Aai Kuthe Kay Karte : आली समीप लग्नघटिका! अखेर अरुंधती-आशुतोष लग्नबंधनात अडकणार

Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. मालिकेतील सर्वच कलाकारांवर प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत. आता या मालिकेत रंजक वळण आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षक अरुंधती-आशुतोषच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत असून अखेर आता अरुंधती आणि आशुतोष लग्नबंधनात अडकणार आहेत. 





Allu Arjun : बॉलिवूडमध्ये धमाका करण्यासाठी अल्लू अर्जुन सज्ज

Allu Arjun Sandeep Reddy Vanga Movie Announcement : दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जनचा (Allu Arjun) मोठा चाहतावर्ग आहे. त्याच्या सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. शाहरुखच्या (Shah Rukh Khan) 'जवान' (Jawan) या सिनेमात अल्लू अर्जुनची झलक दिसणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. दरम्यान त्याच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अल्लू अर्जुनचा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. संदीप रेड्डी वांगा (Sandeep Reddy Vanga) या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहे. तर भूषण कुमार (Bhushan Kumar) या सिनेमाची निर्मिती करणार आहे. 





दीपिका पादुकोणने Oscar 2023 मध्ये भारताचे नाव उंचावले

Deepika Padukone On 95th Academy Award : बॉलिवूडची 'मस्तानी', 'डिंपल गर्ल' अर्थात दीपिका पादुकोण (Deepika Padukone) सध्या 'पठाण' (Pathaan) या सिनेमामुळे चर्चेत आहे. अभिनय आणि सौंदर्यामुळे ओळखल्या जाणाऱ्या दीपिकाने 'ऑस्कर 2023'मध्ये (Oscar 2023) भारताचे नाव उंचावले आहे. 'ऑस्कर 2023'च्या प्रेझेंटरच्या यादीत दीपिका पादुकोणचा समावेश झाला आहे. अभिनेत्रीने पोस्ट शेअर करत याबद्दल माहिती दिली आहे. 





Mangala Bansode : कलावंताची हेटाळणी का? गौतमी पाटीलच्या व्हायरल व्हिडीओवर लावणी सम्राज्ञी मंगला बनसोडेंचा सवाल

Mangala Bansode On Gautami Patil : प्रसिद्धीच्या झोतात आलेली नृत्यांगणा गौतमी पाटीलचा (Gautami Patil) एका कार्यक्रमात चेंजिंग रूममध्ये कपडे बदलतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला होता. ही अत्यंत लाजीरवाणी घटना असून यावरून सर्वच क्षेत्रातून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. आता महिला कलावंताचा असा व्हिडिओ काढून तो व्हायरल करणं निंदनीय आहे. महाराष्ट्रात महिला कलावंतांची हेटाळणी का केली जाते?, असा सवाल लावणी सम्राज्ञी मंगला बनसोडे-करवडीकर (Mangala Bansode) यांनी उपस्थित केला आहे.

Shah Rukh Khan : शाहरुखची सुरक्षा धोक्यात; मध्यरात्री भिंत तोडून दोन तरुण शिरले 'मन्नत'मध्ये

Shah Rukh Khan : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shah Rukh Khan) गेल्या काही दिवसांपासून 'पठाण' (Pathaan) सिनेमामुळे चर्चेत आहे. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे. दरम्यान शाहरुखच्या 'मन्नत' (Mannat) बंगल्याबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गुरुवारी रात्री दोन तरुणांनी या बंगल्याची भिंत तोडून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला आहे.



पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Gauri Khan : शाहरुखची पत्नी गौरी खानवर गुन्हा दाखल


Gauri Khan FIR : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानची (Shah Rukh Khan) पत्नी गौरी खानवर (Gauri Khan) गुन्हा दाखल झाला आहे. लखनौच्या (Lucknow) सुशांत गोल्फ सिटी पोलीस ठाण्यात 409 कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईत राहणाऱ्या किरीट जयवंत शहा यांनी हा गुन्हा दाखल केला आहे. गौरी खान (Gauri Khan) तुलसियानी कन्स्ट्रक्शन अॅन्ड डेव्हलपर्स लिमिटेड (Tulsiani Constructions And Developers Pvt. Ltd) या कंपनीची ​​ब्रँड अॅंबेसेडर (Brand Ambassador) आहे. मुंबईत राहणाऱ्या किरीट शहा या व्यक्तीने तुलसियानी कन्स्ट्रक्शन अंतर्गत लखनौमध्ये 86 लाखांचा एक फ्लॅट विकत घेतला होता. पण 86 लाख रुपये घेतल्यानंतर तो फ्लॅट दुसऱ्याच व्यक्तीला दिल्याचा आरोप किरीट यांनी केला आहे. 


Sushmita Sen : सुष्मिता सेनला हृदयविकाराचा झटका, अँजिओप्लास्टीही झाली, आता सुखरुप


Sushmita Sen Heart Attack : बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असते. सुष्मिता आपलं वैयक्तिक आयुष्य नेहमीच तिच्या चाहत्यांबरोबर शेअर करत असते. नुकताच बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनने हृदयविकाराचा झटका आल्याचा खुलासा केला आहे. यानंतर तिला अँजिओप्लास्टी करावी लागली असून आता तब्येत बरी असल्याचं तिने सांगितलं आहे. मिस युनिव्हर्स असलेल्या सुष्मिताने सोशल मीडियावरून आपल्या चाहत्यांना या बातमीची माहिती दिली आहे. 


Sagar Karande : विनोदवीर सागर कारंडेचा 'चला हवा येऊ द्या'ला रामराम


Sagar Karande Chala Hawa Yeu Dya : 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) या कार्यक्रमाच्या माध्यमातून सागर कारंडे (Sagar Karande) हे नाव घराघरांत पोहोचलं आहे. आजवर या कार्यक्रमाच्या माध्यमातून सागरने प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन केलं आहे. पण आता सागरने 'चला हवा येऊ द्या' या बहुचर्चित कार्यक्रमाला रामराम केल्याची बातमी समोर आली आहे. 


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.