Entertainment News Live Updates 01 April : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 01 Apr 2023 06:07 PM
Sarja : 'सर्जा'चा उत्कंठावर्धक ट्रेलर रिलीज

Sarja Marathi Movie : 'सर्जा' (Sarja) या मराठी सिनेमाची घोषणा झाल्यापासून हा सिनेमा चर्चेत आहे. या सिनेमातील गाणी काही दिवसांपूर्वीच संगीतप्रेमींच्या भेटीला आली आहेत. 'जीव तुझा झाला माझा', 'धड धड...' आणि 'संगतीनं तुझ्या' ही सिनेमातील गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत. आता या सिनेमाचा उत्कंठावर्धक ट्रेलर रिलीज झाला आहे. 


Parineeti-Raghav Love Story : 'आप'चे खासदार राघव चढ्ढा परिणीतीला पहिल्यांदा कुठे भेटले?

Parineeti-Raghav Love Story : परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा पंजाबमध्ये एकमेकांना पहिल्यांदा भेटले. पंजाबमध्ये एका सिनेमाचं शूटिंग करत असताना परिणीती राघवला पहिल्यांदा भेटली. त्यानंतर त्यांची चांगली मैत्री झाली. पुढे मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. गेल्या सहा महिन्यांपासून ते एकमेकांना डेट करत आहेत असे म्हटले जात आहे. तेव्हापासूनच त्यांच्या अफेअरच्या चर्चांना सुरुवात झाली. अनेकदा दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आले आहे. अद्याप दोघांनीही लग्नासंदर्भात भाष्य केलेलं नाही. 





Box Office Collection : नानीच्या 'Dasara' पुढे अजयचा 'भोला' पडला मागे

Box Office Collection : Bholaa Dasara Box Office Collection : गेल्या काही दिवसांत अनेक दाक्षिणात्य सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. बॉलिवूडपेक्षा दाक्षिणात्य सिनेमा पाहायला प्रेक्षक पसंती दर्शवत आहेत. हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता अजय देवगणचा 'भोला' (Bholaa) हा सिनेमा 30 मार्चला सिनेमागृहात प्रदर्शित झाला. तर दुसरीकडे दाक्षिणात्य सुपरस्टार नानीचा 'दसरा' (Dasara) हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. 





Nita Ambani Dance Video : नीता अंबानी यांच्या नृत्याचा व्हिडीओ व्हायरल;

Nita Ambani Performance : 'नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर'चा (Nita Mukesh Ambani Cultural Center) उद्धाटन सोहळा नुकताच मुंबईतील वांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये पार पडला. या सोहळ्यादरम्यान सर्व क्षेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावली होती. उद्धाटन सोहळ्यातील सेलिब्रिटींचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत. पण त्याबरोबरच एक व्हिडीओने मात्र सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 'नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर'च्या उद्धाटनादरम्यान नीता अंबानी यांनी भरतनाट्य सादर केलं. 





The Family Man 3 : प्रतीक्षा संपली; 'द फॅमिली मॅन 3'च्या रिलीजबद्दल मनोज वाजपेयी म्हणाला...

The Family Man 3 : 'द फॅमिली मॅन 3' बद्दल बोलताना मनोज म्हणाला,"आज सकाळी एक चिमणी उडत माझ्या खिडकीवर येऊन बसली आणि आम्ही म्हणालो,या वर्षाच्या शेवटी अर्थात 2023 मध्ये 'द फॅमिली मॅन'च्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. तसेच जर पैसे वाचले तर रिलीजदेखील करू. सर्वकाही ठिक होईल". 





NMACC : 'नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर' देशातील सर्वात मोठं कलाकेंद्र

Nita Mukesh Ambani Cultural Center : मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये नीता मुकेश अंबानी यांच्या क्लचरल सेंटरचा (Nita Mukesh Ambani Cultural Center) उद्धाटन सोहळा पार पडला. 'नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर' हे देशातील सर्वात मोठं कलाकेंद्र आहे. या कल्चरल सेंटरच्या माध्यमातून भारतीय संस्कृती जोपासली जाणार आहे. देशभरातील विविध कलेचे प्रकार या मंचावर सादर होणार आहेत. यात नृत्य, अभिनय, संगीत, साहित्य अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे. 


NMACC : 'नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर' देशातील सर्वात मोठं कलाकेंद्र; उद्धाटन प्रसंगी दिग्गजांची मांदियाळी

Masterchef India 7 : 'मास्टरशेफ इंडिया 7'चा विजेता नयनज्योती सेकिया!

Nayanjyoti Saikia Masterchef India 7 Winner : 'मास्टरशेफ इंडिया 7'चा (Masterchef India 7) विजेता कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. आता या पर्वाच्या विजेत्याची घोषणा झाली असून नयनज्योती सेकिया (Nayanjyoti Saikia) या पर्वाचा विजेता ठरला आहे. नयनज्योतीला 25 लाख रुपयांचा चेक, ट्रॉफी आणि गोल्डन शेफचा कोट देण्यात आला आहे. 





पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Shafeeq Natya : युट्यूबवर 'छोटू दादा' पहिल्या क्रमांकावर


Chotu Dada Golgappa Video Gets Billions Of Views : सिनेतारकांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि सलमान खान (Salman Khan) या बॉलिवूडच्या बड्या सेलिब्रिटींचे व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेडिंगमध्ये असतात. त्यांच्या व्हिडीओला लाखो व्ह्युज मिळतात. पण सध्या युट्यूबवर (Youtube) सलमान (Salman Khan), शाहरुख (Shah Rukh Khan) नव्हे तर शफीफ नाटिया (Shafeeq Natya) ट्रेडिंगमध्ये आहे. शफीफ अर्थात 'छोटू दादा'च्या व्हिडीओला युट्यूबवर लाखो-कोटी नव्हे तर अब्जावधीत व्ह्युज मिळाले आहेत.


जावेद अख्तरांकडून आरएसएसशी तालिबानसोबत तुलना; 20 एप्रिल रोजी कोर्टात हजर राहावे लागणार, अन्यथा...


Javed Akhtar : लोकप्रिय लेखक, गीतकार आणि कवी जावेद अख्तर (Javed Akhtar) सध्या चर्चेत आहेत. गेल्या काही महिन्यांपूर्वी जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (आरएसएस) तुलना तालिबानशी केली होती. त्यानंतर याप्रकरणी मुलुंड न्यायालयात त्यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल करण्यात आला. आज यावर सुनावणी होणार होती. पण जावेद अख्तर आज न्यायालयात येऊ न शकल्याने सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. 


Post Office Ughad Aahe : 'पोस्ट ऑफिस उघडं आहे' मालिका तीन महिन्यांतच घेणार प्रेक्षकांचा निरोप


Post Office Ughad Aahe Marathi Serial : 'पोस्ट ऑफिस उघडं आहे' (Post Office Ughad Aahe) या वेगळ्या धाटणीच्या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची पसंती मिळवली. नव्वदच्या दशकातला पोस्ट ऑफीसचा काळ या मालिकेत दाखवल्याने प्रेक्षकांनीदेखील या मालिकेला पसंती दर्शवली. पण आता ही लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. 'पोस्ट ऑफिस उघडं आहे' ही मालिका गेल्या तीन महिन्यांपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पण आता तीन महिन्यांतच ही मालिका बंद करण्याचा निर्णय चॅनलने घेतला आहे. या मालिकेचा शेवटचा भाग येत्या 2 एप्रिलला प्रसारित होणार आहे. ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याने चाहते नाराज झाले आहेत. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.