Entertainment News Live Updates : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत.. मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
Raj kundra: अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती राज कुंद्रा (Raj Kundra) हा पोर्नोग्राफी प्रकरणामुळे चर्चेत होता. राज हा आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करुन राज कुंद्रानं त्याच्या UT 69 या चित्रपटाची घोषणा केली आहे. राजनं हा व्हिडीओ शेअर करुन UT 69 या चित्रपटाच्या रिलीज डेटची देखील माहिती दिली आहे.
Ganapath trailer Out: अभिनेता टायगर श्रॉफच्या (Tiger Shroff) 'गणपत: अ हिरो इज बॉर्न' (Ganapath) या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटात टायगरसोबत कृती सेनन (Kriti Sanon) आणि अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. गणपत चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये टायगर श्रॉफ आणि कृती सेनन अॅक्शन मोडमध्ये दिसत आहेत. तर बिग बी यांच्या ट्रेलरमधील लूक्स आणि डायलॉग्सनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
Salman Khan: बॉलिवूडचा भाईजान अशी ओळख असणारा अभिनेता सलमान खानने (Salman Khan) काल (8 ऑक्टोबर) एक फोटो शेअर केला होता. या फोटोमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली होती. कारण सलमानने शेअर केलेल्या फोटोमध्ये त्याच्यासोबत एक मिस्ट्री गर्ल दिसली. सलमाननं शेअर केलेल्या फोटोमधील मिस्ट्री गर्ल कोण आहे? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला होता. सलमान लग्न करणार आहे का? अशी चर्चा देखील सोशल मीडियावर होऊ लागली. आता सलमाननं नुकतेच काही फोटो सोशल मीडियावर शेअर करुन मिस्ट्री गर्लचा चेहरा रिव्हिल केला आहे.
Ameya Khopkar : 'आत्मपॅम्फ्लेट' (Aatmapamphlet) हा सिनेमा आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मनसे नेते अमेय खोपकर (Ameya Khopkar) यांनीही हा सिनेमा पाहिला आहे. एकीकडे या सिनेमाचं कौतुक होत असताना दुसरीकडे मात्र बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात हा सिनेमा कमी पडला आहे. चांगल्या सिनेमाला प्रेक्षक जात नसल्याने मराठीतले दर्दी रसिक गेले कुठे? असा सवाल अमेय खोपकर यांनी उपस्थित केला आहे.
Urfi Javed New Look : आपल्या हटके फॅशन आणि भन्नाट ड्रेसिंगमध्ये अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) कायमच चर्चेत असते. आता तिने रस्त्यात पडलेल्या सिगारेटच्या थोटक्यांचा वापर करून हटके ड्रेस बनवला आहे. उर्फी जावेदचा हा लूक (Urfi Javed New Look) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Nushrratt Bharuccha : इस्त्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये (Israel-Palestine Escalation) युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचा (Nushrratt Bharuccha) इस्त्रायलमध्ये अडकली होती. त्यामुळे तिचे चाहते चिंता व्यक्त करत होते. पण आता अभिनेत्री सुखरूप भारतात परतली आहे. मुंबई विमानतळावर ती स्पॉट झाली आहे.
Mi Honar Superstar Chhote Ustad 2 Winner Sankalp Kale : 'मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद 2' (Mi Honar Superstar Chhote ustad) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. नुकताच या लोकप्रिय कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा पार पडला आहे. जालन्याचा संकल्प काळे (Sankalp Kale) 'मी होणार सुपरस्टार छोटे उत्साद 2' या कार्यक्रमाचा विजेता ठरला आहे.
Shah Rukh Khan : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) सध्या चर्चेत आहे. शाहरुखला 'पठाण' (Pathaan) सिनेमादरम्यान मिळालेल्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने त्याच्या सुरक्षेत वाढ केली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहरुख खानला सरकारने Y+ स्कॉट सुरक्षा (Y+ Category Security) पुरवली आहे.
पार्श्वभूमी
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
Maharashtrachi Hasyajatra : आता वीकेंड होणार हसरा... शनिवार आणि रविवार घराघरांत भरणार 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'!
Maharashtrachi Hasyajatra : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) हा लोकप्रिय कार्यक्रम आहे. गेल्या काही दिवसांपासून हा विनोदी कार्यक्रम प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. या कार्यक्रमाचं नवं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. आता वीकेंड हसरा होणार आहे. शनिवार आणि रविवार घराघरांत 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' भरणार आहे. संपूर्ण महाराष्ट्राला लोटपोट हसवणारी हास्यमालिका म्हणजेच 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'. घराघरांत हास्याची कारंजी फुलवणारी ही जत्रा सहकुटुंब हसू या म्हणत, प्रत्येक कुटुंबाला बांधून ठेवण्याचं काम अविरत करीत आलेली आहे. सर्वाधिक लोकप्रिय हास्यमालिकेचा मान पटकावणारी सोनी मराठी वाहिनीवरील 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' आणि या जत्रेतून भेटणारी कोहली फॅमिली.. लॉली.. सावत्या.. गौऱ्या आणि असे बरेच प्रतिभावंत कल्लाकार आज आपल्याही घरातील एक सदस्यच झाले आहेत. या साऱ्या अजबगजब पात्रांची आपल्याला इतकी सवय झालेली आहे ना की, एक जरी भाग चुकला तरी काहीतरी चुकल्यासारखं वाटतं.
Shah Rukh Khan : शाहरुखच्या 'जवान'ने रचला इतिहास; जगभरात 1103.6 कोटींची कमाई करणारा ठरला पहिला हिंदी सिनेमा
Shah Rukh Khan Jawan Box Office Collection Record : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) 'जवान' (Jawan) या सिनेमा प्रदर्शित होऊन एक महिना पूर्ण झाला आहे. रिलीजच्या एक महिन्यानंतरही जगभरातील सिनेरसिकांमध्ये आणि शाहरुखच्या चाहत्यांमध्ये या सिनेमाची क्रेझ कायम आहे. आता पुन्हा एकदा जगभरात 1103.6 कोटींची कमाई करत या सिनेमाने इतिहास रचला आहे.
Hardeek Joshi : राणादा म्हणतोय,"खेळातला माणूस बदलला की खेळाची पद्धतही बदलते"; नेमकं प्रकरण काय?
Hardeek Joshi Movie Club 52 : अभिनेता हार्दिक जोशीला (Hardeek Joshi) यंदा त्याच्या वाढदिवसाची अनोखी भेट मिळाली आहे. हार्दिकची प्रमुख भूमिका असलेल्या 'क्लब 52' (Club 52) या सिनेमाचं टायटल पोस्टर काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर लाँच करण्यात आले होते . आता 'क्लब 52' या सिनेमातील हार्दिकचा लूक हा सोशल मीडियावर लॉन्च करण्यात आला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -