Big Boss 18: या 5 स्पर्धकांपैकी कोण सोडून जाणार बिग बॉसचं घर? पहिल्या नॉमिनेशनची एकच चर्चा
Big Boss 18: बिग बॉस 18 च्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एका एपिसोडमध्ये पाच स्पर्धक नॉमिनेट झाले.
Bigg Boss 18: बिग बॉसच्या आठव्या परवाचा हा पहिलाच आठवडा मोठ्या चर्चेचा विषय झाला असून पहिल्या टास्कनंतर आता घरात हायव्होल्टेज ड्रामा होणार आहे. पहिल्या दोन दिवसातच स्पर्धक एकमेकांसमोर येताना दिसत होते. आता बिग बॉसच्या घरात पहिले नॉमिनेशन होणार आहे. बिग बॉसच्या घरातून कोण बाहेर जाणार याची चर्चा प्रेक्षकांमध्ये सुरू झाली आहे. बिग बॉसच्या लेटेस्ट एपिसोडमध्ये झालेल्या नॉमिनेशन टास्क नंतर पाच स्पर्धक नॉमिनेट झाले होते. आता या पाच स्पर्धकांसमोर नॉमिनेशनची टांगती तलवार कायम आहे.
बिग बॉस 18 च्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एका एपिसोडमध्ये पाच स्पर्धक नॉमिनेट झाले. यात चाहत पांडे, मुस्कान बामने, गुणरत्न सदावर्ते, कर्मवीर मेहरा आणि अविनाश मिश्रा हे स्पर्धक होते. या आठवड्यात होणाऱ्या नॉमिनेशनच समोर येताच नेटकरांनी अंदाज लावायला सुरुवात केली आहे .
नॉमिनेशन टास्कमध्ये काय झालं ?
बिग बॉसच्या घरात नुकताच नॉमिनेशन टास्कचा प्रमुख कलर्स टीव्हीवर शेअर करण्यात आला . या टास्कमध्ये करण मेहराने गुण रत्न सदावर्ते यांना नॉमिनेट केलं . या नॉमिनेशन टास्कमध्ये पाच स्पर्धक नॉमिनेट झाल्याचे पाहायला मिळाले . यावेळी नॉमिनेट झाल्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांनी घरात पहिलाच टास्कमध्ये राडा घातला असल्याचा पाहायला मिळतंय . आतापर्यंतचा भाग मनोरंजक ठरला. गुणरत्न सदावर्ते आणि हेमा शर्मा यांना बिग बॉसने राष्ट्रीय टेलिव्हिजनवर फोन नंबर शेअर केल्याबद्दल फटकारले होते. दुसरीकडे, सारा अरफीन खानने शेहजादा धामीशी वाद घातला की जे लोक घरात वर्कआउट करतात ते जास्त जेवण खातात. त्यामुळे घरातील बाकीच्यांना पोटभर खायला मिळत नाही. यानंतर बिगबॉसने नॉमिनेशन टास्क दिला होता.
View this post on Instagram
नेटकऱ्यांच्या पसंतीस कोण उतरलंय ?
बिग बॉसच्या पहिल्या आठवड्यात विवियन डिसेना आणि करणवीर मेहता टारगेट झाल्याचा पाहिला मिळालं . गुणरत्न सदावर्तेंच्या वादग्रस्त वक्तव्यांनी प्रेक्षकांना धक्का बसल्याचा दिसलं .टेली चटकारने शेअर केलेल्या एका पोस्टमध्ये कोणता स्पर्धक बिग बॉस च घर सोडणार असा प्रश्न विचारण्यात आला . त्यावर एकाने बडी मुंच वाला काला अंकल (गुणरत्न सदावर्ते ) असं लिहिलंय तर एकीने मुस्कान बामणे हीच ही नाव लिहिलंय . एकाचही एलिमिनेशन होणार नाही असंही काहींनी लिहिलंय . पहिल्याच आठवड्यात एलिमिनेशन करत नाहीत .अशा प्रकारच्या कमेंट्स नेटकऱ्यांकडून आल्या आहेत .
या आठवड्यात बिग बॉसच्या घरात हे अभिनेते येणार
बिग बॉस च्या घरात या आठवड्यात राजकुमार राव आणि तृप्ती डीमरी येणार आहेत . राजकुमार राव आणि तृप्ती दिमरी त्यांच्या आगामी चित्रपट, विकी विद्या का वो वाला व्हिडिओच्या प्रमोशनसाठी येणार आहेत.