मुंबई : बाबा.. इंडस्ट्रीतला बाबा म्हणजे संजू बाबा. संजू बाबा आणि त्याचा मित्र परेश घेलानी ही दुकडी कमाल फेमस झाली. परेशबद्दल फार कमी लोकांना माहीत होतं. पण राजुकमार हिरानी दिग्दर्शित संजू या चित्रपटामुळे परेश घेलानी हा संजूबाबाच्या किती जवळचा आहे हे लोकांना कळलं. सिनेमात त्या व्यक्तिरेखेचं नावही कमलेश आहे. त्या सिनेमात संजू त्याला कमली म्हणत असतो. तो कमलीही परेशवरूनच घेण्यात आलाय असं म्हटलं जातं. त्याच परेशने संजूबाबासाठी एक अत्यंत भावनिक पोस्ट लिहिली आहे.

Continues below advertisement


संजय दत्तला फप्फुसाचा कर्करोग झाल्याच्या बातम्या येतायत. हा कॅन्सर तिसऱ्या स्टेजचा असल्याचंही बोललं जातंय. ही बातमी कळल्यानंतर अलिया-रणबीर यांनी संजूची भेट घेतली. त्यापूर्वी मान्यता दत्तनेही एक स्टेटमेंट काढून संजूच्या सर्व चाहत्याचे आभार मानले होते. त्यात आता परेशच्या भावनिक पोस्टची भर पडली आहे. परेशने या पोस्टमध्ये संजूला ब्रदर असं उद्देशून एक निरोप दिला आहे. तो म्हणतो, खरंतर या अम्युझमेंट पार्कमधल्या सगळ्या राईडस आपण करून झाल्या आहेत असं वाटत होतं. सगळ्या राईडची सफर आपण केली आहे असं वाटत असतानाच आता आणखी एक राईड राहिल्याचं कळलं. पण हीसुद्धा आपण करुन येऊ. आता आणखी एका युद्धाला सुरूवात झाली आहे. आम्हाला माहिती आहे, ये युद्ध आपण लढायचं आणि ते तू जिंकणार आहेस. शेर है तू शेर.





त्याच्या या पोस्टमुळे संजय दत्तला झालेल्या आजाराला एक प्रकारे पुष्टीच मिळाली आहे. संजय दत्तला 8 ऑगस्टला श्वास घ्यायला त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्याला लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे त्याची कोव्हिड टेस्ट करण्यात आली. ती निगेटिव्ह आल्यानंतर त्याला घरी सोडण्यात आलं. पण त्याचवेळी त्याला लंग कॅन्सर झाल्याचं निदान झालं. हा कर्करोग तिसऱ्या स्टेजला असल्याचं बोललं जातं. संजू या चित्रपटात परेशच्या व्यक्तिमत्वाची साधर्म्य सांगणारी व्यक्तिरेखा होती ती कमलेशची. सिनेमात ती भूमिका विकी कौशलने साकारली होती. ती भूमिका बरीच गाजलीही होती.


संबंधित बातम्या :