Duniyadari Movie :  मराठी सिनेसृष्टीच्या गोल्डन पिरेडची सुरुवात 'दुनियादारी'(Duniyadari Movie) या सिनेमामुळे झाली. 11 वर्षांपूर्वी सिनेमागृहात आलेला मल्टिस्टारर मराठी सिनेमा प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून धरला. स्वप्निल जोशी, अंकुश चौधरी, सई ताम्हणकर, जितेंद्र जोशी, उर्मिला कोठारे, सुशांत शेलार अशी तगडी टीम घेऊन संजय जाधव यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. आजही हा सिनेमा प्रेक्षकांच्या तितकाच पसंतीस उतरतो. त्यामुळे रसिक प्रेक्षकांसाठी हा सिनेमा पुन्हा एकदा सिनेमागृहात रिलीज होण्यासाठी सज्ज झालाय. 


मराठी प्रेक्षकांसाठी ही एक आनंदाची बातमी असून महाराष्ट्रातील काही सिनेमागृहांमध्ये दुनियादारी हा सिनेमा पुन्हा रिलीज करण्यात आहे. अंकुश चौधरीने ही पोस्ट त्याच्या सोशल मीडियावर शेअर करत गोड बातमी दिलीये. मुंबई, पुणे, भिवंडी, कांदिवली, घाटकोपर, आकुर्डी अशा काही ठराविक ठिकाणांवरील थिएटर्समध्ये हा सिनेमा रिलीज करण्यात आला आहे. त्यामुळे मैत्रीची ही दुनियादारी मराठी रसिक प्रेक्षकांना पुन्हा एकदा सिनेमागृहात अनुभवता येणार आहे. 






सिनेमातील गाजलेली गाणी


'दुनियादारी' सिनेमातील रेट्रो स्टाईल प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली. संजय जाधव दिग्दर्शित 'दुनियादारी' हा सिनेमा सुहास शिरवळकर यांच्या 'दुनियादारी' या काजंबरीवर आधारित आहे. 'दुनियादारी' या सिनेमातील ' जिंदगी', 'टिक टिक वाजते', 'यारा यारा', 'देवा तुझ्या गाभाऱ्यला' या गाण्यांना विशेष पसंती मिळाली आहे. 'टिक टिक वाजते' हे गाणं आजही अनेकांचं कॉलर ट्यून आहे.


'दुनियादारी' सिनेमातील गाजलेले डायलॉग (Duniyadari Famous Dialogue)


'दुनियादारी' या सिनेमातील संवाद फक्त गाजलेच नाही तर हे संवाद आजही प्रेक्षकांचे तोंडपाठ आहेत. 'मेहुणे मेहुणे मेव्हान्यांचे पाव्हणे', 'तुझी माझी यारी मग खड्ड्यात गेली दुनियादारी', 'सरस्वती माते मला नाही पावलीस या पोरांना तरी पाव गं बाई', 'हातात क्याटबरी असताना समोर आलेलं बिस्कीटसुद्धा तुला सोडवत नाही...बच्चूच आहेस तू', असे सिनेमातील अनेक डायलॉग चांगलेच गाजले आहेत. 


तिकीटबारीवर विक्रमी कलेक्शन करणाऱ्या 'दुनियादारी' या आयकॉनिक सिनेमाने 10 वर्ष पूर्ण केली आहेत. पण आजही हा सिनेमा आवडीने पाहिला जातो. या सिनेमाने मराठी सिनेमांची परिभाषा बदलली असे म्हटले जाते.  लवकरच या ब्लॉकबस्टरर सिनेमाचा दुसरा भाग अर्थात 'पुन्हा दुनियादारी' (Punha Duniyadari) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


ही बातमी वाचा :


Abhijeet Khandkekar : 'बिलावर सही हवी होती पण तिने ऑटोग्राफ दिला', अभिजीत खांडकेकरने सांगितला स्पृहा जोशीचा धम्माल किस्सा