Abhijeet Khandkekar :  मराठी कलाकार हे त्यांच्या सह कलाकारांचे चांगले मित्रही असतात. अनेकदा त्यांच्या सोशल मीडियावरच्या पोस्ट, एकमेकांविषयीचं प्रेम ते बोलूनही दाखवतात. इतकच नव्हे तर त्यांचे एकमेकांविषयीचे मजेशीर किस्से देखील ते अनेकदा शेअर करत असतात. असाच एक किस्सा अभिनेता अभिजीत खांडकेकरने (Abhijeet Khandkekar) शेअर केला आहे. त्याची मैत्रीण आणि सह कलाकार स्पृहा जोशीचा (Spruha Joshi) हा किस्सा आहे. बाबा या सिनेमादरम्यान स्पृहा हा किस्सा अभिजीतनेच सगळीकडे व्हायरल केल्याचं त्याने सांगितलं आहे. 


अभिजीतने काय म्हटलं?


अभिजीतने स्पृहाचा हा किस्सा सांगताना म्हटलं की, आम्ही बाबा नावाचा सिनेमा करत होतो. कोकणात दिवेआगार की गुहागरला त्याचं शुटींग सुरु होतं. कोकणातील हॉटेल्स तशी लहान असतात, कमी रुम्सची. तिथे आमच्या सिनेमाची सगळीच टीम राहत होती. त्या दिवशी स्पृहाचा आणि माझा एकच सीन होता, सकाळी सीन केला आणि दुपारी आम्ही हॉटेलवर आलो. त्यानंतर जेवलो उकाडा होता तेव्हा स्पृहा म्हणाली अभ्या तू काही थंड पिणार का, मी तिला नाही म्हटलं. ती मला म्हणाली मी आता मस्त रुममध्ये जाते आणि सोलकढी मागवते. त्यानंतर ती सोलकढी कुणीतरी घेऊन येईल म्हणून तिने तिच्या रुमचा दरवाजा उघडाच ठेवला. एक मुलगा ती सोलकढी घेऊन आला ती तिचं आवरत होती, तिने त्याला ती ठेवायला सांगितली. त्याने ते ठेवलं आणि तो तिथेच घुटमळला थोडा वेळ. त्यावर स्पृहाने त्याला म्हटलं की काय रे काय हवं तुला. त्याने म्हटलं की, मॅडम सही हवी होती तुमची. स्पृहा म्हणाली एवढचं ना, ये इकडे. तिने त्याच्या हातातून कागद घेतला आणि त्यावर लिहिलं काय नाव तुझं सोहम, प्रिय सोहम प्रेमपूर्वक स्पृहा जोशी आणि त्यावर सही केली. पुढे त्याला म्हटली की, एवढच ना, त्यात काय आधी सांगायचं ना.


पण त्याला बिलावर सही हवी होती - अभिजीत खांडकेकर


पुढे अभिजीतने म्हटलं की,  'त्या मुलाने ते घेतलं आणि ते बील उलटं केलं तिला सांगितलं नाही ते दोन सोलकढीचं बिल आहे ना त्यावर हवी होती सही. त्यावर स्पृहाचा चेहरा पडला आणि तिने त्यावर सही केली. बरं हे प्रकरण तिथे नाही थांबलं, मला कळाल्यावर मी ते रिसेप्शनला जाऊन त्या मॅनेजरला धमकी देऊन ते बिल घेऊन त्याचा फोटो काढून आमच्या ग्रुपवर व्हायरल केला. त्यानंतर आम्ही तिला खूप चिडवलं.' 


ही बातमी वाचा : 


Pushkar Jog :  'जे मराठी, मराठी करतात, तेच लॉबिंग करतात', मराठी इंडस्ट्रीविषयी पुष्कर जोगने मांडलं स्पष्ट मत