नवी दिल्ली : देशातील सहाव्या टप्प्यात आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. राजधानी दिल्ली, हरयाणासह 8 राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशात आज मतदान (Voting) होत असून 58 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. मात्र, यादरम्यान, एक दु:खद बातमी समोर आली आहे.गुरुग्राममधील अपक्ष आमदार (MLA) राकेश दौलताबाद यांचं निधन झालं आहे. बादशाहपूर विधानसभा मतदारसंघातून ते अपक्ष म्हणून निवडून आले होते. आज सकाळी त्यांना ह्रदयविकाराच तीव्र झटका आला, त्यामध्ये त्यांचे निधन झाल्याची दुर्दैवी घटना घडली. आमदार राकेश हे 45 वर्षांचे होते.
राकेश यांना सकाळी 10.30 वाजताच्या सुमारास ह्रदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना दिल्लीतील खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पालम विहार येथील मणिपाल रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात येत होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.
राकेश यांनी 2019 मध्ये बादशाहपूर येथून अपक्ष निवडणूक लढवली होती, त्यात ते विजयी झाले होते. आमदार बनल्यानंतर त्यांनी भाजपला आपला पाठिंबा जाहीर केला होता. भाजप उमेदवार मनिष यादव यांचा पराभव करुन ते आमदार बनले होते. समाजसेवी आणि लोकांसाठी झटणारा आमदार म्हणून त्यांची ओळख होती. दरम्यान, हरयातील 10 लोकसभा मतदारसंघात आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. त्यामध्ये, गुरुग्राम येथेही मतदान होत आहे.
हेही वाचा
Video: धोनीचं रांचीत तर गंभीरने दिल्लीत केलं मतदान; माहीला पाहून बुथवर चाहत्यांची झुंबड