Drishyam 3 Poster: 'दृश्यम 3' चित्रपट कधी रिलीज होणार? अक्षय खन्नाच्या जागी कोणता कलाकार झळकणार? पोस्टरने गूढ वाढवलं
Drishyam 3: 'दृश्यम 3' हा सिनेमा 2 ऑक्टोबर रोजी सिनेमागृहात रिलीज होणार आहे.

Drishyam 3 Jaideep Ahlawat: बॉलिवूडमध्ये 'दृश्यम' (Drishyam 3) या सिनेमाची प्रचंड चर्चा झाली. डोकं चक्रावून टाकणाऱ्या या सिनेमात अभिनेता अजय देवगन याची मुख्य भूमिका आहे. 'दृश्यम' आणि 'दृश्यम 2' या दोन्ही सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली. दरम्यान, प्रेक्षक या सिनेमाच्या तिसऱ्या भागासाठी आतुर होते. दरम्यान, 'दृश्यम' या सिनेमाचा तिसरा भाग कधी प्रेक्षकांच्या भेटीस येणार? हा प्रश्न प्रेक्षकवर्गाकडून उपस्थित होत आहे. 'दृश्यम 2'मध्ये अभिनेता अक्षय खन्ना (Akshaye Khanna) याचीही भूमिका गाजली. पण 'दृश्यम' या सिनेमाच्या तिसऱ्या भागात अक्षय खन्ना नसणार, अशी माहिती आहे. आता अक्षय खन्ना (Entertainment) याच्या जागी कोणता अभिनेता झळकणार? हा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता. पण याचं उत्तर मिळालं. त्याच्याजागी एका प्रसिद्ध अभिनेत्याची एन्ट्री झाली आहे.
'दृश्यम 3' अक्षय खन्नाच्या जागी कोणता कलाकार झळकणार (Jaideep Ahlawat joins Ajay Devgn in Drishyam 3)
'दृश्यम 3' या सिनेमाच्या टीमने नुकतंच एक पोस्टर रिलीज केलं आहे. आधी स्टार स्टूडिओ 18 या इन्स्टाग्राम अकाऊंटवर 'दृश्यम 3' या चित्रपटाच्या संबंधित काही पोस्टर शेअर करण्यात आले होते. प्रमुख कलाकारांच्या पोस्टर समोर आले होते. तब्बू, अजय देवगणनंतर आता नुकतंच या सिनेमात एन्ट्री झालेल्या जयदीप अहलावतचं पोस्टर रिलीज झालं आहे. या पोस्टरने सध्या सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. या पोस्टरवर, 'इस बार तेरे राहू - केतू, मंगल आणि शनी सब भारी हैं', असं लिहिलेलं आहे. तसेच पोस्टरवर जयदीप अहलावतचं नावही लिहिलेलं आहे.
View this post on Instagram
अभिनेता जयदीप अहलावतचं पोस्टरला कॅप्शनही देण्यात आलं आहे. 'यह खेल अब मैं खतम करुंगा', असं कॅप्शनमध्ये लिहिलेलं आहे. या पोस्टरमधून या सिनेमाची रिलीज डेटही जाहीर करण्यात आली आहे. 'दृश्यम 3' हा सिनेमा 2 ऑक्टोबर रोजी रिलीज होणार आहे. दरम्यान, जयदीप अहलावतची जादू या सिनेमातून पाहायला मिळणार का? इतकी वर्षे विजय साळगावकरने लपवलेलं रहस्याचा उलगडा तिसऱ्या पार्टमध्ये उलगडणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. काही महिन्यांपूर्वी मल्याळम भाषेत 'दृश्यम 3' रिलीज झाला होता. आता हिंदी व्हर्जनमधील 'दृश्यम 3' रिलीज होणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
शाहरुख खानचा 'मन्नत' बंगला आतून कसा दिसतो? बेडरुमचा व्हिडीओ व्हायरल, घरासमोर समोर समुद्र अन्...























