Drishyam 3 Box Office Collection: 'दृश्यम 3' पाहून प्रेक्षकांचे डोकं चक्रावलं; रविवारी बॉक्स ऑफिसवर नोटांचा पाऊस, शाहरुख खानच्या 'या' सिनेमाचा मोडला रेकॉर्ड
Drishyam 3 Box Office: अजय देवगणच्या 'दृश्यम 3' ने रविवारी किती कोटी कमावले?

Drishyam 3 Box Office Collection: अजय देवगण (Ajay Devgan) अभिनीत 'दृश्यम 3' (Drishyam 3) या चित्रपटाची उत्सुकचा प्रेक्षकांना होती. हा सिनेमा आता बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. क्राइम थ्रिलर 'दृश्यम 3' हा चित्रपट सस्पेन्सने परिपूर्ण आहे. या सिनेमाची सध्या विशेष चर्चा होत आहे. प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. पॉझिटिव्ह वर्ड ऑफ माऊथचा फायदा या चित्रपटाला होत आहे. पहिल्या दिवसापासून या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली (Box Office Collection) कामगिरी केली आहे. प्रदर्शनाच्या दोन दिवसांतच या सिनेमाने 100 कोटी रुपयांचा टप्पा पार केला. 'दृश्यम 3' या सिनेमाने प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी किती कोटी रुपयांचे कलेक्शन केले? जाणून घेऊयात.
'दृश्यम 3' या क्राइम थ्रिलर चित्रपटाने रविवारी किती कोटी रुपयांचे कलेक्शन केले? (Drishyam 3 Box Office Collection Day 3 Sunday)
'दृश्यम 3' या सिनेमाचा बॉक्स ऑफिसवर डंका वाजत आहे. प्रेक्षकांना हा सिनेमा प्रचंड आवडला आहे. सॅम या पात्राच्या मृत्यूचं उलगडलं असेल का? या प्रश्नाच्या शोधात प्रेक्षकांनी सिनेमागृह गाठलं आहे. 'दृश्यम 3' या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून या सिनेमाच्या प्रदर्शनाच्या प्रतिक्षेत प्रेक्षक होते. माहितीनुसार, ब्लॉकबस्टर फ्रँचायझी 'दृश्यम' या सिनेमाचा फायनल चॅप्टर असल्यामुळे या सिनेमाबाबतीत प्रेक्षकांमध्ये एक्साइटमेंट होती. 'दृश्यम 3' या सिनेमाने दमदार ओपनिंग केली. विकेंडमध्येही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली.
'दृश्यम 3' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर नोटांचे बंडल छापले
'दृश्यम 3' या सिनेमाने प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी 61 कोटी रुपयांची कमाई केली. तसेच हा सिनेमा बॉलिवूडमधील रविवारी सर्वाधिक कमाई करणारी चौथी फिल्म ठरली आहे. विशेष म्हणजे, कमाईच्या बाबतीत 'दृश्यम 3' या चित्रपटाने शाहरुख खानच्या 'पठाण'लाही मात दिली. तसेच टॉप 5च्या लिस्टमधून 'स्त्री 2' या सिनेमाला (58.2 कोटी कलेक्शन) बाहेर काढले.
रविवारी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट
धुरंधर 2 – 121 कोटी
जवान – 80.1 कोटी
एनिमल – 70.69 कोटी
दृश्यम 3- 61 कोटी
पठान – 60.75 कोटी
स्त्री 2 – 58.2 कोटी
'दृश्यम 3' या सिनेमाची स्टारकास्ट
Abhishek Pathak दिग्दर्शित या क्राइम थ्रिलर चित्रपटात अजय देवगणने विजय सालगांवकर ही भूमिका साकारली आहे. तर, श्रिया सरन, तबू, रजत कपूर आणि ईशिता दत्ता यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. या व्यतिरिक्त या सस्पेन्सफूल चित्रपटात जयदीप अहलावत आणि प्रकाश राज यांच्याही भूमिका आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या:























