एक्स्प्लोर

'माझ्या संगीतातील प्रत्येक ठसा माझ्या वडिलांचा'; डॉ. एल. सुब्रमण्यम यांच्याकडून जुन्या आठवणींना उजाळा

Dr. L. Subramaniam’s Journey with the Violin: डॉ. एल. सुब्रमण्यम यांनी भारतीय व्हायोलिनला जागतिक स्तरावर नेले. त्यांना 2025 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले.

Dr. L. Subramaniam’s Journey with the Violin: प्रख्यात व्हायोलिन वादक आणि संगीतकार डॉ. एल. सुब्रमण्यम यांचे भारतीय संगीत क्षेत्रात खूप मोठे योगदान आहे.  त्यांना 2025मध्ये  प्रतिष्ठित पद्मविभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले होते. भारतीय शास्त्रीय संगीतामधील एखाद्या वाद्याची जागतिक प्रतिमा ज्या थोडक्या कलाकारांनी बदलली,  त्यामध्ये डॉ. एल. सुब्रमण्यम यांचे नाव पहिल्या फळीत येते. व्हायोलिनवादक, संगीतकार आणि अभ्यासू विद्वान म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांचे संगीत क्षेत्रात खूप मोठे योगदान आहे. त्यांनी गेली अनेक दशके भारतीय व्हायोलिनला पारंपरिक चौकटींच्या पलीकडे नेले.  सिम्फनी हॉल्स, जॅझ महोत्सव आणि पाच खंडांतील आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक व्यासपीठांवर त्यांनी भारतीय संगीताचा ठसा उमटवला.

डॉ. एल. सुब्रमण्यम यांनी खडतर प्रवासातून भारतीय संगीत क्षेत्रात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. दरम्यान, अनेक मुलाखतीतून त्यांनी आपल्या विलक्षण प्रवासाविषयी माहिती दिली.  या  कारकि‍र्दीत घडणाऱ्या चढ उतारात त्यांना त्यांच्या वडिलांची भक्कम साथ लाभली. आपल्या प्रवासाविषयी बोलताना डॉ. सुब्रमण्यम नेहमीच एका व्यक्तीचा कायम उल्लेख करतात, ती व्यक्ती म्हणजे त्यांचे वडील आणि गुरु लक्ष्मीनारायण सुब्रमण्यम. "चेहरा माझा असू शकतो,  पण मी आज जे काही आहे, तंत्र, दृष्टी आणि आत्मविश्वास.. ते सगळं त्यांचंच म्हणजेच माझ्या वडिलांचं आहे", असं त्यांनी म्हटलंय.

डॉ. एल सुब्रमण्यम यांनी एबीपीला दिलेल्या मुलाखतीत सुरूवातीच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांच्या आयुष्यातील पहिले संगीत सादरीकरण भारतात झाले नव्हते. तर, हा शो श्रीलंकेत पार पडला होता, असं त्यांनी सांगितलं. जाफना येथील प्रसिद्ध नल्लुर कंदस्वामी मंदिरात हा शो पार पडला होता.  वयाच्या 6 व्या वर्षी त्यांनी संगीत सादर केलं.  तेव्हा ते खूप घाबरलेले होते. त्यांचा संगीत शो नेमका कसा पार पडला, जाणून घेऊयात.

"आजोकांना माझं सादरीकरण नको होतं. हजारो लोक उपस्थित असलेला तो एक मोठा महोत्सव होता. त्यांना वाटलं होतं की सहा वर्षांचा मुलगा सगळा कार्यक्रम बिघडवून टाकेल. पण मी तेव्हा सादरीकरण केलं. मला आयोजकांची भीती वाटत होती आणि अपयशाचीही भीती वाटत होती. घरी परतल्यावर काय होईल याचीही भीती वाटत होती. मी नेमकं काय वाजवलं, हे मला आजही आठवत नाही", असं त्यांनी सांगितलं.

"हा क्षण माझ्या स्मरणात कोरला गेला.  सादरीकरण झाल्यानंतर प्रेक्षकांच्या टाळ्यांचा प्रचंड कडकडाट आवाज ऐकू आला. त्यानंतर मंदिरातील अधिकाऱ्यांनी, देवाने स्वतः त्या मुलाच्या माध्यमातून वादन केलंय, असं म्हणाले. अशा पद्धतीने माझ्या आयुष्यात एक चांगली सुरूवात झाली. यामुळे माझ्या जीवनाला नवा सूर मिळाला", जुन्या आठवणींना उजाळा देत डॉ. एल सुब्रमण्यम यांनी ही मुलाखतीतून माहिती दिली.

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Sunita Ahuja on Govinda: 'लेकीच्या वयाच्या मुलीसोबत फिरतोय, लाज वाटली पाहिजे'; गोविंदाचा 'त्या' तरुणीसोबत व्हिडीओ व्हायरल, पत्नीचा संताप, म्हणाली...
'लेकीच्या वयाच्या मुलीसोबत फिरतोय, लाज वाटली पाहिजे'; गोविंदाचा 'त्या' तरुणीसोबत व्हिडीओ व्हायरल, पत्नीचा संताप, म्हणाली...
Dengue vs Typhoid: तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?
तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?
Vaibhav Mangle Daughter: 'आता तू सज्ञान झाली आहेस'; वैभव मांगलेंची लेकीसाठी खास पोस्ट, 18 व्या वर्षात पदार्पण, अभिनेत्याच्या मुलीला पाहिलंत?
'आता तू सज्ञान झाली आहेस'; वैभव मांगलेंची लेकीसाठी खास पोस्ट, 18 व्या वर्षात पदार्पण, अभिनेत्याच्या मुलीला पाहिलंत?
Samay raina: समय रैनाला सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा; 'इंडियाज गॉट लेटेंट' मधील वादग्रस्त टिप्पणीप्रकरणी FIR रद्द
समय रैनाला सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा; 'इंडियाज गॉट लेटेंट' मधील वादग्रस्त टिप्पणीप्रकरणी FIR रद्द

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Embed widget