एक्स्प्लोर

Divya Agarwal-Varun Sood : वरुण सूद-दिव्या अग्रवालचा ब्रेकअप! सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अभिनेत्री म्हणते...

Divya Agarwal-Varun Sood Break Up : अभिनेत्री दिव्या अग्रवाल (Divya Agarwal) आणि वरुण सूद (Varun Sood) यांची जोडी देखील अनेकदा चाहत्यांना कपल गोल देताना दिसली होती.

Divya Agarwal-Varun Sood Break Up : मनोरंजन विश्वात अशी अनेक रिअल लाईफ जोडपी आहेत, जी प्रेक्षकांना खूप आवडतात. इंडस्ट्रीतील ही जोडपी सोशल मीडियावर अनेकदा एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसतात. या प्रसिद्ध जोडप्यांपैकी एक, अभिनेत्री दिव्या अग्रवाल (Divya Agarwal) आणि वरुण सूद (Varun Sood) यांची जोडी देखील अनेकदा चाहत्यांना कपल गोल देताना दिसली. मात्र, आता या जोडीने एकमेकांपासून फारकत घेतली आहे. दिव्या अग्रवाल आणि वरुण सूद यांचे ब्रेकअप झाले आहे. अभिनेत्रीने याबाबतची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी शेअर केली आहे.

या संदर्भात दिव्याने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर एक लांबलचक नोट शेअर केली आणि या संपूर्ण प्रकरणावर आपली भूमिका मांडली. तसेच, तिने तिच्या नोटमध्ये सांगितले की, ती आणि वरुण नेहमीच एकमेकांचे चांगले मित्र असतील.

सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट

याबाबतची पोस्ट शेअर करताना दिव्या अग्रवालने लिहिले की, ‘आयुष्य हे सर्कससारखे आहे. माझ्यासोबत जे काही होत आहे त्यासाठी मी कोणालाही दोष देणार नाही. मला वाटतं आता सगळं संपलंय आणि तेही ठीक आहे. मला श्वास घ्यायचा आहे आणि स्वतःसाठी जगायचे आहे.’

अभिनेत्रीने पुढे लिहिले की, ‘मी याद्वारे औपचारिकपणे घोषित करते की, मी आता सिंगल आहे आणि मला माझे आयुष्य माझ्या पद्धतीने जगण्यासाठी वेळ द्यायचा आहे. नात्यातून बाहेर पडणे ही माझी निवड आहे. त्याच्यासोबत घालवलेले आनंदाचे क्षण मला खूप आवडतात. तो एक चांगला माणूस आहे आणि नेहमीच माझा चांगला मित्र असेल. कृपया माझ्या निर्णयाचा आदर करा.’

वरुणचे मानले आभार!

इन्स्टाग्रामवर ही पोस्ट शेअर करण्यासोबतच अभिनेत्रीने तिच्या इन्स्टावर एक स्टोरीही शेअर केली आहे. या स्टोरीत तिने वरुण सूदचे आभार मानले आहेत. या इन्स्टा स्टोरीमध्ये दिव्याने लिहिले की, ‘प्रत्येक गोष्टीसाठी वरुणचे आभार. आम्ही नेहमीच चांगले मित्र राहू.’ सोशल मीडियावर शेअर केलेली दिव्या अग्रवालची ही पोस्ट व्हायरल झाली आहे.

त्याचवेळी, अभिनेत्रीची ही पोस्ट सोशल मीडियावर समोर येताच तिचे चाहते देखील खूपच निराश झाले आहेत. मात्र, दिव्याच्या या पोस्टवर वरुणची कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. विशेष म्हणजे वरुण आणि दिव्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. एका रिअॅलिटी शोदरम्यान वरुणने दिव्याला प्रपोज केले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघेही बराच काळ लिव्ह-इनमध्ये राहत होते.

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Kangana Ranaut On Naseeruddin Shah: ''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, म्हणाली, 'इथे खातात अन् शेजारील राष्ट्रासाठी लढतात...'
''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, प्रश्न उपस्थित करत म्हणाली...
Kumar Sanu On Dawood Ibrahim Dubai Party: 'मी गाणं गात होतो, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद समोर बसलेला...'; कुमार सानू यांनी सांगितला दुबईच्या पार्टीचा किस्सा, अबू सालेमबाबत म्हणाले...
'मी गाणं गात होतो, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद समोर बसलेला...'; कुमार सानू यांनी सांगितला दुबईच्या पार्टीचा किस्सा, अबू सालेमबाबत म्हणाले...
Mallika Sherawat Claims Tom Cruise Has Crush On Her: 'टॉम क्रूझचं माझ्यावर क्रश...', मल्लिका शेरावतचा ऑन कॅमेरा दावा, म्हणाली, 'फोन असता तर, त्याचे VIDEO दाखवले असते...'
'टॉम क्रूझचं माझ्यावर क्रश...', मल्लिका शेरावतचा ऑन कॅमेरा दावा, म्हणाली, 'फोन असता तर, त्याचे VIDEO दाखवले असते...'
'अभिषेक बच्चननं जे केलं, ते अमिताभ यांनाही जमलं नाही...'; KBC कंटेस्टंटचा मोठा दावा, 'बिग बी'सुद्धा अवाक्...
'अभिषेक बच्चननं जे केलं, ते अमिताभ यांनाही जमलं नाही...'; KBC कंटेस्टंटचा मोठा दावा, 'बिग बी'सुद्धा अवाक्...

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
HSRP Number Plate: वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
Kangana Ranaut On Naseeruddin Shah: ''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, म्हणाली, 'इथे खातात अन् शेजारील राष्ट्रासाठी लढतात...'
''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, प्रश्न उपस्थित करत म्हणाली...
Tukaram Mundhe: डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह प्रमुख आस्थापनांची FDA कडून तपासणी; 2 व्यावसाय तात्काळ बंद, 5 परवाने निलंबित, 95 जणांना सुधारणा नोटिसा
डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह प्रमुख आस्थापनांची FDA कडून तपासणी; 2 व्यावसाय तात्काळ बंद, 5 परवाने निलंबित, 95 जणांना सुधारणा नोटिसा
Kumar Sanu On Dawood Ibrahim Dubai Party: 'मी गाणं गात होतो, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद समोर बसलेला...'; कुमार सानू यांनी सांगितला दुबईच्या पार्टीचा किस्सा, अबू सालेमबाबत म्हणाले...
'मी गाणं गात होतो, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद समोर बसलेला...'; कुमार सानू यांनी सांगितला दुबईच्या पार्टीचा किस्सा, अबू सालेमबाबत म्हणाले...
Amravati News : अमरावतीच्या मेळघाटातील निवासी आश्रम शाळेमध्ये भुतांची अफवा; 600 विद्यार्थ्यांनींनी शाळा सोडून थेट घर गाठलं; डोमा गावात नेमकं काय घडलं?
अमरावतीच्या मेळघाटातील निवासी आश्रम शाळेमध्ये भुतांची अफवा; 600 विद्यार्थ्यांनींनी शाळा सोडून थेट घर गाठलं; डोमा गावात नेमकं काय घडलं?
Mallika Sherawat Claims Tom Cruise Has Crush On Her: 'टॉम क्रूझचं माझ्यावर क्रश...', मल्लिका शेरावतचा ऑन कॅमेरा दावा, म्हणाली, 'फोन असता तर, त्याचे VIDEO दाखवले असते...'
'टॉम क्रूझचं माझ्यावर क्रश...', मल्लिका शेरावतचा ऑन कॅमेरा दावा, म्हणाली, 'फोन असता तर, त्याचे VIDEO दाखवले असते...'
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढे साहेब, एकदा बुलढाण्यात या, इकडच्या साहेब लोकांनी...; 75 वर्षीय आजींची विनंती, नेमकं काय काय म्हणाल्या?, VIDEO
तुकाराम मुंढे साहेब, एकदा बुलढाण्यात या, इकडच्या साहेब लोकांनी...; 75 वर्षीय आजींची विनंती, नेमकं काय काय म्हणाल्या?, VIDEO
Nandurbar: आजारी महिलेला बांबूच्या झोळीत टाकलं, तब्बल आठ किलोमीटर पायपीट करत प्राथमिक आरोग्य केंद्र गाठलं; वेहगी नदीवर पूल नसल्याने वाहत्या पाण्यातून जीवघेणा प्रवास
आजारी महिलेला बांबूच्या झोळीत टाकलं, तब्बल आठ किलोमीटर पायपीट करत प्राथमिक आरोग्य केंद्र गाठलं; नंदुरबारच्या वेहगी नदीवर पूल नसल्याने वाहत्या पाण्यातून जीवघेणा प्रवास
Embed widget