एक्स्प्लोर

युट्युब वरील अबू सालेमचे व्हिडिओ पाहून महेश मांजरेकरांना खंडणीसाठी धमकी; आरोपीची कबुली

अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते महेश मांजरेकर यांना खंडणीसाठी धमकी देणाऱ्याला खंडणी विरोधी पथकाने रत्नागिरीतून अटक केली आहे. युट्युबवरील अबू सालेमचे व्हिडिओ पाहून गुन्हा करण्यासाठी प्रवृत्त झाल्याचं त्याने सांगितले.

मुंबई : हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीतील नामांकित निर्देशक, दिग्दर्शक आणि कलाकार महेश मांजरेकर यांना खंडणीसाठी अबु सालेमच्या नावाने धमकी देणाऱ्या व्यक्तीला खंडणी विरोधी पथकाने रत्नागिरी मधून अटक केली आहे. धमकी देणाऱ्याचं नाव मिलिंद तुळसकर असून तो रत्नागिरी जिल्ह्यातील रहाणारा आहे. 23 ऑगस्टला रात्रीच्या वेळेस महेश मांजरेकर यांच्या मोबाईल वर एक मॅसेज आला ज्याच्या मध्ये एका अज्ञात व्यक्तीकडून मेसेजद्वारे 35 कोटी रुपये खंडणी मागितली. स्वतःला अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमचा हस्तक सांगून हे पैसे पाठवण्याचे सांगण्यात आलं. 23 ते 25 ऑगस्ट दरम्यान या व्यक्तीकडून वारंवार महेश मांजरेकर यांना खंडणीसाठी मॅसेज येऊ लागले. तसेच फोनद्वारे ही त्याने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. 24 ऑगस्टला महेश मांजरेकर यांनी दादर पोलीस स्टेशन आणि खंडणी विरोधी पथकाकडे यासंदर्भात तक्रार केली. याची गांभीर्याने दखल घेत खंडणी विरोधी पथकाने तपास सुरू केला. रत्नागिरी मधून आरोपीला अटक 26 ऑगस्टला दादर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदविण्यात आला आणि तो गुन्हा खंडणी विरोधी पथकाकडे तपासासाठी वर्ग करण्यात आला. याच्या तपासासाठी खंडणी विरोधी पथकाकडून दोन पोलीस पथक तयार करण्यात आली आणि त्यांनी कल्याण आणि ठाणे या ठिकाणी शोध सुरू केला. आरोपी मिलिंद तुळसकर आपला मोबाईल वारंवार बंद करत होता. ज्यामुळे पोलिसांना त्याचा सुगावा लागत नव्हता. गुप्त बातमी दाराकडून माहिती घेऊन आणि तांत्रिक बाबींचा बारकाईने अभ्यास करून हे मेसेज रत्नागिरी वरून येत असल्याचं कळलं आणि पथक रत्नागिरीपर्यंत पोहोचलं. महेश मांजरेकर यांना 35 कोटींच्या खंडणीची धमकी, एकाला अटक रत्नागिरी मधून मिलिंद तुळसकर याला खंडणीविरोधी पथकाने ताब्यात चौकशीसाठी मुंबईत घेऊन आले आणि चौकशी दरम्यान मिलिंद तुळसकरने त्याचा गुन्हा मान्य केला. युट्युब वर अबू सालेमचे व्हिडिओ पाहून मिलिंद तुळसकरला हा प्लॅन सुचला. आणि myneta.com वरून त्याने महेश मांजरेकर यांचा नंबर शोधून त्यांना खंडणीसाठी मेसेज करण्यास सुरुवात केली. मिलिंद तुळसकरचा अबू सालेमशी काही संबंध नाही, असं तपासामध्ये स्पष्ट झालं आहे. लवकरात लवकर जास्त पैसे कमावण्यासाठी त्याने हा गुन्हा केला असल्याचं सांगितलं. मिलिंद तुळसकर याला 2 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांच्या नेतृत्वाखाली ही कामगिरी बजावण्यात आली. Mahesh Manjrekar | अभिनेते महेश मांजरेकरांना अबू सालेमच्या नावानं 35 कोटींच्या खंडणीची मागणी

महत्त्वाच्या बातम्या

Dilip Joshi on Marathi Actors: 'जेठालाल'कडून प्रशांत दामलेंचं कौतुक; दिलीप प्रभावळकरांबद्दल म्हणाले...दिलीप जोशींचं मराठी प्रेम
'जेठालाल'कडून प्रशांत दामलेंचं कौतुक; दिलीप प्रभावळकरांबद्दल म्हणाले...दिलीप जोशींचं मराठी प्रेम
Ravi Kishan gets Trolled: 'मी 7 स्टार हॉटेलमध्येही खिचडीच खातो'; रवि किशन यांनी सांगितली गरिबीची कहाणी, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
'मी 7 स्टार हॉटेलमध्येही खिचडीच खातो'; रवि किशन यांनी सांगितली गरिबीची कहाणी, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Marathi Actor On PM Modi Video: 'संसदेतून शेपूट घालून पळायचं अन् इन्स्टावर..' PM मोदींच्या व्हीडिओवरून मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत; म्हणाला,' स्क्रिप्टेड पोकळ ज्ञान ..'
'संसदेतून शेपूट घालून पळायचं अन् इन्स्टावर..' PM मोदींच्या व्हीडिओवरून मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत; म्हणाला,' स्क्रिप्टेड पोकळ ज्ञान ..'
Kirti Kulhari Cyber Fraud : थिएटरमध्ये अलर्ट आला अन् काही मिनिटांत खात्यातून लाखो लंपास;लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्रीची मोठी सायबर फसवणूक
थिएटरमध्ये अलर्ट आला अन् काही मिनिटांत खात्यातून लाखो लंपास;लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्रीची मोठी सायबर फसवणूक;

व्हिडीओ

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe : तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Embed widget