ट्रेंडिंग
Dharmaveer : 'धर्मवीर'मध्ये आनंद दिघेंसोबत दिसणारे रिल लाईफ बाळासाहेब ठाकरे कोण? जाणून घ्या
गाणं पाहून अनेकांना असा प्रश्न पडला असेल की, धर्मवीर या चित्रपटामध्ये बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका कोणत्या अभिनेत्यानं साकारली आहे. जाणून घेऊयात या अभिनेत्याबद्दल...
Dharmaveer : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता प्रसाद ओक (prasad oak) याचा धर्मवीर (Dharmaveer) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामध्ये प्रसादनं आनंद दिघे (Anand Dighe) यांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. या ट्रेलरमधील प्रसादच्या लूकला तसेच त्याच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या चित्रपटातील ‘गुरुपौर्णिमा’ हे गाणे देखील प्रेक्षकांच्या भेटीस आले. या गाण्यामध्ये गुरूशिष्याचं नातं दाखवण्यात आलं आहे. गाणं पाहून अनेकांना असा प्रश्न पडला असेल की, धर्मवीर या चित्रपटामध्ये बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका कोणत्या अभिनेत्यानं साकारली आहे. जाणून घेऊयात या अभिनेत्याबद्दल...
धर्मवीर या चित्रपटामध्ये अभिनेते मकरंद पाथ्ये यांनी बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका साकारली आहे. चित्रपटांमधील मकरंद पाथ्ये यांच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 'एकच प्याला?' या नाटकामध्ये मकरंद यांनी काम केले आहे. धर्मवीर या चित्रपटामधील मकरंद यांच्या लुकवर रंगभूषाकार विद्याधर बट्टे यांनी मेहनत घेतली आहे.
प्रवीण विठ्ठल तरडे यांचे दिग्दर्शन असलेल्या धर्मवीर या चित्रपटाची निर्मिती अभिनेते मंगेश देसाई यांच्या साहिल मोशन आर्ट्स आणि झी स्टुडिओजने केली आहे. आजवर अनेक दर्जेदार आणि एकाहून एक सरस चित्रपट देणाऱ्या झी स्टुडिओजच्या माध्यमातून येत्या 13 मे रोजी 'धर्मवीर मु.पो. ठाणे' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
हेही वाचा :