Karan Johar did face insurance : बॉलिवूडमधील दिग्गज दिग्दर्शक करण जोहर (Karan Johar) सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे. बॉलिवूडमध्ये आजवर करणने अनेक हिट सिनेमे दिग्दर्शित केले आहेत. मात्र, तो (Karan Johar) सध्या एका वेगळ्या कारणाने चर्चेत आलाय. दरम्यान, दिग्दर्शक म्हणून मोठं यश मिळवलेलं असतानाही काही वेळेस करणबाबत नेगेटिव्ह चर्चाही पाहायला मिळतात. कधी तो त्याच्या ड्रेसिंग स्टाईलमुळे चर्चेत असतो तर कधी त्याच्या बेधडक वक्तव्यामुळे चर्चेत येतो. अलीकडेच तो वजन कमी केल्यामुळे चर्चेत आला होता. आता मात्र करण जोहर (Karan Johar) त्याच्या बॉडी पार्टचा विमा काढल्यामुळे पुन्हा चर्चेत आलाय. पाहूया करण जोहरने नेमका कोणत्या बॉडी पार्टचा विमा काढला आहे.
करण जोहरने त्यांच्या चेहऱ्याचा विमा काढल्याचा दावा केला जात आहे. एक व्हायरल रेडिट पोस्ट यासंदर्भात माहिती देते. या पोस्टनुसार करण जोहर यांनी गुपचूपपणे अनेक वेळा दक्षिण कोरियाला भेट दिली असून तिथेच त्यांनी चेहऱ्याचा विमा काढला आहे. मात्र, करण जोहर यांनी अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी केलेली नाही.
चेहऱ्याचा इन्शुरन्स म्हणजे काय?
आजकाल चेहरा किंवा इतर शरीराच्या कोणत्याही पार्टचा इन्शुरन्स काढणे हा एक ट्रेंड झाला आहे. अभिनेते, मॉडेल्स आणि हाय-प्रोफाईल इन्फ्लुएंसर्ससाठी त्यांचे रूप केवळ सौंदर्याशी संबंधित नसून, तो त्यांच्या ब्रँडचा एक महत्त्वाचा भाग असतो आणि त्यांचं मुख्य उत्पन्नाचं साधन देखील असतो. अशा प्रकरणांमध्ये चेहरा 'मूल्यवान' समजला जातो आणि विमा कंपन्या आता खास चेहऱ्यासाठी देखील इन्शुरन्स काढून देतात. हा विमा मुख्यतः अपघात आणि चेहऱ्याला होणाऱ्या इतर नुकसानांना कव्हर करतो. हा विमा आर्थिक संरक्षण देतो आणि उत्पन्नातील संभाव्य नुकसान किंवा काही वेळा वैद्यकीय खर्चाची भरपाई करतो.
इतर सेलिब्रिटींनीही काढला आहे शरीराच्या पार्टचा इन्शुरन्स
करण जोहर शरीराच्या कोणत्यातरी पार्टचा इन्शुरन्स काढणारा पहिले भारतीय सेलिब्रिटी नाही. अमिताभ बच्चन यांनी त्यांचा आवाजाचा इन्शुरन्स काढला आहे. असं म्हटलं जातं की अभिनेता जॉन अब्राहम याने त्यांच्या कमरेचा (hips) विमा काढला आहे. हॉलिवूडमधील प्रसिद्ध व्यक्तींनीही त्यांच्या शरीराच्या कोणत्याही पार्टसाठी मोठ्या प्रमाणावर विमा संरक्षण घेतात. उदाहरणार्थ, जेनिफर लोपेझ हिने तिच्या curves चा अंदाजे 27 मिलियन डॉलर्सचा विमा घेतल्याचं सांगितलं जातं, तर मारिया कॅरी हिने तिच्या पायांचा आणि व्होकल कॉर्डचा विमा 70 मिलियन डॉलर्समध्ये घेतला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या